स्वैर मनानें भरारी घेई, पक्षी दिसला आकाशीं
स्वछंदामध्यें विसरला तो, काय चालते पृथ्वीशीं…१,
एक शिकारी नेम धरूनी, वेध घेई पक्षाचा
छेदूनी त्याचा एक पंख, मार्ग रोखी उडण्याचा…२,
जायबंदी होवूनी पडला, खालती जमीनीवरी
त्वरीत उचलून पक्षाचे, पाय बांधे शिकारी….३
ओढ लागली त्यास घराची, भेटावया मुलाला
आजारी असूनी पुत्र त्याचा, चिडचिडा तो झाला…४,
चकित झाला बघूनी मुलाला, अंगणी खेळतांना
बघत होता रोज तयाला रडत असतांना…५,
झाडा वरती दोन पक्षी, नाचून गात होते
मुलास त्याच्या आनंद देवूनी, रिझवीत ते होते….६,
गहींवरूनी गेला दृष्य बघूनी, पक्षी- मुलातले प्रेम
सोडून दिला हातातला पक्षी, लावून त्यास मलम…७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com


Leave a Reply