Web
Analytics
पक्षी – मुलातले प्रेम – Marathisrushti Articles

पक्षी – मुलातले प्रेम

स्वैर मनानें भरारी घेई,  पक्षी दिसला आकाशीं

स्वछंदामध्यें विसरला तो,  काय चालते पृथ्वीशीं…१,

एक शिकारी नेम धरूनी,  वेध घेई पक्षाचा

छेदूनी त्याचा एक पंख,  मार्ग रोखी उडण्याचा…२,

जायबंदी होवूनी पडला,  खालती जमीनीवरी

त्वरीत उचलून पक्षाचे,  पाय बांधे शिकारी….३

ओढ लागली त्यास घराची,  भेटावया मुलाला

आजारी असूनी पुत्र त्याचा,  चिडचिडा तो झाला…४,

चकित झाला बघूनी मुलाला,  अंगणी खेळतांना

बघत होता रोज तयाला रडत असतांना…५,

झाडा वरती दोन पक्षी,   नाचून गात होते

मुलास त्याच्या आनंद देवूनी,  रिझवीत ते होते….६,

गहींवरूनी गेला दृष्य बघूनी,  पक्षी- मुलातले प्रेम

सोडून दिला हातातला पक्षी,  लावून त्यास मलम…७

 

डॉ. भगवान    नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 



About डॉ. भगवान नागापूरकर 1229 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – करवंदे

'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...

कोकणचा मेवा – कोकम

आंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...

कोकणचा मेवा – आंबा

उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...

कोकणचा मेवा – काजू

कोकणचा मेवा - काजू

उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...

Loading…