नवीन लेखन...

चक्र ऋतुंचे

जगायचे ते जगले नाही काही राहीले श्वासही भगवंताचे नाही काही आपुले जन्म, मृत्यु प्रवास ते भ्रमणही आपुले बाहुले, कळसूत्रीचे चक्र ऋतुंचे चालले दशदिशा भारलेल्या नेत्री दृष्टांत रंगलेले भोगणेच संचिताचे या जन्मी लाभलेले पसरूनी दोन्ही बाहु क्षणक्षण ते झेललेले हेच सत्य साक्षात्कारी अस्ताचली सांज रंगले — वि.ग.सातपुते.(भावकवी ) 9766544908 रचना क्र.१७४ २०/७/२०२२

गप्पा निळाईशी

असेच एका सायंकाळी, सहजी पाहिले आकाशी, निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी, बोलू म्हटले देवाशी. उलगडलो उघड्या जमिनीवरती, अनं हाताची केली उशी, निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी, बोलू म्हटले देवाशी. आंथरलेला होता वरती, मैलोगणती गालीचा , चमचमणारी नक्षी त्यावरी, वापर केला ताऱ्यांचा. रेलायाला बैठकीवरी, मऊशार ढगांची केली उशी, निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी, बोलू म्हटले देवाशी. एकेरीवर आलो अनं मी, साद घातली देवाला […]

शेवट असावा असा..

शेवट असावा असा. नुकताच दारात . कवडसा आलेला जसा. झरकन नाहिसा होतो तसा… शेवट असावा असा पहाटे गवतावरचा दवबिंदू असतो जसा. एका क्षणात नाहिसा होतो तसा.. शेवट असावा असा. आळवावरचा थेंब असतो अगदी जसा. मोती मोती म्हणेपर्यंत घरंगळून जातो तसा. शेवट असावा असा. पावसाच्या रेशिम. धाग्यासारखा. ओंजळीत न येताच वाहून जातो तसा.. शेवट असावा असा. प्राजक्ता […]

आधारवड

गारेगार सावलीचा, भला थोरला आधारवड. पारंब्या झुलवत – अलवार कुरवाळणारा. मनसोक्त खेळलोय, अंगाखांद्यावर त्याच्या. गाढ झोपून गेलोय – मांडीवर पाराच्या. उन्हाळा पावसाळा थंडी – सकाळ सायंकाळ, मग्न व्रतस्थासारखा – वावर तिन्हीत्रिकाळ. मोठा झालोय खेळता खेळता, त्याच्याच सावलीत, तो सतत उभाय आम्हाला – आवर्षणापासून वाचवित. आधारवड आता थकलाय, पानापानांतून सुकलाय. मूळ कुडीतुनच पूर्ण – वृद्धत्वाकडे झुकलाय. निखळलेल्या […]

शापित आत्मे

स्वयंप्रेरित, स्वयंप्रेषित हे सदा आपल्या जोषात आभाळओझे घेऊन खांद्यावर धावधावती कैफात नाही साथ कुणाची, नाही कसली सहानुभूती तरीही चिंता जगाची, आसक्तीची करुन सक्ती कुणी वंदा कुणी निंदा, करे कुणी वा वंचना नादावलेल्या कर्मयोग्यांची असे व्रतस्थ आराधना अशक्याचा हव्यास त्यांना, अचूकतेचा ध्यास केवढा सौख्याशी करुन वाकडे, पुकारत स्वत:शी स्वत:चा लढा आत्यंतिकाची अस्वस्थता सततच्या जणू प्रसूतिवेणा अखंड असे […]

हव्यास

रुसवे फुगवे, तंटे बखेडे हवे कशास लढाई झगडे अतीतटीचे हे हेवेदावे आत्यंतिक द्वेषाचा सोस कशाला? ।। आभाळाच्या मुक्ततेला नाही बंध देवाच्या मायेला ना बंधाचा गंध भिंतीआडच्या कृत्रिम जगाचा तुम्हाआम्हाला मग ध्यास कशाला ॥ जमिनीच्या हक्काच्या तुकड्याला कुंपणात जोखण्याचे ध्येय आम्हाला मुक्त हवा करुन कलुषित या छपराखाली कोंडला श्वास कशाला ॥ आयुष्याची वरात ही रिकामहाती घर भरण्याची […]

माझं गुपित

काळजाच्या डबीत, मनाच्या कुपीत जपलय् मी माझं इवलसं गुपित ॥ आहे त्याचा तर आनंद आहे नसत्याची नाही उणीव काही आनंदपरिमल दुःखाची मळमळ कुठल्या भासाची, तळमळ न ठेवत जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ १ ॥ चक्रावणाऱ्या या चक्रव्यूहातून गुदमरवणाऱ्या गाढ गर्दीतून विवंचनांच्या वावटळींमधून शहाणपण माझं आटोकाट जपत जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ २ ॥ जीवाचा […]

पाय

आपल्या हिमतीवर उभे रहाण्यापासून ते xxला लावून पळण्यापर्यंत पायांचा मानवी जीवनात भक्कम पाया आहे. गोष्टींना पाय फुटून त्या नाहीशा होणे किंवा तोंडात पाय (Foot in mouth) घालण्यापर्यंत आपण ऐकलं आहे, पण पायाला तोंड फुटलेलं अजून ऐकिवात नाही म्हणून हा प्रपंच! पाळण्यातले इवले इवले पाय नाचरे निखळ, नितळ निष्पापसे मखमली गोबरे निवांत शांत, भाबडे पहुडले बहुतसे सारे […]

ब्रह्मसुखदा

सरिते सारखेच जगावे सदैव प्रवाहित असावे कशाचीच तमा नसावी मुक्त निर्भयी संथ वहावे हवे कशाला उगा चिंता भाळीच्या सुखदु:खांची विवेकाची कास धरावी सत्कर्मात झोकुनी द्यावे धनी जन्माचा तो हरिहर फासे सारे त्याच्या हाती क्षणाचा कां असे भरोसा त्या अगाधा स्मरत रहावे लाभले ते जपावे मनस्वी साऱ्यांच्याच मनात रहावे हवेत कशाला ते हेवे दावे संघर्षाविना जगती जगावे […]

आईला

तुमचं आमचं नातं कधी एका जन्माचं गुलाम नव्हतं ऋणं आपली फेडता फेडता बंध पावले गाढ दृढता ॥ १ ॥ मनाचा कुठला कोपरा काही जिथे तुमचा ठसा नाही तुमच्या लावल्या वळणांनी सरळ झाले मार्ग जीवनी ॥ २ ॥ दुर्धर दुर्गमशा वाटेवरती काजळलेल्या निराशराती संस्कारांचा दीप सोबतीला आशीर्वादाचा कवडसा ओला ॥ ३ ॥ तुम्ही आम्हा दिलं नाही असं […]

1 37 38 39 40 41 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..