नवीन लेखन...

पोट भर

तो खातो म्हणून – मी खातो, हा खातो म्हणून – तो खातो. माझे दहा – त्याचे दहा , त्यांचे वीस आणि – साहेबांचे पन्नास. प्रत्येकाचे वाटे – नेमके ठरलेले , पोट ठेवायचे – सतत भरलेले. काम करायचंय तर – खायला द्या , नाहीतर फेरी परत – मारा उद्या. पण उद्या मात्र आहे – माझी रजा, काम […]

सत्यभास

तू विसावलीस क्षणक्षण जेथे तो वृक्षही तुझीच वाट पाहतो पानोपानी तुझा स्पर्श लाघवी अजुनही अविरत झुळझुळतो शहारणारा, मस्त धुंद गारवा तनामनाला, अलवार झोंबतो तू अशी ही कोमली नार सुंदरा तुझ्या रुपात, माहोल शृंगारतो नको नां, आता खेळू जीवाशी त्या वृक्षातळी मीही वाट पाहतो जीवनी, प्रीती एक ब्रह्मसुखदा साक्षात्कार, जीवाजीवा भावतो नाते अगम्य राधेचे अन मुरलीचे सत्यभास, […]

पंढरीची वाट

पंढरीची वाट – पाऊले चालती, माऊली माऊली – गजर मुखातुनी. भागवताची पताका – घेऊनी सोबत , भाबडे दिसे ते रूप – वारकऱ्यांचे. मनी एक भाव – दर्शनाचा ठाव, दुजा न विचार – हृदयी वसे. भजन कीर्तनाचा – उसळे कल्लोळ, टाळ मृदुंगाची मिळे – साथ तया. मेळा वारीचा – वेगे वेगे चाले, ओढ भेटीची मनी – विठुरायाच्या. […]

कोरडे पाषाण

कोरड्या सोपस्काराचे कोरडेच झरे वैराण वाळवंटातील भगभगीत वारे नात्यांचे आखीवरेखीव बंध काही आपुलकीचा आनंद गंध नाही हास्याच्या कृत्रिम कवायती या अंतरीचा त्यात उन्माद नाही भावनांना यांच्या ओल नाही जिव्हाळ्याचे कुठे बोल नाही आटलेल्याच मनोनद्या साऱ्या पात्र कुणाचेच खोल नाही आपुलकीची ओसरतीही सर नाही भावनांना कुणाच्याही घर नाही अहिल्याच्या शिळांना तर आता कुणा श्रीरामाचा कर नाही काळजात […]

जगणे

नकळत लोपले प्रहर , प्रहर रूप प्राचीचे पश्चिमी ढळलेले उभी यामिनी क्षितिजावरती तरीही जगणेच नाही कळलेले कळीकळीने मुक्त गंधाळावे हेच सृष्टिचे , सत्यरूप रंगलेले निर्माल्याचे , वरदान सजीवा तत्व निर्मोही चराचरी रुजलेले देतादेता सर्वस्वी मनी सजावे अंती आठवावे सारे जगलेले ओसंडिता अंतरी क्षण आनंदी उधळावे तृप्त जीवन मंतरलेले — वि.ग.सातपुते ( भावकवी ) 9766544908 रचना क्र. […]

कालाय तस्मै नमः

हल्ली एक सगळीकडे – नवीनच फॅड झालंय, भावनांना समाजाच्या – खूप महत्त्व आलंय. कशामुळे दुखावतील त्या – नाही सांगता यायचं , शक्यतो आपण आपलं – सांभाळून बोलायचं. जाती पक्ष नेते – So called आदराची स्थानं, कुणाहिसाठी कडवी होतात – यांची बेताल मनं. दुखावली की चालून येते – झुंड अविचारी अंगावर, सपशेल शरणागतीशिवाय पर्याय – काहीच नसतो […]

पाच बाय दहाची खोली

त्या पाच बाय दहाच्या खोलीत – एक लोखंडी कॉट रहाते, अगदी त्याच खुराड्यात – एक कपाट रहाते, त्यामध्येच अंग चोरुन – चिंचोळी मोरीही रहाते, मोरीशेजारीच वस्तीला – जुनाट टेबल रहाते. राहिल्या जागी मोजक्या – भांडी ट्रंका रहातात. या जुनेऱ्यामध्ये चकचकीत – टीव्ही पण वसतो. फिरणारा पंखा गरमी – खोलीभर फिरवतो. डगडगणाऱ्या खुर्चीवर – श्वास छातीतच कोंडतो. […]

पावित्र्य

सांगु कसे मनांतरीचे अव्यक्त, ते गुज मी तुझ्या साऱ्या आठवांचे क्षण स्मरतो सदैव मी श्वासात या भास तुझा स्वप्नातही जागतो मी छळते मज रात्र सारी विरघळतो तुझ्यात मी जाहलाच सराव आता तुजवीणही जगतो मी घायाळ अंतरीचे उसासे तवस्मृतीत, सावरतो मी नि:शब्दी जरी भावप्रीती जाणतो मौनी पावित्र्य मी — वि.ग.सातपुते ( भावकवी ) 9766544908 रचना क्र.१७५ २१ […]

बाबा

लग्न झालं अन् – ती सासरी निघाली, त्याची मात्र खूप – घालमेल होऊ लागली. काय होतंय नेमकं – त्याला काही कळेना, अस्वस्थपणा जीवाचा – कमी कुठे होईना. खूप वर्षांपूर्वीची ती – आठवण जागी झाली, तशीच एक बारीक कळ – आता हृदयातून गेली. आतली तडफड चेहेऱ्यावर – उमटत नव्हती काही, दुराव्याचे कढ मात्र – फुटत होते तरीही. […]

उपचार सारे

हात अनेक भवती एक काळजाला भिडत नाही नाती झाली उदंड, तरी जिवाभावाची साथ नाही गर्दीचे संमेलन केवढे, पण कोण कुणाला सामील नाही भेटीगाठींचा वर्षाव सारा, आतड्याला कुणाच्या पीळ नाही विलगणारे ओठ अगणित. पण हास्याची लकेर नाही बिलगणाऱ्या शरीरांचा कधी अंत:करणाला स्पर्श नाही शब्दांचा पाऊस भरपूर पण भिजलेला एकही नाही विचारांचा वर्षाव तरीही मनाला स्पर्शून नाही. आण्यांचे […]

1 36 37 38 39 40 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..