नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

स्वातंत्र्यसेनानी कृषिसंशोधक पांडुरंग खानखोजे

स्वातंत्र्यसेनानी कृषिसंशोधक – इंग्रजांची जगातून सत्ता उलथवून टाकण्याचे स्वप्न अगदी बालपणापासून पाहणारा एक मुलगा संशोधन करून मेक्सिकोला अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनवतो. असा हा स्वातंत्र्यसेनानी कृषिसंशोधक म्हणजे पांडुरंग सदाशिव खानखोजे. […]

शक्तिपात योगमार्गातील अधिकारी प.पू. श्री नारायणकाका

११ सप्टेंबर २००७ रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे संपन्न झालेल्या विश्व शांती संमेलनांत (World Peace Conference) त्यांनी जगातील सर्व धर्मांच्या प्रतिनिधींसमोर विश्वाच्या कल्याणासाठी भारतीय तत्वज्ञान आणि शक्तिपातयोग यांची कास धरणे किती अत्यावश्यक आहे हे पटवून दिले. त्यावेळी उपस्थित सर्वांकडून पूर्वाभ्यासाचे प्रात्यक्षिक करून घेतले. उपस्थित मान्यवरांना पूर्वाभ्यासामुळे विलक्षण शांतीचा अनुभव आल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आणि पत्राद्वारे प्रशंसा केली. […]

मुंबईचा सिंह – फिरोजशहा मेरवानजी मेहता

फिरोजशहा मेरवानजी मेहता एल्फिन्स्टन कॉलेजमधून एम्.ए. होऊन इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले. तेथील चार वर्षांच्या वास्तव्यात त्यांच्यावर दादाभाई नौरोजींचा प्रभाव पडला. ते बॅरिस्टर होऊन १८६८ मध्ये हिंदुस्थानात आले आणि मुंबईस त्यांनी वकिली सुरू केली. १८६९ साली त्यांनी दादाभाईंच्या ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा म्हणून बाँबे असोसिएशन मुंबईत सुरू केली. गोऱ्या लोकांच्या मिरासदारीविरुद्ध त्यांनी प्रभावी प्रचार केला. […]

आर. के. नारायण आणि मालगुडी डेज

१९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. […]

भारताची पहिली सुप्रिम कोर्ट न्यायाधीश महिला – फातिमा बिबी

५ ऑक्टोबर १९८९ …… भारतीय इतिहासातील महत्वाची घटना घडल्याचा दिवस. या दिवशी भारत देशाच्या मुकुटात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतातील पहिली महिला, सुप्रिम कोर्टची न्यायाधीश बनली. त्या महिलेचं नाव आहे, एम. फातिमा बिबी. […]

सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू

पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांनी ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. अरुण साधू हे नावाप्रमाणेच साधे होते. लेखक असल्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. ते केवळ पुस्तकांतच रमले नाहीत. अनेक पुरोगामी चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता. […]

सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर

महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू होते. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे. […]

नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्याबरोबर `संवाद’ लाईव्ह

नागपूरकडल्या परिसरातील एका सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या प्रेमानंद गज्वी यांना एकांकिका आणि नाट्यलेखनाने आकृष्ट केले. पुढे १९८०-१९८५च्या सुमारास ते मुंबईला आले आणि त्यांची प्रतिभा अधिकच पल्लवीत झाली. ‘देवनवरी'(१९८१), ‘तनमाजोरी'(१९८४), ‘वांझ माती'(१९८४), ‘जय जय रघुवीर समर्थ'(१९८८), गांधी-आंबेडकर(१९८८), ‘किरवंत'(१९९१), ‘पांढरा बुधवार'(१९९५) अशी एकाहून एक सरस नाटके त्यांनी लिहिली *आणि विद्यमान मराठी नाटककारांच्या मांदियाळीत त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. […]

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी

महानुभाव पंथ प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांची ओळख करून देणे तसेच मानवी मूल्याणा नवसंजीवनी देण्यासाठी स्वामींची ओळख करून देने अत्यावश्यक आहे […]

प्रतिभावंत शांता शेळके

परमेश्वर कोणाला भरभरून प्रतिभा देईल सांगता येत नाही.काही जणांना आपल्याकडे प्रतिभेच लेणं आहे याची जाण असते तर काहीना आपल्याकडे प्रतिभा आहे याची जाणीवच नसते. सुदैवाने शांताबाईकडे ह्याची जाणीव फार लवकर झाली. कॉलेज मध्ये असतानाच शांताबाई कवितेकडे वळल्या. […]

1 155 156 157 158 159 379
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..