आणखी एक बॉम्बस्फोट

आणखी एक बॉम्बस्फोट

शांततेच काळीज चिरून गेला

पुन्हा एकदा निरपराध्यांच रक्त चाखून गेला

आणखी एक बॉम्बस्फोट

सर्वसामान्यांची झोप उडवून गेला

संपूर्ण देशात भयाच सावट पसरवून गेलां

आणखी एक बॉम्बस्फोट

पुन्हा तोच प्रश्न विचारून गेला

ज्याच उत्तर देण्यापूर्वी ईश्वरही झोपी गेला

आणखी एक बॉम्बस्फोट

मानवतेला काळिमा फासून गेला

डोळ्यातील अश्रुनैवजी रक्त गोठवून गेला

आणखी एक बॉम्बस्फोट

डोक बधिर करून गेलां

जीवनात जगण्याची खात्री नाही हे पटवून गेला

कवी – निलेश बामणे
[…]

संत संगती

ललाटी ज्यांच्या जे जे लिहीले संत जाणती दिव्य दृष्टीने नियतीच्या ह्या हलचालीना दिली जाती आवाहने जाणून घेता भविष्यवाणी जीवन मार्ग हे ज्याना कळती तपशक्तीने संत महात्मे योग्य मार्ग ते दाखवूनी देती कर्माने जरी भाग्य ठरते सुख दुखःच्या गुंत्या भोवती त्या गुंत्यातील धागा शोधुनी सुसाह्य त्याचे जीवन करीती कृपा होता संत जनाची चुकला-मुकला जाई ठिकाणी घनदाट त्या […]

देह देव

हाडे, मांस, रक्ताने, शरीर बनविले छान, सौंदर्य खुलते त्या देहाचे, जर असेल तेथे प्राण ।।१।। प्राण नसे कुणी दुजा हा, परि आत्मा हेची अंग, विश्वाचा जो चालक, त्या परमात्म्याचा भाग ।।२।। ईश्वरी सेवा, संकल्प मनीं, प्रेमभरे देह भजावा, अंतर बाह्य शुद्धता राखी, समर्पणाचा भाव असावा ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

रामाची व्याकूळता

सीतेकरता व्याकुळ झाला अवतारी चक्रपाणी अजब ही रामप्रभू कहानी ।।धृ।। पत्नीहट्ट हा त्याला सांगे कांचनमृग शोभेल अंगे मृगयेच्या तो गेला मागे प्रसंग घेई रावण साधूनी ।।१।। अजब ही रामप्रभू कहानी रावण नेई पळवूनी सीता दिसेन रामा कोठे आता तरुवेलींना पुसत होता वाहत होते अश्रु नयनीं ।।२।। अजब ही रामप्रभू कहानी बाणी ज्याच्या शक्ती शिवाची ह्रदयामाजी दया […]

वातावरण

विचारांची उठूनी वादळे अशांत होते चित्त सदा आवर घालण्या चंचल मना अपयशी झालो अनेकदां विष्णतेच्या स्थितीमध्यें नदीकांठच्या किनारीं गेलो वटवृक्षाच्या छायेखालच्या चौरस आसनावरी बसलो डोळे मिटूनी शांत बसतां अवचित घटना ती घडली विचारांतले दुःख जावूनी आनंदी भावना येऊं लागली एक साधूजन ध्यान लावीत बसत होता त्या आसनावरी पवित्र्याची वलये फिरती आसन दिसले रिकामें जरी वातावरणाची ही […]

भरताचा जाब

ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी, कां धाडिला राम वनीं ?   कैकयीला भरत विचारी   ।।धृ।। आम्ही बंधू चौघेजण, झालो एका पिंडातून, कसा येईल भाव परका ? असतां एकची जीव, चार शरीरीं कैकयीला भरत विचारी   ।।१।। वचनपूर्ती ब्रीद ज्याचे, आदर्श जीवन रघूवंशाचे, कसली शंका मनांत होती ? पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी, कैकयीला भरत विचारी   ।।२।। […]

1 250 251 252 253 254 274