नवीन लेखन...

दिन ढळला सखया, कधी येणार तू ?

दिन ढळला सखया, कधी येणार तू ,-? नयनांची ही निरांजने, आता लागली रे विझू,–||१|| वाट तुझी पहावी किती, भासते तुझीच कमी, मलमलीची गादीही, टोचू लागली अंतर्यामी,–||२|| भोवताली सारी सुखे, एक विरह त्यांना मारे, आजुबाजूस सगळे, इहलोकीचे पसारे,–||३|| असा कुठे गेलास तू , परतण्याची वाट नाही, आभाळ तारे वारे, दशदिशा झाल्या स्तब्धही,–||४|| चातकाची अवस्था माझी, चंद्रम्यास आम्ही […]

टप टप पडती गारा (बालगीत)

इकडून तिकडे सुसाट पळतो वारा धो धो येई पाऊस टप टप पडती गारा।।धृ।। घर,दार भिजताच रे सारा चिखलची खेळण्यास जाऊ कसा बरसात गारांची डोई,पाठी,अंगावर, हा गारांचाच मारा धो धो येई पाऊस टप टप पडती गारा ।।१।। पिलू बिचारे माऊचे, गारठले हो भारी खुराड्यात कोंबड्याही, अंग चोरती सारी इवली माझी चिऊताई आणी कसा चारा धो धो येई […]

येतात तुझे आठव….

येतात तुझे आठव, गगनात काळे ढग, उरांत फक्त पाझर, शिवाय नुसते रौरव,–||१|| येतात तुझे आठव, सयींची होते बरसात, चित्तात उठे तूफांन, मनात चालते तांडव,–||२|| येतात तुझे आठव, प्रीतीचे हे संजीवन, स्मृतींचे मोठे आवर्तन, त्यांचे लागती न थांग,–||३|| येतात तुझे आठव, सरींची त्या उधळण, शब्दांचे पोकळ वाद, कल्पनांचे नुसते डांव,–||४|| येतात तुझे आठव, अश्रू असूनही शुष्क, मन […]

त्या दिवशी मला ती भेटली

त्या दिवशी मला ती भेटली म्हणण्यापेक्षा तिला पाहिले पस्तीस वर्षाने….. आम्ही एकमेकाकडे पाहिले जरा जाड झाली होती पण चांगली दिसत होती.. गळ्यात मंगळसूत्र दिसले नाही.. जरा चरकलो… तिने पाहिले.. तिची नजर गोधळली.. मी जरा हसलो… ती पण हसली.. कॉलेजचे नाव घेतले ते सुद्धा मी.. दोन मिनिटे बोललो म्हणाली आत्ता इथेच असते मी पण म्हणालो इथेच.. बाकी […]

अतृप्त भूक

चंद्रा तुझे रूप कसे रे,  गोंडसवाने छान टक लावूनी बघता, हरपूनी जाते भान मधूर शुभ्र नभी चंद्र तो,  जणू चांदीची थाली अगणीत वाट्या विखूरलेल्या,  दिसे भोवताली टपोर चांदणे वाहूनी जाते,  त्या थाली मधूनी स्वाद लूटता धुंद होतो,  घेता ते झेलूनी रिक्त होते एक वाटी ती, भरूनी जाई दुजी प्राशन करिता सीमा नसे मग,  आनंदा माजी अतृप्त […]

नेहमीच मज हे दयाघना

मद, मोह, क्रोध, वासना शरीरांतर्गत किती भावना,माणूस नावाची जादू भारते, नेहमीच मज हे दयाघना,–!!! लोभ मत्सर इर्ष्या नीचता, माणसातही आढळते क्रूरता, संपून माणुसकी, वृत्ती दानवी, दाखवतो आपली बा हीनता,–!! तरीही माणूसपण असते, एखाद्या सज्जन हृदयात, माणुसकीचे महत्व जाणे, कितीही असेल संकटात,–!!! असा सज्जन प्रेम मानतो जगातील मोठी शक्ती, हेच प्रेम असे त्याचे, जगण्याची विशाल उक्ती,–!!! मुके […]

सावित्रीचा वसा असा (अष्टाक्षरी)

वसा आहे अवघड तरी घ्यावा झटपट थोडं तरी ज्ञानदान देण्या करू खटपट सावित्रीच्या आम्ही लेकी व्रत घेतो स्वातंत्र्याचे ठेवणार आता एकी ठेचू डाव हो दुष्टांचे जन्मदिनी सावित्रीच्या नको सोहळे भाषणे कर्तृत्वाने उजळूया दाही दिशा सन्मानाने सोसू सावू सम हाल तरी द्या जशास तसा धडा अमानुषतेला सावित्रीचा वसा असा सौ.माणिक शुरजोशी नाशिक

सोनसळी चोळी माझी

सोनसळी चोळी माझी,वरती बिलोरी ऐना, भल्या भल्यांची अरे राजा, करते कशी मी दैना, पिवळाजर्द घागरा माझा, त्यावर नक्षीदार बुट्टे भोवती चंदेरी ओढणी, त्यावर निळेशार चट्टे,–!!! शेलाटी अंगकाठी, आखीव की बांधा, नाजूक नार नवेली, होईल प्रीतिची बाधा,–!!! नाक माझे चाफेकळी, रंग गोरा गोरा, पाहणारा हरखून जाई, असाच रंगेल तोरा,–!!! केतकी स्पर्श माझा, मृदू मुलायम चंपाकळी, जो तो […]

ब्रम्हांडातील ग्रहगोल तारे

ब्रम्हांडातील ग्रहगोल तारे,नेहमीच मज खुणावत, गूंज सांगत अंतरीचे, अनामिक ओढ लावत,–!!! केवढे त्यांचे गारुड हे, अंतरीची खूण पटत, त्यांच्यापुढे आपण केवढे, सिंधुतील अगदी बिंदूगत,–!!! प्रखर त्यांचे तेज असे , भुरळ पाडे चमचम चमक, हरेक कर्तव्यकठोर असे, असे प्रत्येकजण बिनचूक,–!!! आपली जागा ठाऊक असे, राहती किती स्थितप्रज्ञ , अवकाश केवढे मोठे, धीराने त्यास तोंड देत,–!!! प्रवास, दिशा, […]

आनंदाच्या हिंदोळ्यावर (लावणी)

आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलते साल नवं नवं राजसा प्रीत पाखरांचे उडवा हो तुम्ही थवं ।।धृ।। नव्या सालातील नवी सांज ,नटून बसले हो मी।। अजून सजणा नाही आले,घायाळ हरणी हो मी।। उगाच कावं उशीर केला,मनास या होती घावं।। राजसा प्रीत पाखरांचे,उडवा हो तुम्ही थवं।।१।। साज सरली रात्र झाली, भेटीलागी मी आतुरली।। विरहणीची व्यथा न्यारी, अजून तुम्हा ना कळली […]

1 158 159 160 161 162 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..