नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

लोकशाहीचे पसायदान

भारत सरकारने आयपीसी सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्ट मध्ये बदल करून स्वातंत्र्याचे स्वराज्यात रूपांतर करण्याची पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. आता आपण ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी मागितलेले पसायदान देण्याची मानसिक आणि कायदेशीर तयारी सुरू केलेली आहे असे मला वाटते. ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे नागरीकांनी भारत सरकार कडून पूर्ण करून घेण्याच्या नागरी आधिकारांची आणि सुविधांची शॉर्टलिस्टच आहे. […]

शिव्या

माणसाच्या तोंडात सदैव असलेली गोष्ट म्हणजे शिवी. क्रोध,तिरस्कार व्यक्त करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. त्या सर्वच भाषेत उपलब्ध आहेत. कधी राग आला म्हणून तर कधी राग यावा म्हणून शिव्यांचा उपयोग होतो.अगदी जन्मापासूनच त्याचे बाळकडू मिळते. […]

हजार तोंडांचा रावण – एक झलक !

डायनासोरहून कितीतरी पटीने मोठा भीमकाय भ्रष्टाचार धावताधावता थांबला. तरी तो बराच पुढे आलेला होता. त्याच्या पायांना लाखो अश्वांचा वेग मिळालेला होता, तर अनेक हत्ती सामावतील एवढे मोठे पोट झालेले होते. स्वतःला आवरायला, सावरायला त्याने बराच वेळ घेतला. नंतर जागच्या जागी उभे राहून मोठ्या कष्टाने त्याने मान वळवली. […]

ज्येष्ठ हो तुमच्यासाठी

विज्ञानाची प्रगती, वैद्यकीय उपचार, लोकात आरोग्याविषयी निर्माण झालेली सजकता यामुळे आयुर्मान वाढले आहे. तथापि, वृद्धापकाळात अनेक समस्या निर्माण होत आहेत. सर्व समस्यांना तोंड देण्याची अनेकांच्या मनाची तयारी झालेली नसते. त्यांचे एक कारण म्हणजे मागच्या पिढीतील त्यांचे आईवडील एवढे जगलेले नसतात. दुसरे आपली मुले चांगली आहेत आणि ती वृद्धापकाळात आपली व्यवस्थित काळजी घेतील. या भाबड्या समजुतीत अनेक असतात. […]

सहकारी तत्त्वावर ग्रंथ प्रकाशनाचा प्रयोग

ग्रंथ प्रकाशन आणि वितरण क्षेत्रात सहकारी तत्वावर कार्य करणान्या ‘साहित्य प्रवर्तक सहकारी संस्था, कोट्टायम’ या केरळ राज्यातील संस्थेच्या कार्याचा तपशील पुढे दिला आहे. महाराष्ट्रातील सद्यस्थित ग्रंथव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर या प्रयोगाचे कार्य लक्षात घेणे अगत्याचे आहे असे वाटते. […]

हजार तोंडांचा रावण – मनोगत

जागतिक, राष्ट्रीय, प्रांतीय अशा सर्वच जागी अशांतता असेल तर समाज, कुटुंब आणि वैयक्तिकरीत्या माणूस हा देखील स्वस्थ राहू शकत नाही. जगण्यासाठीचा माणसाचा संघर्ष आज कैक पटींनी वाढलेला आहे. म्हणून प्रत्येक जण आज अस्वस्थ आहे. असमाधानी आहे. […]

आठवणींची मालिका

वय वाढत जातं तसं एकेक जवळच माणूस दुरावतो. वर्षानुवर्षे असलेली साथसंगत हरवते. एकटेपण कधी मनाला बोचते. तर कधी काहीशा गमतीदार प्रसंगानाही सामोरे जावे लागते. अशाच काही भावनाशील, प्रेमळ अनुभवांचा कोलाज! […]

बीज भाषण : मराठी कथात्म!

मी कथा विषयी बोलणार आहे, पण हे मी माझ्या कथांचे संदर्भ घेऊन बोलणार आहे.कथा म्हणजे काय? काल्पनिकते मध्ये वास्तविकता किंवा वास्तविकते मध्ये काल्पनिकतेचे मिसळ करून व्यक्त होणे.सर्वस्वी वास्तविक किंवा सर्वस्वी काल्पनिक असे काहीच नसते. पण विचार आणि चिंतन ही लेखकाची शिदोरी आहे. यातून जी जन्म घेते ती कविता किंवा कथा. […]

जोडीदार निवडतांना – भाग २

आजच्या बदलत्या काळात व्यक्ती स्वातंत्र इतकं फाजील बोकाळलं आहे कि सतत एकमेकांवर कुरघोडी करण्या पलीकडे कोणताही संवाद होत नाही .जगण्यासाठी पैसा निश्चितच आवश्यक आहे पण जगण्याचे ध्येय पैसा असू नये . जीवन हे बंधन युक्त असेल तरच सुखी होऊ शकत. […]

न्यूज चॅनल्सची विश्वासार्हता

गेल्या काही काळात माध्यमांचं गारुड समाजमनावर वाढत चाललं आहे. या माध्यमामध्ये सर्व प्रकारचा सोशल मीडिया आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, टीव्ही माध्यम अन् त्यातही बातम्या.. टीव्ही माध्यमात खरंतर मनोरंजन वाहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. पण काही महत्त्वाचं घडत असेल किंवा निवडणुका असतील तर वृत्त वाहिन्यांचं महत्त्व अचानक वाढतं. ते स्वाभाविक आहे. […]

1 4 5 6 7 8 133
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..