नवीन लेखन...

हजार तोंडांचा रावण – मनोगत

जागतिक, राष्ट्रीय, प्रांतीय अशा सर्वच जागी अशांतता असेल तर समाज, कुटुंब आणि वैयक्तिकरीत्या माणूस हा देखील स्वस्थ राहू शकत नाही. जगण्यासाठीचा माणसाचा संघर्ष आज कैक पटींनी वाढलेला आहे. म्हणून प्रत्येक जण आज अस्वस्थ आहे. असमाधानी आहे.

स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी इतरांचा विचार न करणारी प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा माणुसकीला कलंकित करण्यासारखी आहे. आश्चर्य म्हणजे या जीवघेण्या स्पर्धेपासून माणसाला वाचवणारी आणि सुरक्षित ठेवणारी, विशेष म्हणजे माणसासाठीच माणसाने बनवलेली सर्व व्यवस्थादेखील आज कमी पडत आहे. अशा परिस्थितीत माणसाने काय करावे? यापेक्षा तो काय करू शकतो, हा विचार सतत मनात घोळत असतो. न संपणाऱ्या युद्धाची विभाषिका झेलणाऱ्या राष्ट्रांचे नागरिक काय करू शकतात? त्यांची हतबलता पाहून संपूर्ण जगाची कृत्रिम तशीच नैसर्गिक व्यवस्थादेखील कुठेतरी संपुष्टात येऊ पाहत आहे. ‘हे विश्वची माझे घर’ हा संदेश जगातील वेगवगेळ्या राष्ट्रांच्या नेतृत्वाला कोण देणार?

हे झाले प्रत्यक्ष युद्धाची त्रासदी भोगणाऱ्यांचे. परंतु सर्वत्र व्याप्त भ्रष्टाचाराचे काय? लोकशाहीतील व्यवस्था लुळीपांगळी झालेली भासते. यांच्या दुष्परिणामांचा विचार कोण करणार? ‘हजार तोंडांचा रावण’ या  कथेत मी हा मुद्दा मांडला आहे. ‘सत्कार’, ‘बदली’, ‘चक्रवर्ती राजा’, ‘माणसाचा अंत’ या कथादेखील असल्याच काही विषयांवर आधारित आहेत. लेखक हा व्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण भाग असल्याने भ्रष्टाचाराच्या चिखलामुळे हादेखील आज प्रभावित आहे. लेखक फक्त लेखन करू शकतो ही पळवाट मी विनम्रतेने मान्य करतो.

सामाजिक बांधिलकीची भावनादेखील उत्तम व्यवस्थेसाठी पोषक आहे. ही भावना जितकी प्रबळ असेल तितकी व्यवस्था करणे सोपी ठरते. या सामाजिक बांधिलकीच्या प्रबळ भावनेसाठी वैचारिक प्रगल्भता गरजेची असते. ‘रेनबोथ’ आणि ‘नावात काय आहे?’ किंवा ‘रडायचं नाही’ या कथांमध्ये मी हे असले विषय हाताळले आहेत.

‘अपना लक…’ या कथेत सर्व काही फुकट मिळावे असल्या प्रवृत्तीवर आळा घालता यावा यासाठी मी माझे विचार मांडले आहेत, तर ‘रेवा आणि रती’ ही कथा अनेक वाचकांना पचण्यासारखी नाही याची मला जाणीव आहे. परंतु इथे कायद्यापेक्षा समाजात स्वीकारार्हता किंवा अस्वीकारार्हतेचा विषय येतो. परंपरा आणि रितीभातीपेक्षा सोयीप्रमाणे वागणुकीचा आणि मानसिकतेचा विषय येतो. आजच्या समाजात शिक्षितांचे लिव्ह इनमध्ये राहणे चालते, पण दूरस्थ गावांमध्ये काहींचे असले वागणे आपण आश्चर्याने बघतो. नुकतीच महाराष्ट्रातील एक बातमी वाचली होती, जिथे जुळ्या बहिणींनी एकाच मुलाबरोबर लग्न केले. परंतु माझी ही कथा मी दोन वर्षं अगोदर लिहिली होती. त्याचा आधार मध्यप्रदेशातील धार जिल्ह्याच्या एका गावात दोन बहिणींची ही वार्ता तेव्हा वर्तमानपत्रात खूप गाजली होती. मोठी बहीण दिव्यांग असून तिला उभेदेखील राहता येत नव्हते. सतत बसून असायची आणि तिचे लग्न होऊ शकत नव्हते. म्हणून लहान बहिणीने प्रण केला होता की जो मुलगा माझ्या मोठ्या बहिणीशीदेखील लग्नाला तयार होईल मी त्याच्याशीच लग्न करेन. आणि अशा प्रकारे दोघी बहिणींचे लग्न एकाच मुलाशी तेव्हा झाले होते. हे सगळे असले समाजशास्त्राचे विषय आहेत.

‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित माझा कथासंग्रह ‘हजार तोंडांचा रावण’ हा वाचकांसमोर आहे याचा मला फार आनंद आहे. जास्त काही माझ्या कथांवर लिहिणे म्हणजे वाचक आणि परीक्षणकर्त्यांच्या अधिकारावर हस्तक्षेप ठरेल. माझ्या विनंतीला मान देऊन मराठीचे प्रसिद्ध लेखक, माझे परम स्नेही संजय सोनवणी, पुणे, यांनी या कथासंग्रहासाठी प्रस्तावना लिहिण्याने माझ्या उत्साहात भर पडली आहे. मी संजय सोनवणी यांचा आभारी आहे.

माझ्या या कथासंग्रह प्रकाशनासाठी मी ‘ग्रंथाली’, मुंबई आणि विशेष करून माननीय सुदेश हिंगलासपूरकर यांचा आभारी आहे.

— विश्वनाथ शिरढोणकर

Avatar
About विश्वनाथ शिरढोणकर 7 Articles
मी एक सेवानिवृत्त असून साहित्यिक आहे. माझी हिंदी मराठीत 25 पुस्तके प्रकाशित असून, kUKU FM वर कादंबरी - मी होतो मी नव्हतो - 65भागात(अवधी-6-30 तास) आणि AAVAAJ.COM वर 16 कथा ऑडियो स्वरुपात उपलब्ध आहे. कादंबरी महाराष्ट्र शासन च्या ग्रंथमान्य यादीत सामील असून अनेक विद्यापिठात माझी कथा, कविता पाठ्यक्रमात सामील आहे.100 पेक्षा जास्त कथा,250 पेक्षा जास्त कविता आणि 150 पेक्षा जास्त लेख प्रकाशित. अनेक दिवाळी अंकात नियमित प्रकाशन. अनेक पुरस्कार/सम्मान प्राप्त.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (चंद्रपूर) सकट अनेक शहरात साहित्यिक कार्यक्रमात सहभाग.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दोन माजी अध्यक्ष, डॉ. श्रीपाल सबनीस आणि श्री भारत सासणे यांच्या प्रस्तावना माझ्या पुस्तकांसाठी लाभल्या आहेत. मी बृहन्महाराष्ट्रांतील एक आघाडीचा साहित्यिक आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..