नवीन लेखन...

डासांचं बेट (कथा)

हातात धरलेला पेपर सुटून खाली पडला. हाताला कुणीतरी जबरदस्त चावा घेतला होता. इतक्या स्वच्छ, नवीन विमानतळावर काय चावणार ? उजेडात काही दिसलं नाही. पण आजूबाजूचे प्रवासी चुळबुळ करताना दिसत होते. त्यता प्रखर प्रकाशात इतस्तत: फिरणार इवले इवले डास दिसत नव्हते. पण चावत होते.


मुंबई विमानतळावरुन विमानं सहसा वेळेवर सुटत नाीत. वेळेवर आली तरी वेळेवर उतरत नहाीत. कारण इतक्या नवीन नवीन विमान कंपन्या सध्या सुरु होत आहेत आणि इतकी विमानं मुंबई विमानतळावर उतरण्यासाठी आतूर झालेली असतात की त्यांना उतरण्यासाठी जागाच उरत नाही आणि त्यांना मग मुंबई शहरावर आकाशातच घिरटया घालाव्या लागतात. खाली विमानतळावर उतरण्यासाठी जागा होईपर्यंत.

म्हणजे मुंबई शहरात फक्त माणसालाच जागा मिळवायला अतोनात यातना करावी लागते असं नाही. तर विमानाना सुध्दा आकाशात घिरटया मारीत थांबाव लागतं. जागा झाल्यावर उतरावं लागतं.

विमानतळावरील अवस्था फारशी चांगली नसते. अनेक विमानं वेळेवर येतात पण सुटत नाहीत. ऐन वेळी रद्द होतात. एका विमानाची गर्दी दुसऱ्या विमानात कोंबण्यात येते. बॅगा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जातात. प्रवासी तिसऱ्याच ठिकाणी उतरलेला असतो. मग हवाई सुंदरी चेहऱ्यावरची रेषाही न हलवता क्षमा मागते. प्रवासी आपल्या सामानाची वाट पाहत विमानतळावर बसून राहतो.

नेहमीप्रमाणे विमान उशिरा होतं. बसायला जाग नव्हती. हातातली बॅग पायाजवळ ठेवून पेपर वाचत उभा राहलो. एस.टी. स्टँण्डवर जसे पोलीस येऊन सांगतात. सामान खाली ठेवू नका हातात ठेवा नाही तर चोरीला जाईल. मग आमच्या नावाने बोंबलू नका, तसंच इथेही सांगितल जातं. फक्त भाषा वेगळी असते. तसा बॉम्बे सेंट्रलचा एस.टी. स्टँण्ड सांताक्रुझचा विमानतळ यात फारस फरकत नाही. एस.टी. स्टॅण्डवर जसे कंडक्टर सोलापूर-कोल्हापूर-इचलकरंजी कुणी आहे का? अश हाळी देतात तसाच प्रकार विमानतळावर. विशेषत: मुंबईत चालू असतो. हातात वॉकी-टॉकी घेऊन रुबाबदार पोशाखातील अधिकारी विचारत फिरत होता- एनी बँगलोर पॅसेंजर, एनी बँगलो पॅसेंजर, जणू काही त्या इवल्याशा विमानतळावर बोर्डिंग पास घेतलेला प्रवासी हरवलाच होता.

हातात धरलेला पेपर सुटून खाली पडला. हाताला कुणीतरी जबरदस्त चावा घेतला होता. इतक्या स्वच्छ, नवीन विमानतळावर काय चावणार? उजेडात काही दिसलं नाही. पण आजूबाजूचे प्रवासीही चुळबुळ करताना दिसत होते. त्या प्रखर प्रकाशात इतस्तत: फिरणार इवले इवले डास दिसत नव्हते. पण चावत होते. सेक्युरिटी चेक इनच्या दरवाजात जांभई देत बसलेले आणि हवालदारही डास मारुन कंटाळलेले दिसत हाते.

एवढयात विमान उतरल्याचा आवाज झाला. मागे वळून पाहिलं, तर त्या कोपऱ्यातून एक इसम हातात डीडीटी फवारण्याचं यंत्र घेऊन आरामात निघालेला होता. कसलासा नाकाला आग लावणारा चुरचुरीत धूर त्याच्या खांद्यावरील यंत्राच्या नळकांडीतून बाहेर पडत होता. डास मेले की नाही माहीत नाही. पण विमानाची वाट पाहत थांबलेल्या लोकांच्या नाका-डोळयांतून पाण्याच्या धारा वाहायला लागल्या. त्या धुरामुळे होत्या की विमानाची वाट पाहून कंटाळलेल्या होत्या कुणास ठाऊक

नुकताच परदेशातून परतलेला एक निवासी भारतीय तावातावाने मुंबई विमानतळ हे जागातील सर्वात गचाळ विमानतळ कसं आहे ते समजावून सांगत होता. यापेक्षा औरंगाबाद विमानतळ सुध्दा बरं आहे. बहुधा त्याची औरंगाबादला फॅक्टरी असावी.

त्या धुरातूनबाहेर पडत सुरक्षा जांच झाली पोलीस अधिकाऱ्याचे हात सर्वांगावरुन फिरताना होणाऱ्या गुदगुल्यामुळे हसू आवरत नव्हतं. त्यानंतर विमानात बसल्यावर जरा बरं वाटलं. आता तरी डासांचा त्रास वाचला. दोन्ही हात आणि गाल डासांच्या चाव्यांमुळे हुळहुळे झालेले होते.

विमानतळाचं काय घेऊन बसलायत. डास नाही अशा एक तरी जागा मुंबईत दाखवा. माणसी हजार डास आहेत. मागचा प्रवासी त्याच्या सह-प्रवाशाला सांगत होता. सामान ठेवून जागेवर बसून कंबरपट्टा बांधून आम्ही तयार होतो. पण विमान तयार नव्हतं. बसून रहिलो. अर्ध्या तासाने पायलटने हुकूम सोडला- आर्म ऑल डोअर्स. त्यानंतर सर्व दरवाजे बंद करण्यात आले. हवाईसुंदरीन मूकबधिरांसाठी दूरदर्शनवर जशा बातम्या दाखवतात त्या पध्दतीने सुरक्षा- मुखवटा कसा वापरावा ते करुन दाखवल आणि ते पाहत असतानाच एक डास मानेला कडकडून चावला.

बघता बघताना बरेच डास जमा झाले होते. धावपट्टीवरुन आत शिरले होते आणि आता तास-दीड तास मस्त मेजवानी झोडणार होते. मागच्या प्रवाशाने डोक्यावरील बेल दाबली. हवाईसुंदरी हजर. मॅडम तुमच्याकडे मॉस्किटो कॉईल आहे तिला काहीच समजल नाही. विनोदही कळला नाही. बघते असे सांगून ती जी गेली ती परत आलीच नाही. वैमानिकाच्या भागात डास नसावेत, अशी मनोमन आम्ही प्रार्थना करीत होतो. डास मारणार की विमान चालवणार असा प्रश्न होता.

विमानात इतके डास कसे? कुणीतरी विचारल. अहो हे विमान डासांच्या बेटावरुन आलंय. त्यात डास नसतील तर काय बेडूक असतील. विनोदबुध्दी शाबूत असल्यामुळेच डासांबरोबरचा प्रवास सहनीय झाला.

—————————————————————————–

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक  24 फेब्रुवारी 94

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..