मानवता जागवली जाते (चारोळी)
मानवता जागवली जाते नसानसात जिथे संस्कृती फोफावली जाते आदर्श घडतात तिथे (१) — सौ.माणिक शुरजोशी
मानवता जागवली जाते नसानसात जिथे संस्कृती फोफावली जाते आदर्श घडतात तिथे (१) — सौ.माणिक शुरजोशी
तिळ स्नेहाचा गुळ गोडीचा ।। पौषातला सण संक्रांतीचा ।। स्नेह वाढता वाढे गोडीने ।। करिदिनी घाट धिरड्याचा।। हर्ष पतंग महोत्सवाचा।। — सौ.माणिक शुरजोशी नाशिक
तीळगुळ घ्या हो गोड गोड बोला।। खाली सांडू नका, आणि भांडू नका।।धृ।। ऊस ,बोरं ,ओंब्या, वाण लावू चला।। काटेरी हलवा गोडव्याची कला।। द्यायला मुळीच विसरूच नका।। खाली सांडू नका आणि भांडू नका।।१।। सुगड्याचं वाण लावूया गं छान।। उपयोगी वस्तू त्यांना देऊ मान।। हवाय कशाला प्लॅस्टीकचा हेका।। खाली सांडू नका आणि भांडू नका।।२।। उखाणा घेऊया मौजही करुया।। […]
मकर संक्रांत,दिवस सुर्य संक्रमणाचा।। पतंग प्रेमींचा, नभातल्या पतंगोत्सवाचा।। व्रत वैकल्यांचा,सुगड्याचं वाण लावण्याचा।। सण संक्रांतीचा,हिरवा चुडा सुहासनीचा।। — सौ.माणिक शुरजोशी नाशिक
शिखरासही जिंक तू घे भरारी उंच तू घे भरारी उंच तू…… येतील वादळे भयान अती ते भेद त्या वादळाला आहेच रे अजिंक्य तू घे भरारी उंच तू घे भरारी उंच तू…… घेऊन वारे पंखामध्ये सामावून घे जग तुझ्यात बनून यारा आसमंत तू घे भरारी उंच तू घे भरारी उंच तू……. अंधारी वाटा तुला आल्या कधी कुठेही […]
माती *अष्टाक्षरी ओवी* शिर्षक *मृदा* मृदा तुझी रुपे भिन्न चिकण,तांबडी,छान पिके खुप तिथे अन्न माती द्यावा मान पान ।।१।। राबती तुझी लेकरे अहोरात्र सेवा करी खत पाणी ही देत रे सोनं येई घरो घरी ।।२।। मातीचा टिळा लाविती बळी राजा तुझे भुषण नाही उतत,मातत तुच त्याचे आभुषण ।।३।। हा सुगीच्या दिवसात आनंद पर्वणी खास चीज होता […]
मला वाचवा वाचवा नका खुडू हो या जीवा जग आम्हा ही दाखवा मी मोलाचा ठेवा।।१।। अधिकार जन्मायचा आशिर्वाद ईश्वराचा हक्क स्वप्न बघायचा का हिसकावता।।२।। मी देशाचा अभिमान हवा तुम्हा स्वाभिमान कराल माझा सन्मान प्रजा टिकवाल।।३।। जगा आणि जगू द्या हो दिवा विझता इथे हो पणती कामा येई हो तिला जगवा हो।।४।। मी धडपडणारच मी जगी वाचणारच […]
आम्ही साहित्यिक आहोत रमू सदैव लेखणीत लिखाणात भाव असोत चलाख शब्द पेरणीत सौ.माणिक शुरजोशी
कितीही देशी शीतल चांदणे आनंदाचा ठरुनी मेरुमणी काट्यापरि हा मध्येंच ब डाग तुझा लक्ष्य खेचूनी ठाऊक नाहीं कधीं कुणाला कसा लागला डाग उरीं पडला असेल चुकून देखील कुणी रंग उधळतां वेड्यापरि शुभ्रपणाचा मानबिंदू हा डागरहित जीवन त्याचे केवळ एका डागापायीं सत्य झांकाळते कायमचे मिटून जातां डागही मिटतो उरते मागें सत्य तेवढे परि पुसण्यासाठी […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions