सासरी जाणाऱ्या मुलीस
थांबव गंगा यमुना मुली आपल्या नयनातल्या हंसण्यात जन्म घातला मग ह्या कोठूनी आल्या ? // हांसत गेले जीवन तुझे फूलपाखरा परी तसेच जाईल भविष्यातें आशिर्वाद देतो शिरीं // समजतील दुःखी तुजला नसता तो तुझा स्वभाव हासून खेळून आनंदाने फूलवित रहा भाव // जाणून घे स्वभाव सर्वांचे रमुन जा संसारी चाली रितीचे पालन करावे तुझ्याच नव्या घरी […]
