प्रतिभावंत शांता शेळके

परमेश्वर कोणाला भरभरून प्रतिभा देईल सांगता येत नाही.काही जणांना आपल्याकडे प्रतिभेच लेणं आहे याची जाण असते तर काहीना आपल्याकडे प्रतिभा आहे याची जाणीवच नसते. सुदैवाने शांताबाईकडे ह्याची जाणीव फार लवकर झाली. कॉलेज मध्ये असतानाच शांताबाई कवितेकडे वळल्या. जातीने कोष्टी,पण संगत उच्चभ्रू विद्यार्थ्यांची लाभली. त्यामुळे साहजिकच कविता,साहित्याकडे ओढा लागला.त्यातच माटे यांच्यासारखे प्राध्यापक गुरुस्थानी  लाभले. आजूबाजूस साहित्यिक वातावरण असल्याने मनातली कविता फुलू लागली. व ती नकळत कागदावर उतरू लागली.प्रतिभेची जाणीव फुलू लागली.एम ए ला संस्कृत विषयामुळे कालिदासाच्या मेघदूताने गारुड घातल.प्रतिभेच्या कक्षा रुंदावल्या.जाणीव वाढली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर चरितार्थासाठी काहीतरी करणे भाग होते. अत्र्यांच्या नवयुगमध्ये नोकरी लागली.आणि अत्रेसारखा साहित्यिक गुरुस्थानी लाभला.वास्तविक लौकिकार्थाने माटे बाईंचे गुरु , त्यांच्यामुळे शान्ताबाईच्या साहित्याच्या जाणीवा रुंदावल्या पण त्याची जाणीव करून दिली अत्र्यांनी.संस्कृतप्रचुर कविता अत्र्यांना दाखवल्यावर अत्रे म्हणाले.” तुला सामान्याची कवियत्री बनायचे असेल तर तू जे काही लिहिले.आहेस ते फाडून टाक. सामान्यांना समजेल अश्या भाषेत कविता लिही.” हा सल्ला  बाईनि आयुष्यभर जपला .म्हणुनतर लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांसाठी गाणी लिहिली.नवयुग मध्ये उमेदवारी केल्याने लिखाणाचे सगळे प्रकार हाताळायला मिळाले. म्हणूनच त्या म्हणत असत कि लेखक बनण्याआधी पत्रकारितेच्या मांडवाखालून एकदातरी जायला हवे.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

नवयुग मधून बाहेर पडल्यावर मुंबईस प्राध्यापकी स्वीकारली. साहित्याचे सगळे प्रकार हाताळायला मिळाले. हातून सगळ्या प्रकारचे लिखाण झाले. कथा, कविता,इंग्रजी चित्रपटाची परीक्षणे, ललित लेख हा तसा मराठी साहित्यातला दुर्मिळ प्रकार. फार कमी लेखकांनी तो हाताळला. कारण ह्या साहित्य प्रकारासाठी लेखकाकडे उत्तम प्रतिभा असावी लागते. शांताबाई यांच्याकडे ती होती. म्हणूनच  त्यांचे ललितलेख वाचकांना अंतर्मुख करणारे होते. त्यांनी व्यक्तिचित्रण सुद्धा लिहिली वडीलधारी माणसे  ह्या संग्रहात. त्यातच चित्रपट निर्मात्यांनी गाणी लिहिण्याचा आग्रह केला. तो नाकारता नाही आला. वास्तविक कविता आणि चित्रपटगीते दोन्ही वेगळे प्रकार आहेत. कविता छंद मात्रात लिहायची असते तर चित्रपटाची गाणी मीटरमध्ये.तरीही हे आव्हान बाईनी लीलया पेलले. बाई आधीपासूनच कविता करत असल्यामुळे त्यांच्यावर  गीतकाराचा शिक्का बसला नाही. मंगेशकर कुटुंबियांच्या आग्रहामुळे मराठी भावगीते लिहिली . त्यातही बाईनी आपला ठसा उमटवला.प्रेमगीतापासून विरह गीता पर्यंत बालगीतापासून ते भक्तीगीतां पर्यंत सगळे काव्यप्रकार सफाईने हाताळले. गाण्याचा कोणताही प्रकार वर्ज्य नव्हता..स्वताचे अनुभव भरभरून लिहिले.

एके  ठिकाणी बाई लिहितात कि सामान्यता माणूस पाच सुखाकरता आपलं आयुष्य खर्ची करत असतो. शिक्षण संपत्ती,लौकिक, चांगली बायको आणि चांगली मुले.पण त्यापलीकडे देखील एक सुख असतं ते ज्याच त्यांनी शोधायचं असत काही जणांना  ते शोधता येत, काहीना नाही शोधता येत. काहीना तर असं सुख असतं याची कल्पनाच नसते. बाईनी हेच सुख आयुष्याच्या सुरवातीसच शोधलं बाकिची व्यावहारिक सुखे नाकारून.

बाई प्राध्यापकी करताकरताच साहित्य विश्वात रममाण झाल्या.त्या कदाचीत अजात शत्रू नसतीलही पण विनाकारण दुसर्याला दुखावलं नाही. साहित्यविश्वातील वादाच्या भोवर्यात सापडल्या नाहीत.मराठी मधल्या इतर प्रकाराबरोबरच आणखी एका प्रकारावर त्यांची हुकुमत होती ती म्हणजे महाराष्ट्रातील  पारंपारिक गीते. त्यावर बाईनी सरोजिनी बाबर कवियत्री सोबत मराठी दूरदर्शन वर कार्यक्रम केला होता.आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला,. मधल्या काळात बाईंची नियुक्ती सेन्सोर बोर्डवर झाली.ती नियुक्ती सरकारी असल्यामुळे साहजिकच लिखाणावर मर्यादा आल्या.त्यावेळी त्यांनी वसंत अवसरे नावानी कविता लिहिल्या.१९९६ मध्ये त्यांना पंढरपूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद मिळाले. त्याच सुमारास बाईना cancer सारख्या  दुर्धर आजाराने ग्रासले. पण त्यांनी हार  पत्करली नाही. आपलं लिखाण शेवटपर्यंत  चालूच ठेवलं.

६  जून २००२ रोजी त्याचं निधन झालं.  त्या अगोदर काही दिवस त्यांनी कालनिर्णय calendar साठी लेख लिहून पाठवला तो नंतर छापून आला. शांताबाईनी मराठी साहित्यात जी कामगिरी केली त्याला तोड नाही हे मात्र खर.

— रवींद्र शरद वाळिंबे 

1 Comment on प्रतिभावंत शांता शेळके

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..