नवीन लेखन...

वेदना

‘वेदना ” वेदनेशी असलेल नाथ कधीच तोडायच नसत,ते तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची आणि पर्यायाने दुसर्याच्या दुःखाशी वेदनेन बघायला शिकवते |. वेदना जगण्याचा भुत ,भविष्य ,विसरून वर्तमानासी एकरूप व्हायला शिकवते .स्वताच्या वेदना ,दुःख याच्यापलिकड़े असलेल्या तीव्र आणि भयानक सामाजिक वेद्नेशी नात जोडायला शिकवते ,जगन कधीच पूर्ण होत नसत ,जगण्याच्या मैदानात वेदनेच नाण अखंडपने खनानत असत क्षणभंगुर सुखाच्या शक्येतेचा […]

सासरी जाणाऱ्या मुलीस

थांबव गंगा यमुना मुली   आपल्या नयनातल्या हंसण्यात जन्म घातला    मग ह्या कोठूनी आल्या ?   // हांसत गेले जीवन तुझे     फूलपाखरा परी तसेच जाईल भविष्यातें   आशिर्वाद देतो शिरीं   // समजतील दुःखी तुजला    नसता तो तुझा स्वभाव हासून खेळून आनंदाने      फूलवित रहा भाव   // जाणून घे स्वभाव सर्वांचे     रमुन जा संसारी चाली रितीचे पालन करावे     तुझ्याच नव्या घरी   […]

कवीची खंत

भटकतो आहे कवि   विचारांच्या सागरांत वाहात चालला आहे    व्यवहारी जगांत   आधार नाही त्याला    पैशाच्या शक्तीचा कुचकामी ठरत आहे    प्रयत्न त्याचा जगण्याचा   अर्धपोटी राहात असतो     भाकरीच्या अभावी लिहीत चालला आहे        काव्यरचना प्रभावी   उदासपणे बघतो आहे     ” हाऊस फूलची ” पाटी लिहीली होती नाट्यगीते     त्यानेच सर्वासाठी   टाळ्यांचा तो कडकडाट       बाहेर ऐकू येई उपाशी होते […]

पेराल ते घ्याल

शत्रु तुमचा तुम्हींच असूनी   तुम्हींच कारण दुःखाचे सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं   हात असती केवळ तुमचे   बी पेरतां तसेंच उगवते    साधे तत्व निसर्गाचे निर्मित असतो वातावरण   क्रोध अहंकार मोहमायाचे   कसे मिळेल प्रेम तुम्हांला   घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता क्रोध करुन इतरांवरी     मिळेल तुम्हांस कशी शांतता   शिवीगाळ तो स्वभाव असतां   आदरभाव तो कसा मिळे शत्रुत्वाचे नाते ठेवतां   […]

वातावरण

विचारांची उठती वादळे  । अशांत होते चित्त सदा  ।। आवर घालण्या चंचल मना  । अपयशी झालो अनेकदां  ।।   विषण्णतेच्या स्थितीमध्यें  । नदीकांठच्या किनारीं गेलो  ।। वटवृक्षाचे छायेखाली  । चौरस आसनावरी बसलो  ।।   डोळे मिटूनी शांत बसतां  । अवचित घटना  घडली  ।। विचारांतले दुःख जाऊनी  । आनंदी भावना येऊं लागली  ।।   एक साधूजन ध्यान […]

गर्भावस्थेतील आनंद

जीवनातील परमानंद,   केंव्हां लाभतो त्या जीवना ? मातेच्या त्या उदरामध्ये,   शांत झोपला असताना….१,   असीम ‘आनंद’ अनुभव,  घेत असे तो जीवात्मा सोsहं निनाद करूनी,  सांगतो मीच परमात्मा….२,   आनंदाने नाचू लागतो,  मनांत येता केंव्हां तरी मातेलाही सुखी करती,  त्याच्याच आनंदी लहरी….३,   पुढे त्याचे प्रयत्न होती,  मिळवण्या तोच आनंद सुख, दु:खाच्या चक्रामध्ये,  विसरूनी जातो तो नाद…..४ […]

संतुलन

आकाशीं सुर्य तळपला   तेजस्वी त्याची किरणें तप्त करुनी जमिनीला   वाळून टाकी जीवने   ।।   नभीं मेघ आच्छादतां    रोकती रविकिरणे तुफान पर्जन्य पडतां   महापूर त्याचा बने   ।।   सुटतां भयंकर वारा   निघून जाती ढग प्रचंड वादळाचा मारा   पर्जन्य कसे होईल मग   ।।   वादळास अडविती पर्वत   वलय त्याचे रोकूनी सारे करिती मदत   आनंदी करण्या धरणी   ।।   […]

शनिवारचं साहित्य : अव्यक्त…

तुझा ऑफिस मधला तो शेवटचा दिवस होता हात खांद्यापर्यंत वर उचलत आणि हालवत तू माझ्याकडे पहिलं, हसलीस आणि हळू आवाजात म्हणालीस “बाय” मीही तुझ्याकडे पहिलं हात खांद्यापर्यंत वर उचलत आणि आतल्या आवाजात म्हणालो “बाय” मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकलो नाही चूक माझीच होती नंतर बर्याहच दिवसाने बस थांब्यावर तू अचानक भेटलीस तू अगदी फुललेल्या चेहर्याथने हासत […]

विजेचे दुःख

लपकत आली कडकडाट करुनी गेली प्रकाशमान केले जगासी सारुनी दूर अंधारासी भयाण होता अंधःकार लख्ख प्रकाश देई आधार घेई सर्वांच्या मनाचा ठाव भिती असूनही, प्रसन्न भाव करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन निर्माण झाला मनी अभिमान परि दुःखी होते तीचे मन ‘क्षणिक’  लाभले तिला जीवन   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.com      

पक्षी – मुलातले प्रेम

स्वैर मनानें भरारी घेई,  पक्षी दिसला आकाशीं स्वछंदामध्यें विसरला तो,  काय चालते पृथ्वीशीं…१, एक शिकारी नेम धरूनी,  वेध घेई पक्षाचा छेदूनी त्याचा एक पंख,  मार्ग रोखी उडण्याचा…२, जायबंदी होवूनी पडला,  खालती जमीनीवरी त्वरीत उचलून पक्षाचे,  पाय बांधे शिकारी….३ ओढ लागली त्यास घराची,  भेटावया मुलाला आजारी असूनी पुत्र त्याचा,  चिडचिडा तो झाला…४, चकित झाला बघूनी मुलाला,  अंगणी […]

1 252 253 254 255 256 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..