वातावरण

विचारांची उठती वादळे  ।

अशांत होते चित्त सदा  ।।

आवर घालण्या चंचल मना  ।

अपयशी झालो अनेकदां  ।।

 

विषण्णतेच्या स्थितीमध्यें  ।

नदीकांठच्या किनारीं गेलो  ।।

वटवृक्षाचे छायेखाली  ।

चौरस आसनावरी बसलो  ।।

 

डोळे मिटूनी शांत बसतां  ।

अवचित घटना  घडली  ।।

विचारांतले दुःख जाऊनी  ।

आनंदी भावना येऊं लागली  ।।

 

एक साधूजन ध्यान लावीत  ।

बसत होता त्या आसनावरी  ।।

पावित्र्याची वलये फिरती  ।

आसन दिसले रिकामें जरी  ।।

 

वातावरणाची ही किमया  ।

अनुभवते  प्रखरतेनें  ।।

शुद्ध अशुद्ध  विचार येती  ।

सभोवतालच्या जाणिवेने  ।।

 

डॉ. बगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 



About डॉ. भगवान नागापूरकर 1229 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – करवंदे

'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...

कोकणचा मेवा – कोकम

आंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...

कोकणचा मेवा – आंबा

उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...

कोकणचा मेवा – काजू

कोकणचा मेवा - काजू

उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...

Loading…