नवीन लेखन...

जोडीदार निवडतांना – भाग २

नातं ….

—- नातं म्हटलं कि त्याचा थेट संबंध मानसिकतेशी जातो , आणि मानसिकता म्हणजे भावनांचा खेळ ! भावनांचा खेळ आपल्या नात्याचे भविष्य ठरवत असतो आणि त्या भावना म्हणजे प्रेम , वात्सल्य , त्याग , आदर , विनम्रता , विश्वास ,आणि  संयम

आजच हे धकाधकीचे  जीवन , बदललेला काळ असे म्हणून आपण जीवनातील या अत्यंत महत्वाच्या मानसिक पैलूंकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो . हेच पैलू आपले जीवन सुखी करीत असतात..

बदललेले दृष्टिकोन ….. . गृहिणी

कुटुंबाचा आधारस्तंभ , कि जिच्यामुळे कुटुंबव्यवस्था अबाधित होती ,प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम या सर्व भावना तिच्या ठायी असायच्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याची शिकवण कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला देत असे आणि ती म्हणजे ” आई “. आता काळ बदलला म्हणजे समाजाने बदलला ,जीवनातील मूल्ये बदलली , जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला , तंत्रज्ञाना मुळे कुटुंबातील भावनांचा एक घट्ट बंध होता तो सैल झाला एकमेकांपासून दुरावले , एकाच छताखाली राहत असले तरी काहीसे एकमेकांना अनोळखी ,

मूल्य

उत्कृष्ठ भावी पिढी घडवणाऱ्या या आईचे मूल्य हा समाज म्हणजे पर्यायाने पुरुष समजू शकले नाहीत .प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम ह्या गोष्टी जिच्याठायी होत्या तिला प्रत्येक बाबतीत गृहीतच धरलं गेलं तिच्यावर वर्चस्व गाजवलं गेलं .कालांतराने ती करिअर साठी घराबाहेर पडली . आणि नात्यांमध्ये कटुता निर्माण झाली . आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस येण्याच्या मार्गावर राहिली .

गरज कशाची

प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम .ह्या सातही हि गोष्टी ज्या दोघां जोडादारांमध्ये आहेत त्यांचे नाते कधीही तुटू शकत नाही , कितीही संकटं आली तरी या सात गोष्टी संकटावर सहज मात करतात . किंबहुना त्यांच्याइतकी सुखी जोडी दुसरी कोणती हि नाही ! तंत्रज्ञानामुळे जीवन जरी वेगवान झालं असाल तरी याच तंत्रज्ञानाने प्रत्येक व्यक्तीला आत्मकेंद्रित बनवलं . त्यामुळे वात्सल्य ,त्याग , विनम्रता , विश्वासआणि सर्वात महत्वाचा म्हणजे संयम ह्या गोष्टी हळू हळू मनातून हद्दपार होऊ लागल्या आणि त्यांची जागा अहंकाराने घेतली. प्रेम आणि आदर ह्या गोष्टी गरजेपुरत्याच राहिल्या . पैसा गाडी बंगला सर्व काही आहे पण सुख काय म्हणतात ते कधी अनुभवलच नाही अशी परिस्थिती बहुतांशी होते .

काय करावं – नातं हे मनातील भावनाच्याच खेळावरती अवलंबून असत ,हे जोपर्यंत समाजाला , समाजाला नव्हे  आपल्यापासूनच सुरवात करूया – जोडीदार निवडतांना आपल्यामध्ये ह्या सातही गोष्टी आत्मसात करावयास शिकाव्या , जोडीदार होणाऱ्या कुटुंबाशी नुसतेच औपचारिक बोलण्या ऐवजी त्यांचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करावा ..पैसा जीवनात आरामदायी सुखवस्तू निश्चितच देईल पण सुख मिळेलच असे नाही .आपण ज्या जोडीदाराबरोबर आयुष्य सुरु केलं आहे ,तेव्हा सुरवातीच्या काळात त्याला समजून घेतलं तर पुढील आयुष्यात ते उपयोगी ठरेल . विशेष करून स्त्रियांचा हरवलेला पैलू ” आई ” होण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच जोडीदारामध्ये हवा तसा बदल घडू शकेल आणि दोघांमधील नातं निश्चितच घट्ट होईल

लक्षात ठेवा .आजच्या बदलत्या काळात व्यक्ती स्वातंत्र इतकं फाजील बोकाळलं आहे कि सतत एकमेकांवर कुरघोडी करण्या पलीकडे कोणताही संवाद होत नाही .जगण्यासाठी पैसा निश्चितच आवश्यक आहे पण जगण्याचे ध्येय पैसा असू नये . जीवन हे बंधन युक्त असेल तरच सुखी होऊ शकत.

भिन्न संस्कार ,  भिन्न परिस्थितीतीत  वाढलेली माणसे एकत्र राहू लागतात तेव्हा नेमकं काय करणं आवश्यक आहे, घटस्फोटापर्यंत का वेळ यावी या सर्वाचा उहापोह पुढील लेखात….

घटस्फोट ? का ? आणि कशासाठी । Divorce ? Why ?

https://vinatasocial.blogspot.com/ स्वतःच्या ब्लॉग वरून मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी

Avatar
About malakans 5 Articles
साधारण 20/ 25 वर्षा पूर्वी मासिकातून , नियतकालिकातून , साहित्य लेखन सध्या facebook ,twitter , whatsapp वरुन वैचारिक लेखमाला वैचारिक चर्चा - अत्यंत आवडता विषय तसेच संगीत साधना , नवीन गाण्यांची निर्मिती food प्रोसेसिंग चे अनेक courses केले .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..