काव्यानुभव

फळ आज हे मधूर भासते, तपोबलातील अर्क असे कष्ट सोसले शरिर मनानें, चिज तयाचे झाले दिसे….. बसत होतो सांज सकाळी, व्यवसाय करण्या नियमाने यश ना पडले पदरी. केव्हा मान फिरविता नशीबाने…. निराश मन सदैव राहूनी, मनीं भावना लहरी उठती शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती… लिहीता असता भाव बदलले, त्यात गुरफटलो पुरता छंद लागूनी नशाच […]

ग्रह परिणाम

वळून बघता पूर्व आयुष्यी,  प्रखरतेने हेची जाणले घडले नाही कधीही ते ते, हवे असूनी मनी योजीले….१ सभोवतालची देखूनी स्थिती,  आखती योजना कल्पकतेने खेळामधली चाल नियतीची,  ध्यानी न येते दुर्दैवाने…..२ मार्ग तिचे हे ठरले असूनी,  बांधलेले इतर जीवांशी अपूर्व योजना निसर्गाची,  कळेल कुणाला सहज कशी….३ जाळीतल्या धाग्याची टोके,  गुंतली असती ग्रह गोलाशी फिरता फिरता खेच पडे,  वा […]

जखमांचे वण

किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती. एकच गोष्ट सतत कानी पडत होती. उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा. भडीमार होत होता आईकडून शब्दांचा.. आम्ही होतो बालपणीच गांधीवादी. एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे. मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे. खेळणें, कुदणें, उड्या मारणें, त्यातच […]

चिमणीची निद्रा मोड

‘पहाट झाली, चिव चिवते चिमणी उमज येईना, उठविले तिजला कोणी…..१, आई आहे कां ? जी उठवी शाळेसाठी, गुदगुदल्या करूनी कुरवाळिते हळूंच पाठी….२, घड्याळ उठवी घण घण करूनी नाद घरट्यामधुनी, नाही ऐकला असा निनाद.’..३, ‘ उषाराणी  येते, साऱ्यांची आई बनूनी प्रेमानें मोडी झोंप, नाजूक करकमलांनी…..४, घड्याळ आमचे, दवबिंदू पडतां पानावरूनी चाळविती निद्रा, टपटप आवाज करूनी’ …..५ डॉ. […]

काळाची चाहूल

जो जो येईल पाया खालती, तुडविला जातो त्याचक्षणी कुणी मरावे अथवा जगावे, सारे प्रभूवर अवलंबूनी….१, भक्ष्य शोधण्या किटक चाले, तसाच फिरतो प्राणी देखील जगण्यासाठी फिरत असता, मृत्यूची येते त्याला चाहूल…२, चालत असतो काळ सदैव, दाही दिशांनी घिरट्या घालीत झडप घाली अचानक तो,  जो जो येई त्याच्या टापूत…३, जरी दिसे मारक कुणीतरी,  करवूनी घेतो काळच सारे विश्वाचा […]

चुकीचे तर्क

मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता…..१, तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करित होते…२, वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला…३, बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे ते ठरले…४ […]

बंधनातील चिमणी

उड्या मारित चिवचिवत,  एक चिमणी आली दर्पणाच्या चौकटीवरती,  येवून ती बसली बघूनी दूजी चिमणी दर्पणी,  चकीत झाली होती वाटूं लागले ह्या चिमणीला,  आंत अडकली ती उत्सुकता नि तगमग दिसे,  ह्या चेहऱ्यावरी चारी दिशेने बघत होती,  आंतल्या चिमणी परी औत्सुक्याचे भाव सारे दिसती,  आतील चिमणीतही कशी करूं तिची बंधन मुक्ती,  काळजी लागून राही चोंच मारीते आवाज करिते,  […]

कर्तृत्वाला काळ न लागे

सुचले होते सारे कांहीं परि,  ढळत्या आयुष्यीं संधिप्रकाश तो दिसत होता,  सूर्य अस्ताशीं…१, काळोखाची भिती उराशीं,  लांब आहे जाणे कळले नाहीं यौवनांत,  कशास म्हणावे जगणे…२, समजून आले जीवन ध्येय,  चाळीशीच्या पुढें खंत वाटली जाणता,  आयुष्य उरले केवढे…३, ज्ञानविषय अथांग होते,  अवती भवती कसा पोहू ह्या ज्ञान सागरीं,  विवंचना होती…४, निराश होऊं नकोस वेड्या,  कर्तृत्वाला काळ न […]

पक्षी – मुलातले प्रेम

स्वैर मनानें भरारी घेई,  पक्षी दिसला आकाशीं स्वछंदामध्यें विसरला तो,  काय चालते पृथ्वीशीं…१, एक शिकारी नेम धरूनी,  वेध घेई पक्षाचा छेदूनी त्याचा एक पंख,  मार्ग रोखी उडण्याचा…२, जायबंदी होवूनी पडला,  खालती जमीनीवरी त्वरीत उचलून पक्षाचे,  पाय बांधे शिकारी….३ ओढ लागली त्यास घराची,  भेटावया मुलाला आजारी असूनी पुत्र त्याचा,  चिडचिडा तो झाला…४, चकित झाला बघूनी मुलाला,  अंगणी […]

उमलणारी फुले

चोर पावली येता तुम्हीं,  साव असूनी खऱ्या फुलराण्या स्वर्गामधल्या,  नाजुक नाजुक पऱ्या ।।१।। निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे,  संचारी भुमंडळीं स्वागता रवि उदयाचे,  उमलताती सकाळीं ।।२।। चाहुल न ये कुणासी,  तुमच्या अगमनाची प्रफुल्लतेनें मन देते,  पोंच सौंदर्याची ।।३।। आकर्शक ते रंग निराळे,  खेची फुलपाखरें मध शोषण्या जमती तेथे,  अनेक भोवरे ।।४।। सुगंध दरवळून वातावरणीं,  प्रसन्न चित्त करी […]

1 2 3 13