विनम्रता

लीन दीन ती होऊन पुढती, झुकली होती त्यावेळी । हात पुढे आणि नजर खालती, ज्यांत दिसे करूणा सगळी ।।१।। लाचार बनूनी पोटासाठी, हिंडे वणवण उन्हांत सारी । वादळ वारा आणिक पाऊस, संगत घेवून फिरे बिचारी ।।२।। मदतीचा हात दिसे, जागृत होता भूतदया । जनसामान्यात असती मानवतेतील ही माया ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

नदीवरील बांध

विषण्यतेने बघत होतो भिंतीवरच्या खुणा काळ जाऊन वर्षे लोटली आठवणी देती पुन्हा बसत होतो नदीकांठी बालपणीच्या वेळी पात्र भरुनी वहात होती गोदावरी त्या काळी सदैव पूर येउनी तिजला गावास वेढा पडे गांव वेशीच्या घरांना मग पाण्याचे बसती तडे चित्र बदलले आज सारे पात्र लहान होई बांध घातला धरणावरी पाणी अल्पसे येई खिन्नपणे खूप भटकलो भोवतालच्या भागी […]

दिवाळी

असे वाटते की ही दिवाळी कधी येऊच नये । तेल नाही म्हणून पाण्याऐवजी मेणबत्ती लावू नये । पारिजातकाच्या सड्यासारखे रक्ताचे थेंब पडताना । बाँबस्फोटचे आवाज, तलवारी नाचताना । भ्यायलेल्या हरिणीसारखे घरात लपताना । रोषणाईच्या माळा मला भावतच नाही । असे वाटते की ही दिवाळी कधी येऊच नये ।।१।। पु़ढार्‍यांच्या भूलथापांना भाळून जाण्यासाठी । करंट्याचा जन्म आमुचा […]

मयुरा तूं आहेस गुरु

मयुरा तूं आहेस गुरु, तुला आम्हीं वंदन करु ।।धृ।। नदी कांठच्या वनीं, थुई थुई नाचूनी, पिसारा फुलवुनी, तुझे पाहूनी नृत्य, ताल धरु मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु ।।१।। मोरपिसे सुंदर, रंग बहारदार, दिसे चमकदार, बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं, मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु ।।२।। रुप डौलदार, चाल […]

सारेच खेळाडू

खेळाच्या त्या मैदानीं, रंगात आला खेळ, मुरलेले खेळाडू, आनंदी जाई वेळ ।।१।। खेळाच्या कांहीं क्षणी, टाळ्या शिट्या वाजती, आनंदाच्या जल्लोषांत, काही जण नाचती ।।२।। निराशा डोकावते, क्वचित त्या प्रसंगीं, हार- जीत असते, खेळा मधल्या अंगी ।।३।। सूज्ञ सारे प्रेक्षक, टिपती प्रत्येक क्षण, खेळाडू असूनी ते, होते खेळाचे ज्ञान ।।४।। मैदानी उतरती, ज्यांना असे सराव, जीत त्यांचीच […]

प्रभू दर्शन

महिमा कसा प्रभू तुझा आगळा, पावन करसी तूं भक्ताला, नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला ।।धृ।। पुंडलीकाची महान भक्ती, माता पित्याचे चरणी होती, त्याची सेवा तुजसी खेचती, कसा उकलू मी ह्या कोड्याला, ।।१।। नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला पातिव्रत्य हे दैवत समजूनी, पतिसेवेला घेई वाहुनी, सावित्रीने दिले […]

निसर्गावर अवलंबून

कितीही सारी धडपड करशी, लाचार ठरतो अखेरी, जाण माणसा मर्यादा तव, आपल्या जीवनी परी ।।१।। क्षणाक्षणाला अवलंबूनी, जीवन असे तुझे सारे, पतंगा परि उडत राहते, जसे सुटत असे वारे ।।२।। निसर्गाच्याच दये वरती, जागत राहतो सदैव, कृतघ्न असूनी मनाचा तूं, विसरून जातो ती ठेव ।।३।। निसर्गाच्या मदती वाचूनी, जगणे शक्य नसे तुजला, जीवन कर्में करीत असतां, […]

मोहमाया दलदल

दलदल होता चिखल मातीची, पाय जाती खोलांत, प्रयत्न व्यर्थ जाऊनी , न होई त्यावर मात ।।१।। सावध होऊनी प्रथम पाऊली, टाळावे संकट, मध्यभागी शिरल्यानंतर, दिसत नाही वाट ।।२।। मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली, चुकूनी पडतां पाऊल , खेचला जातो खाली ।।३।। जागृतपणाचा अभाव असतां, गुरफूटत जातो, मोहमायेच्या आकर्षक गुणाला, बळी तोच पडतो ।।४।। वेगवान जीवन […]

त्यागवृत्ती

जीवनाच्या सांज समयीं । उसंत मिळतां थोडीशी ।। हिशोब केला स्वकर्माचा । वर्षे गेली कशी ।।१।। दिवसामागून वर्षे गेली । नकळत अशा वेगानें ।। सुख दुःखाच्या मिश्रणीं । जीवन गेले क्रमाक्रमानें ।।२।। आज वाटे खंत मनीं । आयुष्य वाया दवडिले ।। ऐहिक सुखाच्या मागे जातां । हातीं न कांहीं राहिले ।।३।। ‘ घेणे ‘ सारे आपल्यासाठीं […]

निसर्गाचे खेळणे

धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी, तेच जगती जगी या शक्ती ज्यांचे पाठी ।।१।। बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे ।।२।। नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे ।।३।। जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी ।।४।। प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची […]

1 254 255 256 257 258 310
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..