नवीन लेखन...

आईच्या ६५व्या वाढदिवशी..

‘आई’ ही… चिरंतन आशा अनादि नि सुदैवाने अनंत मानवी आयुष्याला मात्र मर्यादा दुर्देवाने! ही खचितच खंत देवाचा अंश, आई परीसस्पर्श लाभून अवघे आयुष्य पुलकित! खूप काही सांगायला फारसे शब्द लागत नाहीत तुमच्या आमच्या आनंदाला कारणं फारशी लागत नाहीत -यतीन सामंत

आषाढी कार्तिकी एकादशी

परंपरागत दिंडी सोहळा ध्वज वैष्णवांचा चालला ज्ञाना, तुका, नामा, चोखा संतजनांचा मेळा दंगला टाळ, मृदङ्ग, चिपळ्या दिंडया, पताका नाचती डोलतो, पंढरीचा राणा वाळवंटी भक्तिचा सोहळा द्वैतअद्वैत झाले एकरूप नाही कुठेही अपपर भाव मुक्त गळाभेट हरि हराची लोचनी ओघळतो सावळा ब्रह्मांडाचे ब्रह्मरूप अवघे राऊळ गाभारी, कृपावंत कर कटिवर,उभा विटेवर जगन्नाथ, हरि विठुसावळा भाळी अबीर, गंध चंदनी तुळशीमाळा […]

व्याकुळ स्पंदने

कसे? समजवावे स्पंदनांना सदैव ध्यास तुझाच गे त्यांना क्षण क्षण भिरभिरती लोचने व्याकुळ जीव तुज शोधताना सर्वत्र साऱ्या तुझ्याच गं खुणा सांगना कसे विसरु आठवांना अजुनही साऊलीत भास तुझे वाटते तूच सोबती गं चालताना अंतरी भावप्रीतीच्या उतुंग लाटा चिंब चिंब भिजतो मी झेलताना वास्तवता, तुजविण जीवघेणी सांगनां सावरु कसे मी जगताना खुणावे जरी सांज सांजाळलेली तरीही […]

कृतार्थता

ब्रह्म अनामिक कृपाळू जन्मदा वात्सल्य लाघवी असीम पुण्यदा वैभव पंचभुतांचे खेळ ऋतुऋतुंचे चैतन्यरुप सृष्टीचे सौभाग्य जीवनाचे कर्मफल संचिती भोगणे जीवनांती सत्कर्माचे पहाड़ श्वासास सुखावती विवेकी सदभावनां ब्रह्मानंदे जगविती राखावीत मनांतरे लाभतेच मन:शांती चक्रधरी चक्रपाणी विटेवरीचा पांडुरंग वैष्णवासंगे नाचतो विठ्ठल,हरि,पांडुरंग दुथडी गंगाभागीरथी डोह, स्वर्गामृताचा डुंबावे मुक्त निश्चिंती क्षणक्षण कृतार्थतेचा — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. १५६. ५ – […]

आपलं (च) म्हातारपण

म्हातारपण असतं नाजूक साजूक तापून निवणाऱ्या एका काचेप्रमाणे म्हातारपण असतं दुखरं ठुसठुसतं उगा सलणाऱ्या शब्दांच्या वेदनांगत म्हातारपण असतं थकलेलं शीणलेलं दाट कापडाच्या उसवत्या वीणीप्रमाणे मन असतं अस्थिर, भिरभिरणारं तरंगणाऱ्या एका नि:संग पर्णाप्रमाणे म्हातारे डोळे असतात हळवे थोड्याशा प्रकाशाने भिरभिरतात जराशा आपुलकीनेही पाझरतात किंचित तिरीपीने येते तिरीमिरी आधाराला अशावेळी लागतं कुणीतरी म्हातारपण एकटं एकटं असतं आतुरतेने वाटते […]

अवघे ब्रह्म

विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल जय हरि पांडुरंग विठ्ठल कनवाळू माय ब्रह्मांडाची सावळा जगजेठी विठ्ठल दंगुनी आषाढ़ी कार्तिकी नाचतो वाळवंटी विठ्ठल पदन्यास तो वैष्णवांचा ध्यास पाऊलांना विठ्ठल गरजता टाळमृदंग चिपळी नाद घुमतो विठ्ठल विठ्ठल नेत्री पाझरते रुपड़े सावळे श्वासाश्वासात भास विठ्ठल नाही कुठे अंतरी भेदभाव द्वैतअद्वैत एकरूप विठ्ठल सुखदुःखाचेच परिमार्जन अवघे ब्रह्म साक्षात विठ्ठल — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना […]

सत्य प्रीती

मनाची समजूत कशी घालावी नेत्री साक्ष तुझ्याच अस्तित्वाची सांगना मी तुला गं विसरु कसे हुरहुर मनाला तव प्रीतसुखाची क्षणाक्षणांच्या झुल्यावर झुलते निर्मल, प्रीतगंगा गतआठवांची प्रीतीविना कां? असते जीवन लाभते प्रीती, संचिती सुखाची कोवळ्या कळीत मकरंद मधुर भ्रमरास ओढ़ त्यात मिटण्याची सत्यप्रीती! अवघे मर्म जन्माचे त्याविण नसे, प्रचिती सुखाची भावप्रीतीचेच, निष्पाप चांदणे कृपा सार्थकी, त्या भगवंताची — […]

आठवणींची पिसं

आठवणींचा डोह भासतो वरकरणी शांत नि:संग मात्र डुचमळता उठतात भावकल्लोळाचे अनंत तरंग वरवर वाटतात साऱ्या एका कुळीच्या एक जशा होतात बोलक्या जेव्हा, जाणवे एकमेकींचा अलग ठसा काहींचा केवळ नुसताच भास जवळून काहींचे जाणवतात श्वास काही रांगत्या काही रांगड्या मुकाट काही, काही अखंड बडबड्या काही गोड बोबड्या दुडदुडताना रुणझुणतात मनोपटलावर पुन:पुन्हा काही नव्हाळ, गव्हाळ रंगसाजिऱ्या कुजबुजती अस्पष्ट […]

निश्चिंती निवारा

अशाच सुरम्य संध्याकाळी आत्ममग्नि एकांती निवारा सृष्टिचा हा अगम्य सोहळा लोभस दृष्टांत हा साजिरा निरवतेत इथे हरवुनी जावे उलगडावा , आत्मगाभारा सत्य ! जीव जगतो एकटा या किनारी शाश्वती सहारा लोचनी आज सांजसावळी ओघळे अनामिक तारणारा चराचरी या भास हरिहराचा जीवाजीवा, सदा सावरणारा — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. १५२ १८ – ६ – २०२२

आईच्या ६३व्या वाढदिवशी

वाढदिवसाच्या शुभेच्छा सादर प्रणाम शतवार शब्दांना पहावा पेलतो का भावनांच्या आपला भार लखलखीत रहाव्या उजळीत या आयुष्याच्या ज्योती अमोलिक क्षण अनेक उधळीत आनंदाचे मोती -यतीन सामंत

1 39 40 41 42 43 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..