नवीन लेखन...

आठवणीतील शिक्षक

आपलं वय तीन वर्षे पुर्ण झालं की एक माणूस आपल्या आयुष्यात डोकावतो तो साधारणपणे पुढची सतरा वर्षे आपल्या सोबत असतोच, वेगवेगळ्या रूपांत. हा माणूस म्हणजे ‘शिक्षक’. या वेगवेगळ्या रूपांपैकी काही रूपं, रुपं म्हणण्यापेक्षा काही माणसं म्हणुया, सदैव आठवणीत रहातात. पण आपल्या आयुष्यात निव्वळ हेच शिक्षक असतात का ? मला नाही असं वाटत. या शिक्षकांव्यतिरिक्त इतर अनेक माणसं शिक्षकाच्या रुपात आपल्याला भेटत असतात, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत. […]

तो पुन्हा आलाय

तो पुन्हा आलाय पण तो गडबडलाय आणि गोंधळलाय थोडासा हिरमुसलाय त्याच्या स्वागताची तयारी नाही उत्साह तर कुठेच दिसत नाही उत्सवी वातावरण नाही कसलीच लगबग नाही नेहमी कशी जय्यत तयारी असते स्वागताची सर्वांनाच प्रतिक्षा असते त्याच्या आगमनाची महिला वर्गाला पर्वणीच नटण्यामुरडण्याची बालगोपाळांना मोदक पटकावण्याची कलात्मक आरासी केल्या जातात पानाफुलांनी मखरं सजवली जातात घराघरांतून पूजा अर्चा केल्या जातात […]

मी एकटी, मी एकाकी

अरे, एव्हाना ती यायला हवी होती ! अजून कशी उगवली नाही ती गवताची पाती ! ती आल्यावर प्रार्थनेचे सुर उमटतात. आसमंत उजळून निघतो, लता वेली डोलू लागतात. सुरू होते पूजा अर्चना आणि सरस्वतीची आराधना. मध्येच पोटात कावळ्यांचा कलकलाट. खाऊ झालाच समजा सफाचाट. कधी कधी ऐकू येतो गलका. माझ्या कानांना मस्त बसतो दणका. थोड्या वेळाने परतायची वेळ […]

निवृत्ती

सृष्टीमध्ये प्रारंभ आणि अंत हे चक्र सदैव सुरूच असतं. एखाद्या रोपट्याचंच उदाहरण घेऊया. पहिला कोंब फुटतो आणि प्रारंभ होतो रोपट्याचा. तो कोंब उमलतो, ज्याला आपण पान असं म्हणतो. अगदी हिरवंकंच असतं ते. कालपरत्वे उत्कर्षबिंदूनंतर हळूहळू पानाचा रंग बदलायला लागतो आणि नंतर ते पान सुकायला लागतं आणि एके दिवशी ते पान गळून पडतं. पानाचा रंग बदलायला सुरूवात होणे आणि ते सुकायला लागणे ही झाली निवृत्ती. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..