नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

गणितज्ञ गुरू लाभलेला इंजिनिअर कलाकार – चिन्मय कोल्हटकर

चिन्मय कोल्हटकर हे भारतीय शास्त्रीय संगीताच्या जगातील एक प्रसिद्ध हार्मोनियम वादक आणि संगीतकार. पंडित बिरजू महाराज, उस्ताद झाकीर हुसेन, गानसरस्वती किशोरी आमोणकर या सारख्या दिग्गजांना हार्मोनियम वर साथ दिलेल्या व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेल्या चिन्मयने मी घेतलेल्या आपल्या मुलाखती मध्ये एक कलाकार त्याच्या इंजिनिअरिंग मधील कौशल्यांचा वापर करून आपल्या साधनेच्या जोरावर शास्त्रीय संगीतासारख्या क्षेत्रामध्ये आपले नाव कसे कमवू शकतो हे दाखवून दिले आहे. […]

जीए……

जीए कुलकर्णींनी ज्याक्षणी लेखणीला हात घातला तो क्षण मराठी सारस्वताच्या भाळी कायमचा गोंदला गेला. रूढार्थाने गावकुसाबाहेर राहून त्यांनी मराठी भाषेला जागतिक व्यासपीठ दिले. साहित्याचे सगळे लिखित -अलिखित नॉर्म्स न पाळता ते स्वतःच्या उंचीवर पोहोचले. आम्ही सुरुवातीला त्यांना दुर्लक्षाने मारले. त्याकाळात म. द . हातकणंगलेकर त्यांची काहीशी पाठराखण करीत होते. मग आम्ही त्यांच्यावर (सोप्पा असा ) दुर्बोधतेचा शिक्का मारला. (तसा शिक्का ग्रेसही मिरवत आहे. ) पण या दोघांच्या लेखणीतील मराठी भाषा काही औरच आहे – आपल्या पठडीतील नाही. […]

वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक वनयोगी बाळासाहेब देशपांडे

वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख काम म्हणजे आदिवासी समाजास मुख्य प्रवाहात आणणे. समाजाचा सर्वांगीण विकास साधतानाच त्यांच्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना जपणे. त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्यातूनच नेतृत्व उभे राहील हे पाहणे. एकूणच आदिवासी समाज आणि अन्य समाज यातील दरी बुजवण्याचे काम वनवासी कल्याण आश्रम मुख्यतः करत आहे. […]

संगीतकार नौशाद

हिंदी चित्रपट संगीतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रभावी वापर करणाऱ्या संगीतकार नौशाद, यांनी लहान वयात वाद्याचे दुकानात नोकरी करताना वादनात हुकमत मिळवली तेव्हा दुकानाच्या मालकांनी – गुरबत अलींनी तिथली एक उत्तम हार्मोनियम त्या मुलाला भेट दिली. हाच मुलगा पुढे ‘संगीतकार नौशाद अली’ म्हणून नावारूपाला आला! त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर सहज दृष्टिक्षेप टाकला तर दिसून येईल की, त्यांचे […]

‘कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले मनोहर पर्रीकर

साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा…’कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचा सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रीकर यांचा थक्क करणारा प्रवास होता मात्र यशाची अनेक शिखरं गाठूनही त्यांनी त्यांच्यातला ‘कॉमन मॅन’ अखेरच्या श्वासापर्यंत जपला… […]

स्मिता पाटील – भारतीय चित्रपटांची अनभिषिक्त महाराणी

वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या स्मिता पाटील जवळजवळ ७५ चित्रपटांच्या अनभिषिक्त महाराणी ठरल्या होत्या. १९८४ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय नायिका बनल्या. १९८२ साली आला जब्बार पटेलांचा ‘उंबरठा’ त्यात तिने ‘सुलभा महाजन’ ची साकारलेली भूमिका अजूनही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बिनतोड आहे. सार्वजनिक जीवनातही ती महिलांविषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांशी प्रत्यक्ष पण जोडली गेली होती. त्यामुळे उंबरठा मधल्या तिने साकारलेली भूमिका अधिकच वास्तवदर्शी वाटते. […]

१४ वे नौसेनाप्रमुख ॲडमिरल जयंत नाडकर्णी

विविध जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर नोव्हेंबर १९८७ मध्ये त्यांची भारताच्या नौसेनेचे प्रमुख म्हणून ‘ॲडमिरल’पदी नियुक्ती करण्यात आली. नौसेना प्रमुखपदाच्या त्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत दोन वर्षे ते भारतीय सेनादलांचे संयुक्त प्रमुख (‘चीफ ऑफ जॉईंट चिफ्स ऑफ स्टाफ’) होेते. […]

काॅ. ल. शि.कोमसाहेब ; एक उत्तम, यशस्वी, आदर्श प्रशासक

‘आदिवासी प्रगती मंडळ’, तलासरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॉ. ल. शि. कोम साहेब यांनी तलासरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजाला ‘के. जी.’ ते ‘पी. जी.’ पर्यंतचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे महान कार्य केले आहे. एका वसतीगृहाच्या स्थापने पासुन सुरु झालेल्या संस्थेची आज अनेक प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालय व मुला-मुलींची अनेक वसतीगृह आजच्या आदिवासी समाजातील तरुण- तरुणींना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे पवित्र कार्य निरंतरपणे करीत आहेत. […]

संत महिपती महाराज – परिचय

समाजात संतांचे कार्य निश्चितच फार मोलाचे आहे. ईश्वर भक्ती व पारमार्थिक जीवनातील तत्वज्ञान उपदेश, ओवी, अभंगाद्वारे त्यानी वेळोवेळी व्यक्त केलेले आहे. प्राचीन मराठी साहित्यात संत परंपरेचा अभ्यस करताना संत महिपती महाराज रचित ‘भक्ती विजय’ व ‘संतलीला मृत’ या ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. […]

1 154 155 156 157 158 379
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..