नवीन लेखन...

सहकारी तत्त्वावर ग्रंथ प्रकाशनाचा प्रयोग

१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री द. दा. काळे यांनी लिहिलेला लेख


ग्रंथ प्रकाशन आणि वितरण क्षेत्रात सहकारी तत्वावर कार्य करणान्या ‘साहित्य प्रवर्तक सहकारी संस्था, कोट्टायम’ या केरळ राज्यातील संस्थेच्या कार्याचा तपशील पुढे दिला आहे. महाराष्ट्रातील सद्यस्थित ग्रंथव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर या प्रयोगाचे कार्य लक्षात घेणे अगत्याचे आहे असे वाटते. आपल्याकडे ‘ग्रंथाली’ सारखी संस्था तत्सद्दश्य कार्य करीत आहे. चकांचे ग्रंथ खरेदीच्या रूपाने सहकार्य मिळाल्याशिवाय उत्तमोत्तम ग्रंथांची निर्मिती होऊ शकत नाही. तसेच वाचकांना परवडेल अशा किंमतीत ग्रंथ उपलब्ध व्हावयाला हवेत. आपण विचार करावा असा हा प्रयोग आहे.

संस्था १९४५ साली स्थापन झाली. त्यावेळी सभासद १२ व भागभांडवल रु. १२० होते. १९४९ ला प्रथम पुस्तक प्रकाशित केले. पुस्तक विक्रेत्यांकडे विक्री सोपविण्यास २५% ते ३०% कमिशन पोटी खर्ची पडतात व पैसेही अडकून पडतात म्हणून ‘नॅशनल बुक स्टॉल, या नावाने स्वतःचे दुकान सुरू केले. या दुकानाच्या केरळ राज्यात नऊ शाखा आहेत. दरसाल विक्रो रु. साठ लक्ष आहे. रु. पंचेचाळीस लक्षांची मालमत्ता आहे. आता सभासद पांचशे व भाग भांडवल आठ लक्ष, त्यात सरकारचे भाग भांडवल अडीच लक्ष रु. आहे. दररोज एक पुस्तक प्रकाशित करतात. दरवर्षी सुमारे एक हजार हस्तलिखिते संस्थेकडे येतात – त्यातून ३५० ते ३७५ ची निवड करून प्रसिद्ध करतात. आतापर्यंत सुमारे चार हजार पुस्तकें प्रकाशित केली आहेत. इतर लेखकांनी प्रकाशित केलेल्या दोन हजार पुस्तकांचे विक्री हक्क संस्थेने घेतले आहेत. मल्याळीच नव्हे तर जागतिक कीर्तिच्या लेखकांच्या पुस्तकांची भाषांतरे प्रसिद्ध केली जातात. कै. वि. स. खांडेकर यांचे ‘ययाती’ या संस्थेने भाषांतरित करून प्रसिद्ध केले. शंभर पानाच्या पुस्तकाची किंमत साधारणपणे साडेचार ते पांच रुपये असते.

काही वैशिष्ट्ये

मल्याळी विश्वकोश खंड दहा प्रत्येकी हजार पानाचा किंमत सहाशे रु. प्रसिद्धिपूर्व किंमत चारशे रुपये. *’अवका-शिकल’ ही कादंबरी पृष्ठे चार हजार किंमत अडीचशे रुपये. * भारतातील सर्वात मोठे प्रवासवर्णन पृष्ठे तीन हजार या संस्थेचेच. * मल्याळी भाषेत महाभारत पृष्टे सात हजार या संस्थेचेच. * या संस्थेतर्फे ‘नॅशनल बुक स्टॉल बुलेटिन’ मासिक प्रसिद्ध होते. हे सर्व सभासदांना विनामूल्य दिले जाते. दरमहा दहा रुपये भरून सदस्य होणान्यास दोन वर्षात म्हणजे रुपये चाळीस भरुन दोनशे पन्नास रुपयांची पुस्तके देतात. पुस्तके ठेवण्यासाठी एक लोखंडाची मांडणी भेट म्हणून दिली जाते. हिंदी मल्याळी व इंग्रजी मल्याळी शब्दकोश प्रसिद्ध केले. ‘ए सर्व्हे ऑफ केरळ’ पृष्ठे ४५० संस्थेने प्रकाशित केले.

लेखकांना तीस टक्के हकदेय (रॉयल्टी) संस्था वेळच्यावेळी देते. स्वतःचा छापखाना व इमारत आहे. तेथे साहित्यिक निवासाची सोय आहे. संस्थेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, परिसंवाद, वादविवाद इ. कार्यक्रम केले जातात. उत्कृष्ट मल्याळी पुस्तकांना दरवर्षी पारितोषिके दिली जातात. पुस्तकाच्या किंमती सुमारे दहा टक्केपर्यंत नफा मिळविण्याच्या दृष्टीने ठेवल्या जातात. भागभांडवल धारकांना कायद्याने मान्य केलेला जास्तीतजास्त नऊ टक्के लाभांश दिला जातो. संचालकांची निवड दर तीन वर्षांनी सर्वसाधारण सभेत होते.

महाराष्ट्र आणि केरळ राज्यांची काही तौलनीक माहिती

एकूण लोकसंख्या                 महाराष्ट्र ५ कोटी                     केरळ २.५ कोटी
ग्रामीण लोकसंख्या                ” ” ७०%                           ” ” ८४%
साक्षरतेचे प्रमाण                  ” ” ३९%                            ” ” ८०%

उपर्युक्त तुलनेचा विचार केला तर असे दिसून येईल की, महाराष्ट्रात केरळ राज्याइतकेच साक्षर आहेत. साहित्य प्रवर्तक सहकारी संस्थेबरोबरच अन्य प्रशासन संस्थाही तेथे कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याकडील ग्रंथ व्यवहाराची स्थिती तपासून पाहिली पाहिजे.

— संकलन : द. दा. काळे

१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री द. दा. काळे यांनी लिहिलेला लेख

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..