नवीन लेखन...

शालेय अभ्यासात नाटक (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ६)

सर्व जगात शाळेतील अभ्यासक्रमात ‘नाटयशिक्षणाला’ महत्त्व दिले जाते. भारतात २००४ साली जे शैक्षणिक धोरण जाहीर झाले. त्यात ‘कला शिक्षण’ ‘Art Education’ या विषया अंतर्गत चित्र-शिल्प, गायन-वादन, नृत्य-नाट्य इत्यादी सहा कलांचा अभ्यास अनिवार्यपणे करावा अशी शिफारस करण्यात आली.

२००८ पासुन – भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या प्रमाणे सहा कला शिकवणे अनिवार्य होते. ४०% तासिका कलाभ्यासाला देण्यात याव्यात असे शिक्षण मंडळाचे स्पष्ट निर्देश असतांना देखील मुलांच्या दोन पिढ्या कला शिक्षणाच्या अभ्यासक्रमा पासून वंचित राहील्या. नाटक हा विषय शाळेत ९९% शाळेत शिकवला गेला नाही.

नाटय शिक्षकांच्या अभावी शाळांनी नाट्य शिक्षण देणे टाळले परंतु खाजगी बाल नाट्य प्रेमी संस्थानी नाटय शिबिरांच्या माध्यमातुन इच्छुक विद्यार्थ्यांची – नाट्य शिक्षणाची गरज पूर्ण केली. २०२० मध्ये नवे शैक्षणिक धोरण जाहीर झाले आहे. यात नाटयशिक्षणाला आत्यंतिक महत्त्व दिले गेले आहे. पुढील पिढीला नाट्य विषय सहजगत्या शिकता येईल अशी अपेक्षा करूया. यासाठी नाट्य शिक्षक’ तयार करण्याचे कार्य बालरंगश्रमी परीषद करणार आहे.

नाटक हा सर्वात जास्त सामर्थवान आणि तरीही भारतात सर्वात कमी वापर होणारा शिक्षणाचा प्रकार आहे. ज्या शाळांमध्ये नाटक शिकवतात त्या शाळेतील मुलांचा सर्वांगीण विकास अधिक होतो तसेच अशा शाळेतील मुलांचे भाषा प्रभुत्त्व अधिक चांगले असते असे निरीक्षणातून आढळून आले आहे. शिक्षण हा जसा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे. तसेच नाटक करायला मिळणे हा सुद्धा बालकांचा हक्क आहे.

मुलांना नाटक शिकणे गरजेचे का? या प्रश्नाचे उत्तर देतांना परदेशी शिक्षण तज्ञ काय म्हणतात वाचा…

Dramatic Arts education is an important means of stimulating CREATIVITY IN PROBLEM SOLVING. It can CHALLENGE STUDENTS’ PERCEPTIONS about their world and about themselves. Dramatic exploration can provide students with an outlet for emotions, thoughts, and dreams that they might not otherwise have means to express. A student can, if only for a few moments, BECOME ANOTHER, explore a new role, try out and experiment with various personal choices and solutions to very real problems-problems from their own life, or problems faced by characters in literature or historical figures. This can happen in a SAFE ATMOSPHERE, where actions and consequences can be examined, discussed, and in a very real sense EXPERIENCED without the dangers and pitfalls that such experimentation would obviously lead to in the “real” world. This is perhaps the most important reason for Dramatic Arts in schools.

नाट्य शिक्षणातुन मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास कसा होतो?हा प्रश्न मला पालक अनेकदा विचारतात.

‌नाटकामुळे मुलांचा शारीरिक,मानसिक आणि सामाजिक विकास होतो…हे जगभरातील शिक्षण तज्ज्ञांनी मान्य केले आहे. त्यांनी पुढील २० फायदे नमूद केलेले आहेत.

१) नाटकामुळे मुलांचा उजवा मेंदू कार्यरत राहतो.

२) मुलांचा आत्मविश्वास वाढतो.

३) मुलांची एकाग्रता आणि ग्रहणशक्ती वाढते.

४) मुलांची भाषा सुधारते व संभाषणाची कला अवगत होते.

५) मुलांची कल्पनाशक्ती वाढिस लागते.

६) सहकार्य करण्याची देवाणघेवाण करण्याची वृत्ती येते.

७) समस्येला सामोरे जाऊन तोडगा काढण्याची सवय लागते.

८) भाव आणि भावना ओळखून त्यांच व्यवस्थापन करायला जमत.

९) बोलतांना शब्दाचा आणि शरीराचा योग्य वापर करता येतो.

१०) विध्वंसक वृत्तीला आळा बसुन एखादी गोष्ट निर्माण करण्याची वृत्ती अंगी बाणवते.

११) मुलांचे मित्र वाढतात. समाजात वावरतांना संकोच वाटत नाही.

१२) मुलांची भिती जाते. मुले धिट होतात. निर्भयतेने बोलतात.

१३) शालेय अभ्यासाच्या ताणातुन मुक्त होण्यासाठी नाटकाची मदत होते.

१४) स्वयंशिस्त लागते. वेळेचे व्यवस्थापन करायला मुलं शिकतात.

१५) संशय, स्वार्थ, राग, लोभ यांच्याऐवजी विश्वास, मैत्री, मदत आणि यश मिळवण्याची ओढ मुलांना लागते. अपयशाची भिती रहात नाही.

१६) प्रशंसा, शाबासकी कौतुक, टाळ्या यांच्यामुळे जग जिंकण्याची उर्मी मुलांना मिळते. यातुनच नेतृत्व गुण अंगी बाणवतात.

१७) सकारात्मक विचार आणि सकारात्मक कृती याकडे कल वाढतो.

१८) नाटकामुळे मुले इतर विषयांत देखील रस दाखवतात व यश मिळवतात.

१९) चांगल बघण्याची सवय लागते. मुलं चांगल्या कलाकृतीला दाद द्याला शिकतात.यातून मुलं चांगल्या प्रेक्षकाची भुमिका निभावतात.

२०) नाट्यशिक्षणामुळे भाषा संवर्धनाचे कार्य सहतेने साधले जाते.

नाटक हा विषय २००८ पासून शालेय अभ्यासात आहे…हे अनेक पालकांना माहीत नव्हते.शाळांनी ही माहिती पालकांना कधीच दिली नाही.नैतिक भाषेत हे पातक आहे.असे पाप या पुढे घडू नये ही इच्छा.त्या साठी पालकांनी सतर्क राहून शाळेला प्रश्न विचारायला हवेत.नाटक शिकण्याचा मुलांचा हक्क त्यांना मिळवून द्यायला हवा.

बालरंगभूमी विकासासाठी सहाही कला विषय (चित्र शिल्प,गायन वादन,नृत्य नाट्य) शाळेत शिकवले जायला हवेत. या पुढील लेखात आपण बालनाट्याचे विविध प्रकार याविषयी माहिती करून घेऊ.

— राजू तुलालवार.

टीप:(बालरंगभूमी संबंधी ची ही माहिती तुम्हाला कशी वाटते?याबद्दल आणि तुमचे प्रश्न,शंका आपण कमेंट बॉक्स मध्ये नमूद करत जा.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..