Web
Analytics
संतुलन – Marathisrushti Articles

संतुलन

आकाशीं सुर्य तळपला   तेजस्वी त्याची किरणें

तप्त करुनी जमिनीला   वाळून टाकी जीवने   ।।

 

नभीं मेघ आच्छादतां    रोकती रविकिरणे

तुफान पर्जन्य पडतां   महापूर त्याचा बने   ।।

 

सुटतां भयंकर वारा   निघून जाती ढग

प्रचंड वादळाचा मारा   पर्जन्य कसे होईल मग   ।।

 

वादळास अडविती पर्वत   वलय त्याचे रोकूनी

सारे करिती मदत   आनंदी करण्या धरणी   ।।

 

एकाची शक्ती बनते    दुसऱ्यास पुरक

निसर्गचक्र शोधते   संतुलन त्यांत एक   ।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

 



About डॉ. भगवान नागापूरकर 1229 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – करवंदे

'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...

कोकणचा मेवा – कोकम

आंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...

कोकणचा मेवा – आंबा

उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...

कोकणचा मेवा – काजू

कोकणचा मेवा - काजू

उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...

Loading…