विश्व सारे निर्मिलेस,काय असावे तुझ्या मनात,
हेतू असावा का निरलस,
खेद वाटे आज अंतरात,—!!!
ग्रह गोल ब्रम्हांड तारे,
निसर्ग चराचर वारे,
आज दिसती सारे भोगत, सातत्याने जणू दिनरात,–!!!
प्रदूषणे पृथ्वीला घेरत, मनुष्यप्राण्यात फक्त स्वार्थ, अहंकार कधी न जात,
सांग ठेवले काय दुनियेत,–?
लतावेली, झाडेझुडपे,
सगळे दुःखी प्राणिजात,
समस्या सगळ्या या वेढत,
अशात तू काय मिळवलेस,–?
पसारा सभोवार असत,
जिकडे तिकडे फक्त उध्वस्त, सृष्टीची फक्त वाट लागत,
कोणते समाधान मिळवतोस,!-
सौंदर्य देखणे निर्मिलेस,
त्यास क्षणभंगुरतेचा शाप,
कोणी न देई कोणास हात,
मर्म जीवनात काय ठेवलेस,–!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply