नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

संवाद हृदयाशी

हृदयाशी संवाद साधणे म्हणजे नेमके काय? हृदयाशी संवाद साधणे म्हणजे दोन गोष्टी तपासणे. एक तर तांत्रिकदृष्ट्या आपले हृदय आणि त्याचे कार्य उत्तम स्थिती मध्ये आहे का हे तपासणे. आणि दुसरे म्हणजे भावनिक तसेच मानसिक दृष्ट्या दैनंदिन जीवनातील घडामोडींना सामोरे जाताना त्या घडामोडींचा आपल्या मनावर म्हणजेच नकळत आपल्या हृदयावर आपण कितपत परिणाम करून घेतोत? […]

निरंजन – भाग २४ – माता दुर्गा

संपूर्ण सृष्टीला संकटातुन मुक्त करण्यासाठी साक्षात त्रिदेव ध्यानाची अवस्था धरतात आणि आपल्या ध्यानातुनच देवी शक्तीचे रुप निर्माण करतात. त्या शक्तीरुपी देविमातेची नऊ रुपे निर्माण होतात. या नऊ मातेची रुपे एकत्रितपणे येऊन एकच शक्तिशाली अवतार तयार होतो. ज्या अवताराला आपण सर्वजण माता दुर्गा म्हणून ओळखतो. त्रिदेव आपला आशीर्वाद म्हणून आपली शस्त्र मातेच्या हाती अर्पण करतात. यानंतर माता दुर्गा असुर म्हैशासुराचा वध करण्यासाठी समर्थ होतात आणि अखेर असुर म्हैशासुराचा वध होतो. म्हणूनच माता दुर्गेला महिषासुरमर्दिनी म्हणूनही संबोधण्यात येते. […]

श्रध्दारूपेण संस्थिता

अनेक उपयुक्त मंत्र ( ज्याला आपण tailor made म्हणतो) जसे दत्तमाला,गुरुचरित्र,पद्मपुराण,नवनाथ, “दुर्गासप्तशती “मध्येही आहेत.मला  सर्विस मध्ये विपदा यायच्या तेंव्हा “ॐरिम सर्व बाधा प्रशमन,…..वैरी  विनाशनम रिम ॐ ” मंत्राचा खुप चांगला अनुभव आला. माझ्या वाचनात आलेल्या अन्य संदर्भात  उपचारांसंबधीत काही मंत्र/ स्तोत्रांच्या उल्लेख आहेत ,त्यांचा प्रयोग म्हणा, उपयोग म्हणा, करून बघता यावा म्हणुन शेअर करतो आहे : […]

निवृत्ती

सृष्टीमध्ये प्रारंभ आणि अंत हे चक्र सदैव सुरूच असतं. एखाद्या रोपट्याचंच उदाहरण घेऊया. पहिला कोंब फुटतो आणि प्रारंभ होतो रोपट्याचा. तो कोंब उमलतो, ज्याला आपण पान असं म्हणतो. अगदी हिरवंकंच असतं ते. कालपरत्वे उत्कर्षबिंदूनंतर हळूहळू पानाचा रंग बदलायला लागतो आणि नंतर ते पान सुकायला लागतं आणि एके दिवशी ते पान गळून पडतं. पानाचा रंग बदलायला सुरूवात होणे आणि ते सुकायला लागणे ही झाली निवृत्ती. […]

कौटुंबिक मूल्यशिक्षण काळाची गरज

…. परंतु तरीही मानव असुरक्षित आहे कारण कमावलेल्या सामर्थ्याबरोबर त्याच्याशी सुसंगत अशी मानवता, संस्कार जपणारी योग्य मूल्ये जोपासली गेलेली नाहीत. त्याची आज गरज आहे. नुसती प्रगती महत्त्वाची नाही, तर तिला मूल्यांची जोड असणेदेखील अत्यावश्यक आहे कारण ढासळलेली मूल्ये त्या प्रगतीला गालबोट लावतात. म्हणूनच आज घराघरांतून मूल्य शिक्षण देण्याची गरज आहे. […]

आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो…

आश्विन शुक्ल  प्रतिपदेला होणारी घटस्थापना ह एक काम्य व्रत आहे. काळाच्या ओघात या व्रताला अनेक कुटुंबात कुलाचाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देवीचे नवरात्र हे वसंत(चैत्र) आणि शरद(आश्विन) या दोन ऋतूमध्ये साजरे केले जाते. त्यापैकी शारदीय नवरात्री याविषयी हा संक्षिप्त परिचय […]

निरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्

कधी कधी जे कार्य बोलुन साधता येत नाही, ते फक्त मौन धारण करूनच साधता येते कारण जेव्हा आपण मौन बाळगतो त्या वेळेला आपल्या अंतर्मनातली उर्जा अधिकाधिक कार्यरत होते. आपली इच्छाशक्ती जास्त कार्य करते. आपली परिपूर्ण एकाग्रता एखाद्या कार्यामध्ये कितीतरी पटीने एकवटली जाते. […]

निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो

हे क्षणात विचारांना परावर्तित करणारे वळण जर आपण संतुलित राहून सांभाळले तर आपले सदविचारही आपल्याला सोडत नाहीत. म्हणूनच सद्विचार हा थोर सोडू नये तो… कारण सदविचारच आनंदाला प्रत्यक्षात आपल्या जीवनात कसे आणायचे ते शिकवतात. […]

निरंजन – भाग २१ – अन्न हे पूर्णब्रम्ह…

नामस्मरणासाठी कोणतेही मूल्य लागत नाही. याउलट नामस्मरणामुळे सहजपणे आपल्याकडून एक हवन (होम) घडते. शरीराला ऊर्जा मिळवून देणारे आणि स्फूर्ती मिळवून देणारे, हे अन्न साक्षात परब्रम्ह आहे. अन्नग्रहण करणे म्हणजे नुसते पोट भरणे नव्हे तर तो एक यज्ञ कर्म आहे हे जाणून घ्यावे”. […]

बेताल आणि बेभान

सुशांत सिंहच्या मृत्यूपासून अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूड मधील नेपोटिझ्म विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. नंतर या केसला ड्रॅगचा अँगल जोडल्या गेल्यावर ड्रग्ज माफियांविरोधातही कंगणाने आवाज उठवला आहे. एकाद्या क्षेत्रात काही चुकीचे घडत असेल तर त्यावर आवाज उठवलाचं पाहिजे. त्यात काहीही गैर नाही. आणि, व्यवस्थेलाही प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार आहेच. पण, हे करत असताना तारतम्य ठेवून बोलणे अपेक्षित असते. महाराष्ट्र पोलिसांबाबत कंगणाने वापरलेली भाषा किंवा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्याचा प्रकार कोणत्याच दृष्टीने समर्थनीय ठरणार नाही. […]

1 56 57 58 59 60 134
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..