नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

क्रिकेटपटू सिडने बार्न्स

सिडने बार्न्स यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो 13 डिसेंबर 1901 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी नाबाद 26 धावा केल्या आणि 65 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या , तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 1 विकेट घेतली , हा सामना इंग्लंडने 1 इनिंग आणि 124 धावांनी जिंकला. त्यावेळी इंग्लन्डच्या संघात सिडने बार्न्स , कॉलिन ब्लाथे , लेन ब्रॉड हे तिघेही त्यांचा पहिला सामना खेळत होते आणि या तिघांनी दोन्ही इनिंग मिळून 20 विकेट्स म्हणजे त्या सामन्यातील सर्व विकेट्स घेतल्या. […]

समाजसेविका ताराबाई मोडक

शिक्षणतज्ज्ञ या नात्याने ताराबाईंनी अनेक पदे भूषवली. त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. गिजुभाईंच्या निधनानंतर इ.स. १९३९ पासून नूतन बालशिक्षण संघाची धुरा त्यांच्याचकडे होती. १९४६ ते १९५१ अशी पाच वर्षे त्या तत्कालीन मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्या होत्या. याच राज्यात प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर त्यांनी अनेक वर्षं काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. इतर अनेक राज्ये आणि केंद्र सरकारच्या शिक्षण समितीवर त्यांची नेमणूक झाली होती. महात्मा गांधींनी आपल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते. […]

जबरदस्त गोलंदाज माल्कम मार्शल

जवळजवळ २३ ते २४ पावलाचा स्टार्ट घेणारा माल्कम मार्शल पाहून भल्याभल्याना धडकी भरते आणि त्याने माईक गॅटींगचे जे नाक फोडले तो चेंडू किती भयानक असेल याची कल्पना करवत नाही. काही वर्षांपूर्वी माईक गॅटींगला पाहिले असता त्याची स्वाक्षरी घेत असताना त्याच्या नाकाकडे माझे लक्ष गेले आणि माल्कम मार्शलचा तो चेंडू आठवला. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या अँडी लॉईडला माल्कम मार्शलचा लागलेला चेंडू बघीतला त्यावेळी तेव्हा त्याच्या भयानक स्पीडची कल्पना आली. […]

भारतीय क्रिकेटपटू सी. एस. नायडू

ते जेव्हा क्षेत्ररक्षण करण्यास येत असत तेव्हा ते निळी कॅप घालत असत परंतु ते गोलंदाजी करत असताना ते ती कॅप बदलून रंगीत टोपी घालत. फलंदाज म्हणून ते बिग हिटर होते , त्यांनी मारलेला उतुंग षटकार साईट स्क्रीनवर अनेकवेळा आदळत असे. मला आठवतंय त्यांना सुमारे २२ वर्षांपूर्वी मी पत्र लिहिले होते , त्यांचे उत्तर आले अर्थात ते पत्र त्यांच्या कुटूंबातील कोणीतरी लिहिले होते आणि पत्राखालील स्वाक्षरी मात्र त्यांची होती. […]

क्रिकेटपटू जॉन “डग” इन्सोल – 18 April

डग इन्सोल यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना २० जुलै १९५० रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. त्यांनी शेवटचा कसोटी सामना ३० मे १९५७ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला . निवृत्तीनंतर ते ते इंग्लंडच्या क्रिकेट सिलेक्टर्स कमिटीचे चेअरमन होते तसेच १ ऑक्टोबर २००६ मध्ये एक वर्षासाठी एम. सी .सी. चे प्रसिडेंटही होते. ते एम.सी.सी. कमिटीवर २० वर्षाहून अधिक काळ होते. […]

गुजराती गायिका दिवाळीबेंन भील

जुनागडमधील वणझारी चौकात त्या जेव्हा गायच्या तेव्हा असे काही वातावरण व्ह्यायचे की प्रत्येकजण तल्लीन आणि मंत्रमुग्ध व्ह्यायचा . एका नवरात्रीमधील कार्यक्रमात आकाशवाणीचे अधिकारी रेकॉर्डिंग करायला आले असताना त्यांनी दिवाळीबेंन यांचा आवाज ऐकला . तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या हेमू गढवी यांनी अधिकाऱ्यांना दिवाळीबेंन यांच्या गाण्याचे रेकॉर्डिंग करायला सांगीतले. […]

श्रीलंकन क्रिकेटपटू मुथय्या मुरलीथरन

मुरलीथरनचे नाव ऐकले तरी त्याचा संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीचा इतिहास डोळ्यासमोर उभा रहातो. मुरलीथरनने १३३ कसोटी सामन्यांमध्ये फक्त १,२५६ धावा केल्या आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ६७ . त्याने ८०० कसोटी विकेट्स घेतल्या त्या २२.७२ ह्या सरासरीने . त्याने ६७ वेळा ५ किंवा ५ पेक्षा जास्त खेळाडू एक इनिंगमध्ये बाद केले. तर २२ वेळा एका इनिंगमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त खेळाडू बाद केले. त्याने एक इनिंगमध्ये ५१ धावा देऊन ९ खेळाडू बाद केले तर ७२ झेल पकडले. […]

प्रा. नरहर रघुनाथ (न. र.) फाटक

प्रा. न. र. फाटक मराठीचे प्राध्यापक, प्रकांड पंडीत , पत्रकार , चरित्रलेखक , इतिहाससंशोधक, मराठी समीक्षक , संत साहित्याचे चिकित्सक होते. त्यांचे घराणे मुळचे कोकणातील ‘ कमोद ‘ गावातले होते.. त्यांनी न्यायमूर्ती महादेव गोविद रानडे यांचे आत्मचरित्र १९२४ साली लिहिले. ते १९४७ साली हैद्राबाद येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. प्रा. न. र. फाटक यांचे मराठी साहित्यात समीक्षक, विचारवंत , इतिहासकार म्ह्णून स्थान खूपच मोठे होते त्याचप्रमाणे त्यांची स्वतंत्र मते ही देखील वर्तमानाला धरून होती. […]

प्रसिद्ध सरोद वादक अली अकबर खान

त्यांनी कोलकत्ता येथे १९६७ साली संगीताचे अली अकबर कॉलेज काढले पुढे अमेरिकेतील सॅन रफेल येथे नेण्यात आले , त्याच्या शाखा बसेल आणि स्विझर्लंड येथेही आहेत करंट अली अकबर खान आधीच अमेरिकेत स्थायिक झालेले होते. ते १९५५ साली अमेरिकेत स्थाईक झालेले होते ते सुप्रसिद्ध व्हायोलीन वादक यहुदी मेहुनीन यांच्या सांगण्यावरून. […]

अभिनेत्री शांता हुबलीकर

भालजी पेंढारकर या ख्यातनाम दिग्दर्शकांच्या हाताखाली त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. भालजींच्या साध्या राहणीचा आणि वक्तशीरपणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. कान्होपात्रा या चित्रपटात त्यांनी कान्होपात्रेच्या आईची भूमिका केली. इथे दिनकर कामण्णा, चिंतामणराव कोल्हटकर आदींकडून त्यांना अनेक गोष्टी शिकावयास मिळाल्या. […]

1 153 154 155 156 157 381
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..