नवीन लेखन...

ढोंगी साधू महाराज

सोडत नसतो केव्हाही,  निसर्ग आपुल्या मर्यादा, चमत्कार तो करीत नसतो, नियमित चालतो सदा   १ साधूबाबा महाराज ते    कित्येक आहेत ह्या जगती नांव घेवूनी प्रभूचे     चमत्कार दाखविती   २ अज्ञानाने भरलो आम्ही, विश्वास वाटतो त्यांचा चमत्कार दाखविण्यामध्ये    हात नसतो प्रभूचा    ३ तो तर महान असूनी     क्षुल्लक त्यासी ह्या गोष्टी प्रेमभावना घेण्या तुमच्या     कशास पडेल तो कष्टी   ४ नष्ट […]

मी स्वतः ला शोधत असतो

कविता तीही लिहित असते कविता मीही लिहित असतो ती चंद्र- चांदण्यांची बात करते मी स्वतः ला शोधत असतो ती जर चंद्र – चांदण्यांतून हटली मी जर स्वत:मधून निघालो तर तिला मी दिसेल आणि मला ती त्यानंतर दोघांच्याही भावना उलगडत जातील एकमेकांना जे कधीच आजपर्यंत दोघांकडूनही बोललं गेलं नाही जे तिच्याही मौनप्रेमातून हरवलं जे माझ्याही निशब्दतेतून निसटलं […]

जीवन गुलाबा परि

जीवन असावे गुलाबा सारखे सहवासे ज्याच्या मिळताती सुखे….१, सुगंध तयाचा दरवळत राही मनास आमच्या समाधान होई….२, नाजूक पाकळ्या कोमल वाटती सर्वस्व अर्पूनी गुलकंद देती…३, विसरूं नका ते काटे गुलाबाचे बसती लपूनी खालती फूलाचे….४ , सुखाचे भोवती सावट दु:खाचे जीवन वाटते झाड गुलाबाचे….५   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com      

जातीच्या पल्याड …

गोचिड जसा जनावराचे रक्त पितो तसे माझ्या देशाचे रक्त पीतेस रक्त पिऊन तर्र ..झिण्गाट झालीस … सोड ना आता तरी आमचा पिच्छा किती दिवस छळणार आहेस तूझच वेसण लागलय आख्ह्या देशाला .. तू जल्मताच आम्हाला चिटकटेस सोडून जातात ग नाती – गोती पण तू मेल्यानन्तरहि पीछ्या सोडत नाहीस मी मेल्यानंतर माझ्या मुलाला चीतकतेस .. जुळलेल्या मनाची […]

डोहाळे जेवण

ओटी भरण आज कौतुकाचे हवे नको काय ते तूच सांगायचे ओटी भरण आज कौतुकाचे ।।धृ।। शालू हिरवा जरतारी काठ चंदनाचा पाट पक्वान्नांचे ताट श्रीखंड खिरीला रंग केसराचे ।।१।। मोगरा अंबोली, दवणा मरवा, रूपाराणीला या, मखरी मिरवा, मुखावरी तेज विलसे गर्भाचे ।।२।। सुगंधित वाळा, उटी चंदनाची हौस पुरवा फळांची फुलांची, डोहाळे जेवण रात-चांदण्यांचे ।।३।। कौसल्येचा राम, देवकीचा […]

नवरात्रीचे नवरंग

नवरंग नवरात्रीचे ! प्रतीक शक्ती-भक्तीचे !! पिवळा रंग सोन्याचा ! शुद्ध तेजस क्षणांचा ! हिरवा रंग सृष्टीचा ! वृध्दी,सुख-समृध्दीचा !! करडा रंग भाग्याचा ! निरामय आरोग्याचा !! केशरी रंग निर्मितिचा ! राजमंगल पताकांचा!! पांढरा रंग शांतीचा ! एकोपा अन मैत्रीचा !! लाल रंग कुंकवाचा ! सर्व मांगल्य मांगल्याचा !! निळा रंग अस्मानाचा ! निर्मळशा हृदयाचा !! […]

जागर देवीचा

शरद ऋतूचे आगमन होता …. झळकत येतो अश्विन मास !! तरुणाईच्या जल्लोषात अन …. थोरांचा तो जागरहाट ! घट बसता नवरात्राचे प्रतिपदा ते नवमीचे !! सज्ज झाली महिषासुरमर्दिनी… असुरांचा वध तो करावया अखंड दीप हे प्रतीक असे ….. शक्ती अन त्या वायूचे !! लहरी त्याच्या दाही दिशातही ….. घननीळा त्या बरसतात ! नवरात्रीचे नऊ रंग हे […]

नातं कसं असावं?

नातं कसं असावं? नातं डब्यासारखं असावं.. उघडल्यावर रुचकर, खमंग आठवणी देणारं आणि त्यांना जपूनही ठेवणारं.. तर कधी नाविन्याला जन्माला घालणारं.. नातं कसं नसावं..? तुझ नि माझं सारखचं रे, असं न म्हणणारं वा माझं सगळ्यांवर सारखाचं प्रेम आहे हे हि न सांगणारं.. नातं कसं असावं? नातं डब्यासारखंचं असावं.. ज्याची झाकणं ज्याची त्यालाचं बसतील असं.. – शिल्पा परांडेकर

सांग दर्पणा कशी मी दिसते

सांग दर्पणा कशी मी दिसते… ममतेचे औदार्य की फक्त आरसपाणी सौंदर्य? मायेची सावली की फक्त शोभेची बाहुली? ल्यायले जेंव्हा मी धैर्य, क्षमा, जिगर, हिम्मत हे अलंकार तरीही नथ, पैंजण, बांगड्या, मंगळसुत्र म्हणजेच ‘मी’ हा नाही का वाटत चमत्कार? का संभ्रम, का नकार? अस्तित्वासाठी किती तुडवायचे अजून निखार? सांग दर्पणा सांग कशी मी दिसते…? सृष्टीचे सगुण रूप […]

काय सांगावे तुला, काय सांगू नये

काय सांगावे तुला, काय सांगू नये या कोड्यात राहिलो आयुष्यभर नेमकं जे सांगायच होतं ते ते सांगायच राहुनच गेल्ं !! जेंव्हा उन्ह सरली, तेंव्हा छत्री उघडली. नको असतांना, सावली अंगावर झेलली. — भास्कर पवार

1 … 256 257 258 259 260 … 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..