नवीन लेखन...

तू खरी, का मी

तू खरी, का मी, प्रश्नच मज पडे, कोण सुंदर जास्ती, कोडेच ते पडे,–? चिंतन करते, डोळे मिटुनी, का तसेच करते तीही,–? इतके साम्य दोघीतही, तरंग उठतात प्रत्यही,–!! काय निनादले अंतरंगी, जणू पावा वाजवे श्रीहरी, मंजूळ ती *धून ऐकुनी, तीही गेली भान विसरुनी,-! अद्वैतरुपे दोघीआम्ही , आत्मा एकच विचरी, संवाद साधत प्रतिबिंबी, म्हणू का माझीच सावली,-? कृष्णच […]

पोशिंदा

दिनरात कष्ट करी शेतामधे राबतो मी धनधान्य पिकवितो तुम्हा सर्वा पोसतो मी ।।१।। लोक म्हणती पोशिंदा उभ्या जगाला तारतो कष्ट दैवत बळीचे भार नित्य उचलतो ।।२।। खांद्यावरी लाकडाची मोळी माझी सखी झाली विकुनिया चार पैसे मिळताच सुखं आली ।।३।। घर्म धारा गळतात गालफडं बसतात डाव सारे फसतात कर्ज फार असतात ।।४।। नाही खंत मला त्याची फेडणार […]

कष्टाचे मोल

कष्ट करुनी घाम गाळीतो,   शेतामध्यें शेतकरी समाधानाची मिळते तेंव्हा,  त्यास एक भाकरी   त्याच भाकरीसाठी धडपडे,  नोकर चाकर कष्टामधूनच जीवन होते,  तसेच साकार   कष्ट पडती साऱ्याना,   करण्या जीवन यशदायी विद्यार्थी वा शिक्षक असो,  अथवा आमची आई   अभ्यासातील एकाग्रता,   यास लागते कष्ट महान त्या कष्टाचे मोल मिळूनी,   यशस्वी होईल जीवन   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

तेजोनिधीच्या आगमनाने

तेजोनिधीच्या आगमनाने, सारे जागे झाले चराचर, सोनेरी लख्ख प्रकाशाने, उजळत जसे धरणीचे अंतर,— अंधाराच्या सीमा ओलांडत , रविराजाचे पहा येणे, उजेडाच्या सहस्रहस्ते, पृथेला हळुवार कुरवाळणे,–!!! झाडां-झाडांमधून तेज, खाली सृष्टीपर्यंत पोहोचे, अजूनही आहे निसर्गच श्रेष्ठ, मित्राचे त्या मूक सांगणे,–!!! किमया आपली न्यारी करे, अव्याहत ते चक्र चालते, ब्रम्हांडातील सारे खेळ हे, पृथ्वीवर सर्व देत दाखले,–!!! सूर्यकिरणांची तिरीप, […]

बालपणी रमतांना (ओवीबद्ध रचना)

इवलेसे लहानसे होते विश्व ते छानसे चार भिंतितले कसे ते मोरपंखी जसे।।१।। मनमानी वागायचे हवे तेव्हा उठायचे दिस कोड कौतुकाचे पिलू आई-बाबांचे।।२।। भोकाड पसरायचे लोटांगण घालायचे ढोंगी बगळा व्हायचे खोटच रडायचे।।३।। पोट दुखतं म्हणावे घरी खुशाल लोळावे आईच्या मागे फिरावे अभ्यासाला टाळावे।।४।। बालपणी रमतांना गमती आठवतांना खुप खुप हसतांना गंमत वाटतेना।।५।। सौ.माणिक शुरजोशी

नववधू

नववधू नवासाज लालेलाल रंगी आज खुले रंग मेहंदीचा प्रेमभाव हा प्रीतीचा हाती चुडा भरला गं येई आता साजण गं सलज्जता वाढलीच हाती हात गुंफलीच गौरवर्णी हातावरी मेहंदिची नक्षी खरी जाई आता सासरला गुंती मन माहेराला मनातुनी बावरली सख्या भेटी आतुरली मालत्यांनी ओटी भरा लेक जाई तिच्या घरा सौ.माणिक शुरजोशी नाशिक

आत्म्याचे बोल

काय आणि कसे बोलतो,  त्यांना माहीत नव्हते सहजपणे सुचणारे,   संभाषण ते असते….१, शिक्षण नव्हते कांहीं,  अभ्यासाचा तो अभाव परि मौलिक शब्दांनी,  दुजावरी पडे प्रभाव…२, जे कांहीं वदती थोडे,  अनुभवी सारे वाटे या आत्म्याच्या बोलामध्ये,  ईश्वरी सत्य उमटे….३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

कुठे कशी भेटू तुला

कुठे कशी भेटू तुला, घर भरले पाहुण्यांनी, चोरटी ती पहिली भेट, गेली मला थरथरवुनी ,!! होता आपुली नजरानजर, माझी न राहिले मी, दुसरे काही नसे डोळ्यात, जीव कातर कातर होई,–!!! घर अपुरे पडे आता, जरी असे ते दुमजली, स्वतःचाच नसे पत्ता, तुलाच शोधे ठिकठिकाणी–!!! साजिरी मूर्त बघता, अंत:करण फुलून येई, आत होते चलबिचल, छळते जिवाला अस्वस्थता,–!!! […]

लेखणीवरील तीन चारोळ्या

*चारोळी क्रमांक १* लेखणीतील शाई कागद करी काळा अर्थप्रवाही वाक्य वाच सगळी बाळा *चारोळी क्रमांक २* लेखणीतून झरे कागदावरी ज्ञान तिथे अज्ञान सरे लोका करी सज्ञान *चारोळी क्रमांक ३* ज्ञानगंगा वाहते ही स्त्रवता लेखणी सरस्वती रमते साहित्यात देखणी सौ.माणिक शुरजोशी

तुझ्या शिवाय जगणं नाही रे…..

तुझ्या शिवाय जगणं नाही रे,श्वास घेणं ही अवघड आहे रे…. तुझ्या शिवाय जगणं नाही रे,स्वप्न पाहणं ही अवघड आहे रे…. तुझ्या शिवाय जगणं नाही रे,कोणत्याही गोष्टीत मन रमवने ही अवघड आहे रे…. तुझ्या शिवाय जगणं नाही रे,स्वतःला सांभाळणं खूप अवघड झाले रे…. स्वतःला शोधत आहे पण ठाऊक नाही कोणत्या दुनियेत हरवलि आहे रे…. तुझ्या विना जग […]

1 159 160 161 162 163 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..