घे भरारी उंच तू

शिखरासही जिंक तू घे भरारी उंच तू घे भरारी उंच तू…… येतील वादळे भयान अती ते भेद त्या वादळाला आहेच रे अजिंक्य तू घे भरारी उंच तू घे भरारी उंच तू…… घेऊन वारे पंखामध्ये सामावून घे जग तुझ्यात बनून यारा आसमंत तू घे भरारी उंच तू घे भरारी उंच तू……. अंधारी वाटा तुला आल्या कधी कुठेही […]

रामास शोधण्या मी

रामास शोधण्या मी धामास जात नाही धोंड्यास मानने हे माझ्या युगात नाही   देवास भेटण्याला गर्दी जमाव सारा त्या माणसातली तीमा झी जमात नाही   तीर्थास लोक जाता देवास मागता ते तीर्थामधील देवा ऐकूच येत नाही   कित्येक सोसले मी घावास पोसले मी धावून संकटी तो काळास येत नाही   शोधावयास देवा मी माणसात गेलो तेथेच […]

कन्या रत्न हे जन्मता

कन्या रत्न हे जन्मता सदा असावे स्वागता जाईची रे भासे कळी ह्या अंगणामध्ये ती रांगता का खुडता रे सुगंधी कळी तीचं नशिब असे तीच्या भाळी का रक्ताने हात माखता घेऊन तो निष्पाप बळी आई म्हणजे ईश्वर असे मुलीमध्ये तो का न दिसे भावी जगाची तीच आई उमटते सोनपावलांचे ठसे शिवा जन्मला जिजा पोटी सावित्री झाली क्रांती […]

शेतकरी राजा

शेतकरी राजा आहे जगाचा आधार भुकेचा भार त्याच्यावरी ….. १ पुण्यवान राजा खळगी भरवी पोटाची सार्‍या जगताची एकटाच ….. २ गाळूनी घाम त्यानं फुलवलं रानं पिकविलं सोनं शेतामध्ये …. ३ शेताच्या बांधाला खातो चटणी भाकर लागते साखर घामामध्ये ….४ धरणीचा लेक करी काळ्याईची सेवा पिकवितो मेवा जगासाठी. …. ५ करी परोपकार ह्या सार्‍या जगावरी स्वर्ग भूवरी […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..