सत्य शाश्वताचे
सांज क्षितीजी थबकता रंगले आभाळ भावनांचे शिंपण, अंतरी अमृताचे मनी भास ते अमरत्वाचे… उजळलेली तिन्हीसांजा आविष्कार, कृतार्थतेचे जरी ही गात्रे पांगुळलेली शांत मनात भाव मुक्तीचे… जीव ! स्मृतीत गुंतलेला नाद अंतरी टाळमृदुंगाचे मन, सारे विठ्ठल विठ्ठल संकीर्तनी सत्य शाश्वताचे… यावीण दूजे सुख कोणते अहोभाग्य जन्मोजन्मिचे तोच सावळा एक कृपाळू अंतरंगी सुर मुग्ध पावरीचे… –वि.ग.सातपुते (भावकवी ) […]
