पेराल ते घ्याल

शत्रु तुमचा तुम्हींच असूनी   तुम्हींच कारण दुःखाचे

सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं   हात असती केवळ तुमचे

 

बी पेरतां तसेंच उगवते    साधे तत्व निसर्गाचे

निर्मित असतो वातावरण   क्रोध अहंकार मोहमायाचे

 

कसे मिळेल प्रेम तुम्हांला   घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता

क्रोध करुन इतरांवरी     मिळेल तुम्हांस कशी शांतता

 

शिवीगाळ तो स्वभाव असतां   आदरभाव तो कसा मिळे

शत्रुत्वाचे नाते ठेवतां   सलोख्याचा सांधा ढळे

 

इच्छा मात्र असते सुखाची    सदैव मिळावा तो आनंद

शक्य होण्या वातावरणी      हवा प्रेमळ सुसंवाद

 

आवलंबून ते सारे असते   वागतां कसे तुम्हीं ह्या वरती

वाईट वागण्याचे बी पेरुनी  चांगले मग कसे उगवती

 

डॉ. भगवान नागापूरकर

9004079850

bknagapurkar@gmail.com

 About डॉ. भगवान नागापूरकर 1229 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – करवंदे

'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...

कोकणचा मेवा – कोकम

आंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...

कोकणचा मेवा – आंबा

उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...

कोकणचा मेवा – काजू

कोकणचा मेवा - काजू

उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...

Loading…