नवीन लेखन...

श्रध्दारूपेण संस्थिता

मध्यंतरी एका सुवासिक उदबत्तीच्या पाकिटावर एक सुंदर वाक्य लिहिलेले वाचण्यात आले- -Everyone has a reason to pray ! मला ते वाक्य खुप आवडले कारण खरोखरीच माणसाला देवाची प्रार्थना करायला एक तरी कारण असतेच.ज्याचे जीवन विना समस्यांचे पुर्ण समाधानकारक व्यतित होत असते त्याला मात्र( नास्तीक असल्यास गोष्ट वेगळी ) बहुदा देवापुढे हात जोडायचे ,प्रार्थना करायची गरजच वाटत नाही अर्थात देवावर श्रध्दा असणे गरजेचे आहे.शिवशंकराच्या शक्तीचे प्रतीक ही जग् तकल्याणकारी आदीमाया देवी च आहे अशी धारणा  आहे. ब्रम्हा आदी देव सुध्दा तिचे पुजन करतात असे म्हणतात. देवीची अनेक रूपे कल्पित आहे जसे ब्रम्हचारिणी,महागौरी,नवदुर्गा,चामुन्डा,वैष्णवी वगैरे. श्री देवी सप्तशतीतील देवीसूक्तांत उल्लेख आहे की  प्रत्येक जिवात्म्यात विविध(एकोणीस) गुणांनी तिचा वास असतो,जसे बुध्दी,शक्ति,लज्जा,कान्ति वृत्ति इ. ज्यापैकी एक आहे “श्रध्दा”- –

“या देवी सर्वभूतेषु श्रध्दारूपेण संस्थिता,नमस्तस्ये ।नमस्तस्ये। नमस्तस्ये नमो नम:  ॥”

अर्थात ‘श्रध्दे’च्या रूपात पण ती आपल्यात असते,फक्त आपण तिला तसे ओळखायला हवे व तसे झाल्यास साहाजीकच ती आपल्यात भक्ति स्वरूपात प्रकटते.विश्वास व आत्मविश्वास यावरुन एक गंमत आठवली ती अशी- –

थाॅमस फ्रिडमॅन ( Thomas Friedman )या प्रसिध्द अमेरिकन समिक्षकाचे नुकतेच भाषण झाले व ते न्युयाॅर्क टाईम्स ( New York Times )मध्ये प्रकाशित झाले आहे व त्याचा अंश सोशल मिडीयावर पसरला( viral ) आहे . त्यांत एक आश्चर्यकारक निरीक्षण नमुद आहे ( गब्बर सिंग आ ज़ायगा च्या धर्तीवर –) ते असे –

“When we were young kids growing up in America, we were told to eat our vegetables at dinner and not leave them. Mothers said, think of the starving children in India and finish up the dinner’.

And now I tell my children : ‘Finish your homework. Think of the studious children in India, who would become CEOs and make you starve, if you don’t.’!

वरील निरीक्षण हे दर्शवते की कुठल्याही गोष्टींचा अर्थ आणी तर्क हा कालमानानुसार कसा बदलतो ! भारताला कमी लेखण्याच्या प्रयत्नात, न कळत त्यांनी भारताचा गौरवच व्यक्त केला .सर्चच क्षेत्रात भारताची प्रगती डोळ्यात खुपण्यासारखी असल्याने,हताश अमेरीकनांचे  भारतीयकरण( Indianise) न होऊन जावो ह्या भिती पोटीच श्री ट्रंम्फ यांना व्हिसा,ग्रिन कार्ड वगैरे च्या बाबतीत विषेश क्ल्यृप्त्या काढाव्या लागत आहे.आपल्याकडे मात्र आपण पाश्च्यिमात्य संक्रृतीला आंधळेपणाने कुरवाळण्यात धन्य मानतो,हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

आपल्या पुरातन ज्ञानसंपदेचा फायदा फार पुर्वीपासुन  परदेशातच जास्त घेतला गेला व अजुन पण घेतला जात आहे .आपले ज्ञानकोष मुख्यत्वे संस्कृत भाषेत आहेत व आपण आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवण्यासाठी,संस्कृत ऐवजी परदेषी भाषा कौतुकाने शिकवतो.आपण शिकवतो म्हणण्यापेक्षा आपल्या शाळा शिकवतात .पुर्ण महाराष्ट्राबद्दल तर माहीत नाही पण शिक्षणाच्या माहेरघरी ,पुण्यात जर्मन,फ्रेंच ह्या भाषा दुय्यम भाषा(second language ) म्हणुन अभिमानाने शिकवल्या जातात,कारण हे दिले जाते की संस्कृत शिकवायला शिक्षकच मिळत नाहीत , ह्याहुन जास्त अधोगति ती काय असणार ? एरवी पुण्याला Oxford of East ,पुण्यनगरी,संस्कारधानी,संतांची तपोभूमी,शिवाजी व पेशवाईचे किती ही गुणगान गायले तरी संस्कृतचा घरीच झालेला असा अवमान बघीतल्यावर आपल्या आध्यात्मिक धरोहरी ला पुढच्या पीढी ने जतन करुन ठेवण्याची अपेक्षा निरर्थक च म्हणायची .जननी जन्म भुमिश्च स्वर्गादपि गरियसी वगैरे भाषणापुरतेच. बर्याचशा योगीक व कंठस्थ, वैदिक गोष्टी पिढ्यान -पिढ़्या पाठांतराने मुखोदगत स्वरूपातच चालत आलेल्या आहे,व हल्लीच्या तरूणाईला पाठांतराचे तर जणु वैरच आहे. संगणकाच्या उत्क्रांती बरोबरच माणसाला बौध्दिक अधोगति चा शाप ही मिळाला आहे की काय असेच वाटु लागले आहे. साधे पाढे पाठ न करता त्यासाठी कंप्युटर लागतो तर मंत्रोच्चारा ची तर एलर्जी च म्हणावी लागेल

स्वास्थ व चिकित्च्सा क्षेत्रात उन्नती होऊन एकीकडे माणसाचे आयुर्मान उंचावते आहे तर दुसरीकडे मनुष्य अधिकाधिक  भौतीक सुखसोईंमुळे,शारिरीक सुखाच्या अधीन जाऊन चाकोरीबध्द परंतु शारीरिक द्रृष्ट्या गतिशुन्य  परंतु धकाधकीच्या जीवन शैलीत ,आळशी होऊन अनेक रोगांना आमंत्रण देऊ पहातो आहे.परिणामत: तो बालपणापासुन मानसिकरुपाने दुर्बल होत चालला आहे .आत्मशक्ती व आत्मबला चा अभाव यामुळे शारिरीक  व्याधिंनी ग्रस्त झाल्यावर उशीर झालेला असतो व बरेचदा औषधांचा परिणाम,”पी हळद आणी हो गोरी “असा लगेच होत नाही ,अन्यथा व्याधि  किरकोळ असेल तर साध्या मंत्रोच्चारा नी पण ठीक होते .लहान मुलांना लागल्यावर सर्व साधारण पणे आपण “आला मंतर ,काला मंतर मेली,माशी दाँत-घाशी—-अमक्या अमक्या चा बाऊ बरा होऊन जाशी .”म्हणतो व बरा होऊन जातो.खर तर त्यांना टेंगुळ आलेले असते किंवा दुखत असते.हे नुसते मानसिक (psychological ) नसते,त्यांत मुलांचा आपल्यावरचा विश्वास (confidence )म्हणजे आत्मशक्ती काम करत असते.मुलांना काहीच समजत नसते पण आत्मबला मुळे खरे काम होते. माझ्या वाचनात आले होते की ” श्रीक्रृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणताय क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम: ” हा मंत्रजप केल्याने दु:ख हरण होते. मला त्याचा आर्थ्रायटीस मधे सकारात्मक अनुभव आला.माझी नात लहान असताना,(तिला धड़ उच्चार ही येत नव्हते तेंव्हा ) तिच्यावर तसेच नातवावरही हा प्रयोग केला व खुप फ़ायदा व्हायचा . अर्थ हा की पुर्ण श्रध्देनी जर हे केले तर फ़ायदा निश्चीत होतो . मनांत त्रायते,इती मंत्र: म्हणतात नं ! इतकेच काय, बिना श्रध्देने परंतु निर्मल मनांने केलेल्या क्रियेने जर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो तर अशक्य ते काय ?

अमेरिकेचे पुर्व अध्यक्ष आयझेन हॉवर यांची गोष्ट माहीत असेल- बालपणी गैंगरीन मुळे त्यांचा पाय कापावयाचे ठरले होते पण त्याच्या श्रध्दापुर्वक प्रार्थनेने ते  टळले .गंमत म्हणजे एका अगदी लहान मुलाने ,ज्याला काहीच येत नव्हते,त्याने पण त्यांचेसाठी प्रार्थना केली म्हणे.प्रार्थना इतकी उपयुक्त झाल्याने त्याला विचारण्यात आले की तु कोणचा मंत्र म्हटला तर तो म्हणे “मी ABCD,ABCD ” च म्हणत होतो ! त्याला दुसरे कुठे काय येत असणार ?आहे नं कमाल मंत्राची ? मंत्र काही जादु नाही,मात्र मीराबाई सारखे इश्वराप्रती निर्मळ प्रेम व प्रबळ इच्छाशक्ति असेल,तर  मिळणारे फल मात्र मंत्रमुग्ध करणारे असणार हे निश्चीत !  मंत्र हा एक अक्षरी ॐ( सगळ्यात powerful बिजमंत्र ) असुन ,त्याचा शास्रोक्त उच्चार सगळ्यांना जमत नाही म्हणुन त्याला इतर देवतांचे नांव जोडुन अनेक मंत्र प्रयोजले आहेत उदा : ॐ नम: शिवाय ,जो सर्व सामान्यांना सोपा आहे .दुसरा शक्तीपुर्ण मंत्र ‘ गायत्री मंत्र ‘ होय पण तो सहसा पुरुष वर्गासाठी  आहे .बिजाक्षराला जोडुन अर्थपुर्ण शब्द/अक्षर यांच्या श्रृति समुहांच्या पंक्ति ,तर लांबलचक श्लोक, स्तोत्र असु शकतो. सर्वविदित  “रामरक्षा ” स्तोत्र हा मंत्र च होय.( रामरक्षास्तोत्रमंत्रस्य….). ह्याचा चांगला अनुभव बरेच जणांना येतो .उदा : काही विपत्ती,आल्यास ” आपदामहर्तारम …….सुखसंपदाम् ” पर्यंत म्हणणे वगैरे .

संसार किंवा जीवन म्हटल तर ,सगळ्यांनाच काही न काही दु:ख/क्लेष असतात. अशा वेळी कोणी मदत देऊ केली,  नुसती विचारपुस केली तरी मोठा आधार वाटतो .कोणी नसले तर कर्त्या करवत्या परमेश्वराच्या क्रृपेची आशा ,अपेक्षा असते . जसे सर्व सामान्य माणसाला केलेली स्तुति आवडते तद्वतच माणसाला वाटते की ईश्वराला पण स्तुति आवडेल . त्यामुळे श्रध्दा,विश्वासा नुरुप आपल्या वेगवेगळ्या देवतांना खुष करण्याच्या हेतुने ऋषि मुनींनी विशिष्ट उद्देशाने विवीध स्तोत्रे रचली,व तीच प्रचलीत झाली .स्तूयते इति अनेन स्तोत्रे ! ह्या स्तोत्रांच्या पाठाने,विशिष्ठ फलश्रृती प्राप्त होते असा अनेकांना अनुभव येतो. ही स्तोत्रे जर स्पष्ट उच्चाराने,पुर्ण श्रध्देनी म्हटलीत, तर त्यांचा परिणाम हमखास होतो,स्पष्ट उच्चाराने कंपने/लहरी (waves)निर्माण होतात ,त्यांचा परिणाम शरिरातील विवीध उर्जा केंद्र बिंदुंवर( सात चक्रांवर)तसेच ते नियंत्रित करणार्या अवयवांवर होऊन ,पर्यायानी आत्मशक्ती वाढते व त्यामुळे व्याधिंचे समूळ उच्चाटन होते . शरिरातील विवीध चक्रे ,विवीध ग्रह व देवतांच्या नियंत्रणाच्या अधीन असतात ,हे तर विदित आहे.

वर उल्लेख केल्याप्रमाणे,वैखरीतुन(वाणी) स्पष्ट उच्चार अपेंक्षीत  आहे,परंतु प्रार्थना / भक्ती करण्याचा एक पारंपारिक प्रकार आहे -मोठ्या आवाजात मंत्रोच्चार न करता माळ जपणे,अर्थात मानस पुजा .मग प्रश्न येतो की लहरी,कंपने नसता आत्मबल कसे वाढते? या संबंधात ” ब्रम्हकुमारी “च्या बी के शिवानी बहेनजी यांचे एका प्रवचनात ऐकताना असे कळले की यांबाबत अनेक शोध झाले आहेत. पारंपारीक मंत्रोच्चार करणार्यांच्या व मानस पुजेतुन निर्माण होणार्या भावनांची शक्ती ,elctroencellograph ( EEG) च्या माध्यमातुन सारखी (बरोबर) च आढळुन येते .म्हणुनच परिणाम /फलश्रृती दोन्हीत प्राप्त होते,अर्थात भावना,श्रध्दा अधिक महत्वाच्या ! त्या व्यक्त करण्याच्या पध्दती वेगवेगळ्या का असेनात,जसे भजन,किर्तन,प्रवचन,जप. इश्वराप्रती त्या भावना असतील तर त्रिताप ( दैहीक,भौतीक,दैविक ) हारिणी अशी प्रार्थना पण गरजेची नाही,एखादे नुसते सत्कर्म ,सत्कार्य पण भरीव अशी मौन प्रार्थना च ठरते .वेदपुराणात तर व्याधीमुक्ती साठी औषधांबरोबर “उपासने ची जोड ” ही सांगितली आहे .ह्यापुढे जाऊन,अष्टांग ग्रंथात  तर  ” मातंर पितंर देवांन वैधान विप्रांत हरं हरिंम असा उल्लेख आहे म्हणतात .अर्थात  प्रार्थनेच्या जोड़ीला माता,पिता,ब्राम्हण यांची पुजा (आशिर्वाद) ग्रृहित आहेत. म्हणुनच पुजा अर्चने मध्ये ,मात्रृदेवं भव,पित्रृदेवं भव, तसेच  गुरुर्ब्रम्हा गुरूर्विष्णु…. म्हटले जाते नाही कां?

अनेक उपयुक्त मंत्र ( ज्याला आपण tailor made म्हणतो) जसे दत्तमाला,गुरुचरित्र,पद्मपुराण,नवनाथ, “दुर्गासप्तशती “मध्येही आहेत.मला  सर्विस मध्ये विपदा यायच्या तेंव्हा “ॐरिम सर्व बाधा प्रशमन,…..वैरी  विनाशनम रिम ॐ ” मंत्राचा खुप चांगला अनुभव आला. माझ्या वाचनात आलेल्या अन्य संदर्भात  उपचारांसंबधीत काही मंत्र/ स्तोत्रांच्या उल्लेख आहेत ,त्यांचा प्रयोग म्हणा, उपयोग म्हणा, करून बघता यावा म्हणुन शेअर करतो आहे :

व्याधी.                                              आध्यात्मिक उपाय.

……………                                     ……………………..

नर्व्हज,मणका इ……………..                 ज्ञानेश्वरी १० वा अध्याय पाहिल्या ५ ओव्या .

मासिक धर्म…………………..                ज्ञानेश्वरी पाठ रोज़ ३०० ओव्या,हरीपाठ,पसायदान.

अनिद्रा……………………….                ज्ञानेश्वरी १२ वा अध्याय पहिल्या १६ ओव्या .

Frustation…………………                 सप्तशती ५वा अध्यायातले स्तोत्र.

स्वप्नदोष/ बी पी……………..                ॐ जप

अव्यक्त क्रोध,जळफळाट………                ॐ जप ( १० मि ),मॉं भगवती प्रार्थना .

मतभेद,वितुष्ट, अडीअडचणी, आजार..          ज्ञानेश्वरी ४था अध्याय।

स्मृतिभ्रंश/विस्मृती…………………           ३२ अक्षरी महामंत्र
“हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे क्रृष्ण हरे क्रृष्ण, क्रृष्ण क्रृष्ण हरे हरे।। ”

३ म. चंडीपाठ

हताशावस्था………………………             अष्टमी किंवा नवमी किंवा चतुर्दशी ला चंडीपाठ.

बाहेरची बाधा…………………….              हनुमान चालिसा ११ दा पाठ.

चंचलता अभाव, मेंदु , मन जाग्रृती….            अथर्वशिर्ष रोज़ १दा ,चतुर्थीला जास्तीदा .

दारिद्रय ( रोग ? )मुक्ती…………..             श्रीसुक्त पाठ/महालक्ष्म्यष्टकम् स्तोत्र.
”  या देवी …….नमो नम: “,किंवा देवीसुक्त पाठ .

अनाहिक भिती, हुरहुर……………               रामरक्षा, मारोती स्तोत्र.

आजार बिना निदानाचा…………….            विष्णुसहस्त्रनाम जप.

संकट निवारण……………                      “अनुसया अत्रि संभुतो,दत्तात्रया दिगंबरा ।
स्मरता गा मी स्वभक्तानां ,उध्दरती भव संकटात ।।”
व  जप .

हार्ट अटैक येतो आहे अशी  शंका असताना …………..     ”  विठ्ठल “नाम सतत (ह्याने दिर्घ श्वासो्श्वास होतो)

काही उदाहरण ,म्हणुन वर टिप्स दिल्यात, अजुन अनेक वैदिक स्त्रोत (sources)आहेत ,ज्यात,असे अनेक मंत्र मिळतात. अर्थात विश्वास ठेवला तर लाखाचे काम होते, नसला तर गंगार्पणमस्तु ! देवाचा अंगारा, मानला तर अमृततुल्य, नाही तर शेवटी ती राखच. म्हणतात नं विश्वासावर तर पुर्ण दुनिया टिकुन आहे.

एक गाणं आहे नं,  देवा तु आगळा वेगळा, आम्ही तर सारे कचरा पाचोळा !

— सतीश परांजपे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..