नवीन लेखन...

भारतीय क्रिकेटपटू सी. एस. नायडू

सी. एस. नायडू म्हणजेच कोट्टारी सुब्बण्णा नायडू यांचा जन्म १८ एप्रिल १९१४ रोजी महाराष्ट्रामधील नागपूर येथे झाला. त्यांचे बंधू सी. के. नायडू हे भारतीय कसोटी क्रिकेटचे कप्तान होते. सी. के. नायडू यांच्या नावाच्या , कर्तृत्वाच्या छायेखाली त्यांना रहावे लागले जरी ते १८ वर्षे वेगळे राहिले कारण सी. के. नायडू यांचे कर्तृत्वाचे वलय फार प्रभावी होते . अनेक वेळा वडील मोठे क्रिकेटपटू असेल तर मुलाकडे त्याच नजरेने बघीतले जाते अगदी सर डॉन ब्रॅडमन पासून सुनील गावस्कर यांच्या मुलाच्या बाबतीत असेच झालेले आहे परंतु सी .एस. नायडू त्या वलयातून निश्चित बाहेर पडले कारण त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटची करिअर खूप मोठी आहे अगदी १९३१-३२ पासून १९६१-६२ पर्यंत आहे. ते सेंट्रल प्रोव्हिन्सन्स , सेन्ट्रल इंडिया आणि होळकर यांच्याकडूनही खेळले. बंगालचे कप्तान होण्यापूर्वी ते आंध्रप्रदेश , उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या ३ राज्याकडून खेळले .

सी. एस . नायडू यांनी पहिला कसोटी सामना ५ जानेवारी १९३४ रोजी इंग्लंडविरुद्ध कोलकत्यात खेळला. त्यांनी एकूण ११ कसोटी सामने खेळले त्यापैकी ३ सामने भारतमध्ये खेळले. अर्थात कसोटी क्रिकेट आणि फर्स्ट क्लास क्रिकेट यामध्ये त्यावेळी खूपच फरक होता , त्यावेळी आजच्या सारखे कसोटी सामने सतत होत नसत म्हणून त्याच्या वाट्याला कसोटी सामने कमी होते आणि स्पर्धाही असतेच . सी. एस . नायडू त्यांची गोलंदाजी करताना वेगळी पद्धत होती त्यांचे सहकारी कोटा रामस्वामी यांनी एके ठिकाणी त्यांच्या गोलंदाजीबद्दल म्हटले आहे , ‘ सी . एस . गोलंदाजी करताना इतके वाकत की त्यांचे डोके जवळजवळ स्टंपच्या लेव्हलला येत असे. त्यावेळी त्यांचे दोन्ही हात संपूर्णपणे पसरलेले असत आणि त्यांच्या शरीराचे वजन पुढे फेकले जायचे त्यामुळे त्यांनी फेकलेला चेंडू वळायचा परंतु त्यांना त्यांच्या लेन्थ आणि दिशेवर कंट्रोल करता येत नसे .

१९४४-४५ मध्ये होळकर संघात करियर करण्यापूर्वी त्यांनी रणजी सेशनमध्ये ४० विकेट्स घेतल्या आणि तशा ४० विकेट्स घेणारे ते पहिले गोलंदाज होते. ५६ रणजी ट्रॉफी सामन्यामध्ये त्यांनी ३०.२९ च्या सरासरीने २,५७५ धावा केल्या आणि २९५ विकेट्स घेतल्या त्या २३.४९ च्या सरासरीने. हा त्यांचा २९५ विकेट्सचा रेकॉर्ड १९७० साली वामन कुमार याने मोडला. सी. एस . नायडू पेंटयाग्युलर ट्रॉफी साठी दिखील खेळले त्यांनी १६.६७ च्या सरासरीने १०३ विकेट्स घेतल्या. होळकर संघामध्ये १९४४-४५ मध्ये पहिल्या ३ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये २२ विकेट्स घेतल्या .

मुंबईविरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि त्यांनी ४६२ धावा केल्या , नायडू यांनी आव्हान स्वीकारून ६४.५ – १० – १५३ -६ अशी गोलंदाजी केली. त्यानंतर फलंदाजी करताना त्यांनी आक्रमकपणे ५४ धावा केल्या आणि मुश्ताक अली यांच्याबरोबर ७७ धावांची भागीदारी केली. त्यामुळे मुंबईच्या संघाला परत मैदानात उतरावे लागले त्यांनी होळकर संघाला ३६० धावांमध्ये बाद केले. त्यामुळे १०२ धावांचा मुंबईच्या संघाला फक्त १०२ धावांचा लीड मिळाला . सी. एस . नायडू यांनी शेवटचा कसोटी सामना १२ जानेवारी १९५२ रोजी खेळला .

सी. एस . नायडू यांनी ११ कसोटी सामन्यामध्ये १४७ धावा केल्या त्यामध्ये त्यांनी सर्वात जास्ती म्हणजे ३८ धावा काढल्या . तसेच त्यांनी २ विकेट्स घेतल्या. सी. एस . नायडू यांनी १७४ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये ५७८६ धावा केल्या त्यामध्ये त्यांनी ४ शतके आणि ३३ अर्धशतके केली . त्यांनी सर्वात जास्ती म्हणजे १२७ धावा काढल्या तसेच ६४७ विकेट्स घेतल्या त्या २६.५४ या सरासरीने त्याचप्रमाणे त्यांनी एका इनिंगमध्ये ९३ धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या. ते क्रिकेट म्हटले की थकत नसत ४७ व्या वर्षी त्यांनी शेवटचा रणजी सामना खेळला तो सामना उत्तर प्रदेशच्या संघाविरुद्ध विरुद्ध होता त्या सामन्यात त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये ३३ धावांमध्ये ६ विकेट्स तर दुसऱ्या इनिंगमध्ये ४८ धावांमध्ये ३ विकेट्स घेतल्या आणि अगदी महत्वाच्या क्षणी ३४ धावा काढल्या , त्यावेळी ते संघाचे कप्तान होते.

ते जेव्हा क्षेत्ररक्षण करण्यास येत असत तेव्हा ते निळी कॅप घालत असत परंतु ते गोलंदाजी करत असताना ते ती कॅप बदलून रंगीत टोपी घालत. फलंदाज म्हणून ते बिग हिटर होते , त्यांनी मारलेला उतुंग षटकार साईट स्क्रीनवर अनेकवेळा आदळत असे. मला आठवतंय त्यांना सुमारे २२ वर्षांपूर्वी मी पत्र लिहिले होते , त्यांचे उत्तर आले अर्थात ते पत्र त्यांच्या कुटूंबातील कोणीतरी लिहिले होते आणि पत्राखालील स्वाक्षरी मात्र त्यांची होती.

सी . एस. नायडू यांचे २२ नोव्हेंबर २००२ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी इंदोर येथे निधन झाले.

– सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 360 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..