नवीन लेखन...

हृदय अर्पिले तुला

हृदय अर्पिले तुला,गजानना वाट दाखव मला, *वेदना यातनांचा, उठतो कल्लोळ, शरीर आणि आत्मा, नच कुठे मेळ*, काया वाचा मने, स्मरते रे तुला, गजानना वाट दाखव मला,–!||१|| विघ्नहर्ता असशी तू , जागृत किती देवता, हाक तुज मारता, मदतीस धावतोस भक्ता, हृदयापासून करत अर्चना, विनविते मी तुला, गजानना वाट दाखव मला,–!||२|| रक्तवर्णी त्या सर्व पुष्पी, अर्पिते मी तुझ्या […]

साहित्यिक

साहित्यिक परखड लिहीतात अंजनही घालतात व्रत घेती लिखाणाचे जागरण समाजाचे अग्रलेख मुद्देसुद देखरेख साळसुद माहितीचा स्त्रोत वाहे अखंडची टिका साहे विविधांगी लेख लिही साहित्यात नसे दुही साहित्यिक अग्रस्थानी वैचारिक खतपाणी ज्ञानदाते बुद्धित्राते नमू तया चरणाते सौ.माणिक शुरजोशी नाशिक

दु:खात सर्व शिकतो

दु:खातची शिकतो सारे, उघडोनी मनाची द्वारे दु:खा परी नसे कुणी,  जो सांगे अनुभवानी दु:ख मनावरी बिंबविते, वस्तूस्थितीची जाणीव देते दुसऱ्या परि अस्था देई, जाणीव ठेवूनी कार्य करि अधिकाराने माज चढतो,  खालच्यांना तुच्छ लेखतो जाता अधिकार हातातूनी, माणूसकीला राही जागूनी कष्ट करण्याची वृति येते,  सर्वांना समावून घेते श्रीमंतिमध्ये वाहून जाती, आरामाची नशा चढती गरिबी शिकवते मेहनत,  कष्टाने […]

काळजातला झंझावात

काळजातला झंझावात, उफाळत बाहेर येत, किती एक वर्षानंतर, जीव जिवास भेटत, स्मृतींची मनात ओळ, केवढेतरी अधोरेखित, दोन टिंबे एका रेषेत, रेखली करत अंत,–!!! आसूंसे भेटण्या जीव, गाली हसे नशीब, लागले करण्या हिशोब, उभे राहून करत कींव,–!!! मनातल्या मनात वादळ, दडपावे भावकल्लोळ, सामोरी येता मूर्त, थांबला वाटतो काळ,–!!!! दिवस आणखी तास, पडले केवढे अंतर, भोवती खूप वर्दळ, […]

देशभक्ती (ओवीबद्ध रचना)

हा भारत माझा देश बहू भाषा,बहू वेष इथे नांदे हृषिकेश नांदतो कल्पेश।।१।। ही शुरविरांची भुमी शौर्याची नसते कमी असे सुरक्षेची हमी भाग्यवान हो आम्ही ।।२।। ही संतांची,महंतांची पावन भुमी भक्तीची एकी विविध धर्माची झोळी भरे पुण्याची ।।३।। जे देशासाठी लढले तयांनी प्राण त्यागले अमर हुतात्मे झाले देशास्तव जन्मले।।४।। त्यांचा आदर्श ठेवूया जन उत्कर्ष साधूया जनहितार्थ वेचूया […]

हाक

दे हाक आपल्या जन्मदात्या संकटात धावून येती ते दे हात तयांना वृद्धपणी कृतकृत्य होतील नक्की ते हाक जन्मदात्यांसी सौ.माणिक शुरजोशी नाशिक

पुरी गर्वाने टम्म फुगली (बालकविता)

*पुरी गर्वाने टम्म फुगली, बशीत ऐटीत ढिम्म बसली, बासुंदीने मग तिला पाहिली, तिला कशी चटकन बुडवली*, *चिंगुराव, चिंगुराव, केवढा तुमचा तोरा, पेरू खाता चोचीने, ढंग तुमचा न्यारा*,–!!! *मनीमाऊ, मनीमाऊ टपोरे तुमचे डोळे, शेपूट आपली फिस्कारत, करता गोल वाटोळे*,–!!! *खारुताई, खारुताई, काय खाता लपवून, कोणी आले की कशा, सुळकन जातां पळून*,–!!! *वाघोबा, वाघोबा, केवढा तुमचा दरारा, नुसते […]

विरहार्त रात्र ही

विरहार्त रात्र ही,चांदणी नभी चमचमते, भासे तीही एकटी, चमकण्यात कमी जाणवते,–!!! चेहरा तिचा उतरुनी, निस्तेज ती दिसते, का बुडाली कुणाच्या विरही, कोडे मजला वाटते,–!!! असंख्य तारे तारकापुंजी, अवकाश चांदण्यांनी भरलेले, चंद्र दिसे ना कुठे जवळी, रजत किरणांचे लेऊन शेले,–!!! समूहातून दूरच उभी, अंतरी कोलाहल उठलेले, लांबूनही ती दिसते “दुःखी*, पाणी डोळां साठलेले,–!!! वाट बघे सुधाकरांची, जीव […]

आई तू माझी जननी (चारोळी)

आई तू माझी जननी वात्सल्याची मुर्ती कशी सांभाळ केला आमचा आकाशाची घार जशी…१ आकाशाची घार जशी चित्त तुझे बाळा पाशी भरवी आम्हा लापशी जेव्हा लढा आजाराशी.. २ सौ.माणिक शुरजोशी

मिष्किल तारे

चमकत होते अगणित तारे, आकाशी ते लुक लुकणारे लक्ष्य वेधूनी घेतां घेतां,  फसवित होते आम्हांस सारे….१ कधी जाती ते चटकन मिटूनी,  केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी….२ एक एक ते जमती नभांगी,  धरणीवरल्या मांडवी अंगीं संख्या त्यांची वाढतां वाढतां,  दिसून येती अनेक रांगी….३ हसतो कुणीतरी मिश्कील तारा,  डोळे मिटतो दुजा […]

1 160 161 162 163 164 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..