कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
कृतकृत्य
निसर्ग भगवंताचे रूप स्पर्श दिव्य अनामिक लाभता या स्पंदनांना आत्मिक शांती सात्विक…. अविष्कार पंचभुतांचे सदा सर्वदा सौख्यदायक नक्षत्रे अलंकार सृष्टिचे लोचनी उमले नंदनवन…. क्षण सारेच भारावलेले स्वानुभूतिच आनंदघन दृष्टांत, नैसर्गी लडिवाळ मनमनांतर पावन पावन…. सृजनता ही अलौकिक झुळझुळते तृप्त जीवन निर्मोही, भाव परस्पर निरंतर कृतकृत्य जीवन…. –वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.१९२ ८/८/२०२२
चेहरा
चेहरा, बिलोरी आरसा अंतरीच्याच भावनांचा प्रतिबिंब मनसंवेदनांचे सत्य साक्षात्कार मनाचा ऋणानुबंध सारे वोखटे अंतरात स्वार्थ स्वत:चा हीच आजची जगरहाटी इथे नाही कुणी कुणाचा चेहरा हसरा इथे बेगडी सत्य एक आरसा मनाचा –वि.ग.सातपुते.(भावकवी ) 9766544908 रचना क्र.१९३ ८/८/२०२२
मन आभाळ
अंतरी रूप पाझरते स्मरण नेत्री ओघळते… सांग ! कसे विसरावे मनआभाळ ते दाटते… श्रावण, प्रीतबरसला लाघव ते रिमझिमते… मृदगंधलेली, सुगंधा गगना भारूनी जाते… व्योमात कृष्णसावळा ब्रह्मात, पावरी घुमते… लडिवाळ नाद मधुरम मनी भक्तीप्रीत प्रसवते… हेच भाग्य साक्षात्कारी जन्मोजन्मी, सुखावते… ती राधा अन ती मीरा आत्माच समर्पूनी जाते… –वि.ग.सातपुते.( भावकवी ) 9766544908 रचना क्र.१९१ ८/८/२०२२
(लाडक्या) झुरळास
वा झुरळा, खबरदार जर पंख फुलवोनी जाशील पुढे, मुडदा पाडीन तुझा गधड्या हा मी मर्द मराठ्याचा वंशज असे म्यान न करातले का तुला हे दिसे दचकलो पाहून तुला मी न कीटका मारुनच तुला मी टाकीन उसासे ॥ क्षुद्रा जरी चावला होतास मला, तरी शूर वीर मी न तुला चावलो धर्मयुद्ध खेळीन शर्थीचे मी हा पहा तलवार […]
सार्थक
जगती जन्म हा हिशेब गतजन्मांचा प्रारब्धभोग पुर्वसंचिताचे….. कधी सुखदा, कधी दुःख वेदनां हेच खेळ सारे मूक साहण्याचे…. पराधीनता जगती सकल जीवाजीवांची अनामिका हाती दोर कठपुतळीचे….. दैवी प्रीतभावनां भाग्य ते भाळीचे वात्सल्य अमृती कृपासिंधु मातेचे…. तोच कृपाळू एक सत्य ! शाश्वताचे त्याला नित्य स्मरावे हे सार्थक जीवनाचे…. –वि.ग.सातपुते.( भावकवी ) 9766544908 रचना क्र.१९० ६/८/२०२२
जगावेगळी
त्यांचं वेड जगावेगळंच , अनाकलनीय आहे सगळंच. विचार वेगळा वेगळंच जगणं, कृतीत प्रत्यक्ष, न पोकळ बोलणं. मुके प्राणी यांचे सोबती, जगच यांचं त्यांच्या भोवती. हृदयात माणुसकी मनात निष्ठा, मुक्या जगाचा हा पाणवठा. पुढचा मागचा न विचार मनात, चमकण्याची न इच्छा जनात. निगुतीने करत राहायचं काम , त्यांच्या कार्याला खरंच सलाम. मुक्याना इथे मुक्त वावर, अहो, वस्तीला […]
काजळ गाली
सख्या, तुझ्या आठवात मी, चालते संथ पाऊली सांजवर्खी या सांजवेळी ओघळले, काजळ गाली…. संगती तीच वाट निरंतरी तुझ्याच स्पर्शात नाहलेली नेत्री दाटता अस्तिव तुझे ओघळले, काजळ गाली…. ही नित्याची साक्ष अंतरी पाहता, उमललेली कळी अनवट मोहक वाटेवरचा तूच नटखट माझ्या भाळी…. तुज मी स्मरता वेळोवेळी ओघळले, काजळ गाली तुझा असा असह्य दुरावा ओघळते, काजळ गाली…. –वि.ग.सातपुते.(भावकवी) […]
अदुबाळा
ये अदुबाळा ये लडिवाळा माझ्या प्राजक्ताच्या फुला आसुसतो मी, आतुरतो मी तुझ्या गोड, बोबड्या बोला लावतात लळा मला तुझ्या लडिवाळ लीला पाहून तुझा गोजिरवाणा चाळा ओंजारण्या तुला, गोंजारण्या तुला उचंबळून येतो जीवाचा जिव्हाळा नाजूक साजूक मोहक क्षणांचा या भरवावा आनंदमेळा उधळावे आयुष्याचे संचित त्यावरुन ओवाळून गोळा – यतीन सामंत
सुंदर सत्य
जीवन हा श्वास आहे स्मरणगंधी ध्यास आहे… कळीकळीने उमलावे फुलांनी दरवळणे आहे… सभोवारी गंधाळावे सत्कर्मी आव्हान आहे… सुखदुःखांच्या सरोवरी मुक्त असे डुंबणे आहे… प्रवाहा विरुद्ध पोहणे पुरुषार्थाची कमाल आहे… विवेकाची साथ असावी अप्राप्यही, प्राप्त आहे… मनामनांत नित्य रहावे तीच खरी मन:शांती आहे… द्वैत, अद्वैत एकरूपता निर्मलतेचे प्रतिबिंब आहे… कानी मंजुळ धुन मुरलीची आत्मानंदी सुंदर सत्य आहे… […]
