कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
रात्र मिलनाची
मला वाटते आज नव्याने जगावे तुझ्या धुंद डोळ्यात मिसळुनी जावे पुन्हा एकदा ती मधूर रात्र यावी मिठीत तुझ्यासवे विसावून जावी । पुन्हा आठवे मज ती रात्र मिलनाची थंडगार वारा अन ती रात्र चांदण्यांची तशी रात्र मिलनाची पुन्हा जागवावी रात्र सरली तरी ना कुणा जाग यावी । विसरावे सर्व जग हे तु मज जवळी येता ना कुठल्याही […]
तुला लाभलेली निसर्ग देणगी
खळी पडून गालावरी सुंदर तूं दिसते आनंदाचे भाव दर्शनी मधूर तूं हांसते इवले इवले ओठ फूलपाकळ्यांपरि लांब लांब केस काळे भुर भुर उडती मानेवरी मोत्यासारखे दांत भासे कुंदकळ्या बदामाचा आकार मिळे तुझ्या डोळ्या इंद्रधनुष्याचा बाक दिसे भुवयाला चाफेकळीची शोभा मिळाली नाकाला चमकते अंगकांती फाटलेल्या झग्यातूनी दिसते निसर्गाची देणगी तुझ्या गरीबीतूनी डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० Bknagapurkar”Gmail.com
देह – एक महान वस्ती
सात कोटीची वस्ती असूनी, सुंदर वसले शहर एक । प्रत्येक जण स्वतंत्र असूनी, कार्ये चालती तेथे अनेक ।। सुसंगता शिस्तबद्ध साह्य करिती एकमेकांना । शत्रूची चाहूल येतां, परतूनी लाविती त्या घटना ।। अप्रतिम शहर असूनी, नाव तयाचे असे ‘पुरूष’ । ‘पुरू’ म्हणजेच गाव असूनी, मालक त्याचा आहे ‘ईश ।। अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी […]
संगीत सुर्य
गदीमा आणी बाबुजींनंतर रामायणातील गीत संपले भावमधुर त्या भावगीतातील भावनांचे अस्तित्व संपले । बाबुजीं नंतर पुन्हा एकदा भावगीत ते स्तब्ध जाहले देण्या संगीत स्वर्गलोकी संगीतसुर्य यशवंत निघाले । संवादिनी ती तानपुऱ्यासह आज अश्रु ढाळीत आहे ताल हरवलाय आज तबल्याचा विणा सरस्वतीची अबोल आहे । भाव मराठी भावगीतातील आज गेले आहेत हरवूनी गायकांच्या मधूर गळ्यातील सूरही आज […]
सुवासिनीचा पाडवा
दिवाळीच्या पाडव्याचा दिस आज आला बाई घालते सडा अंगणात धन्याची मी वाट पाही । लावीते पणती मी दारी केली बघा रोषणाई फुलला दारीचा मोगरा फुलली हो जाई जुई । किती दिस झाले बघा धन्याची माझ्या भेट नाही करण्या रक्षण देशाचे धनी माझा सैनिक होई । ऊन वारा पाऊस तर कधी बर्फ वृष्टी होई नाही विश्रांती कधी […]
प्रभू मिळण्याचे साधन
ध्येय मिळण्या तुमचे योग्य लागते साधन कष्ट होतील व्यर्थचे चूक मार्ग अनुसरुन ।। अंतराळातील शोध महान बुद्धीचे प्रतीक घेण्या अचूक वेध अवकाशयान असे एक ।। अनंत दूरचे तारे न दिसती डोळ्यानी दुर्बिणीच्या नजरें बघती सर्व कौतूकानी ।। सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ त्याचे मिळण्या ज्ञान लागते सूक्ष्मदर्शक यंत्र ।। यंत्र असे […]
लोप पावू लागलेली स्त्रीलज्जा
खुरटून जाते फूलझाड, गर्द झाडीच्या वनांत, कोमजूनी चालली स्त्रीलज्जा, धावपळीच्या जीवनांत ….१, भावनेची नाहीं उमलली, फुले तिची केव्हांही, नाजुकतेचे गंध फेकूनी, पुलकित झाली नाही…२, कोमेजूनी गेल्या भावना, साऱ्या हताळल्या जावून, एकांतपणाची खरी ओढ, दिसेल मग ती कोठून…३, गर्दीच्या या ओघामध्यें, धक्के-बुक्के मिळत आसे, प्रेमभावना जातां उडूनी, ओलावा मग राहत नसे…४, स्त्रीलज्जेची भावना जी, युगानूयुगें जपली घराबाहेर […]
दोन क्षणिका : दिल्लीचा वारा
दिल्लीचा वारा विषाहून विखार जणू यमाचा पाश. काळ्या-कुट्ट स्मागात दिसला यमाचा चेहरा कासावीस झाला प्राण.
