आधारवड
गारेगार सावलीचा, भला थोरला आधारवड. पारंब्या झुलवत – अलवार कुरवाळणारा. मनसोक्त खेळलोय, अंगाखांद्यावर त्याच्या. गाढ झोपून गेलोय – मांडीवर पाराच्या. उन्हाळा पावसाळा थंडी – सकाळ सायंकाळ, मग्न व्रतस्थासारखा – वावर तिन्हीत्रिकाळ. मोठा झालोय खेळता खेळता, त्याच्याच सावलीत, तो सतत उभाय आम्हाला – आवर्षणापासून वाचवित. आधारवड आता थकलाय, पानापानांतून सुकलाय. मूळ कुडीतुनच पूर्ण – वृद्धत्वाकडे झुकलाय. निखळलेल्या […]
