नवीन लेखन...

अंतर्मनाची हांक

नसे कुणी मी श्रेष्ठ कवी, वा ज्ञानी या जगतीं अभिमान वाटतो त्याचा मजला, जे माझ्या ललाटीं कृपादृष्टी ही दिसून आली, काव्येश्र्वरीची थोडी रचून कांही कविता सेविली, धुंदीमधली गोडी आशिर्वाद जरी असला तिचा, माझी ती बालके पितृत्वाचे नाते समजूनी, त्याना मी देखे कौतुक करतील कांही मंडळी, ज्याना ही आवडे उणीव दिसता त्यांत कुणाला, बाजूला ती पडे जाईन […]

वाटेवरल्या वाटसरां

वाटेवरल्या वाटसरां, भोवती घनगर्द सावली, धरती माय धरे उरापोटी, लेकुरे उदंड जाहली,–!!! वाटेवरल्या वाटसरां, इथे थंडगार पाणी, समंजस ते गावकरी, अन् सारी पर्यावरणप्रेमी,–!!! वाटेवरल्या वाटसरां, इथे सगळी हिरवाई, प्रवासीही विश्रांती घेई, जिथे हरतसे ऊनही,–!!! वाटेवरल्या वाटसरां, मनसोक्त ताव मारी, भूक लागता थोडी, विपुल रानमेवा वरी,–!!! वाटेवरल्या वाटसरां, निवांत या परिसरी, ना गोंगाट कुठला, ना कुठली गडबडही,–!!! […]

पोवाडा

माझा भारत महान हो हो माझा भारत महान।। किती गाऊ महती याची ,अपुरे माझे शब्द पडती हो जी जी जी।।धृ।। उत्तुंग इथल्या पर्वत रांगा ढाल माझ्या देशाची।। नद्या वाहती झुळझुळ इथल्या सुफलाम् रुपे वसुंधरेची हो जी जी जी।।१।। रक्षणार्थ भुमातेच्या शहीद झाली सुपुत्र माझ्या भारतीची।। झुंझारलेली शक्तीपिठे गौरवशाली गीत गाती पराक्रमाची हो जी जी जी।।२।। राम-कृष्ण […]

माती असशी मातीत मिळशी….

माती असशी मातीत मिळशी, हे तत्वच आहे सृजनी,— दया करुणा उपकार करिती,— तेच होती विलीन पांडुरंगी*–!!!! © हिमगौरी कर्वे

अस्तित्वाचा शोध

अस्तित्वाचा शोध हा माझ्या सर्वच लेखनाचा महत्वाचा धागा आहे. अर्थात सर्वांच्याच प्रेरणा या अस्तित्वाच्या शोधात असतात. आज एक वेगळी कविता आपल्यासमोर सादर करतोय. […]

 तूच माझा ईश्वर

मनांत ठसले रूप तुझे,  येते नयना पुढे  । रात्रंदिन मज चैन ना पडे…..।।धृ।। शरीर जरी सुंदर मिळे  । प्रयत्नांनी तूंच कमविले  ।। चपलता ही छाप पाडीते  । लक्ष्य खेचूनी तुझ्याकडे मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे  ।१। हासणे खेळणें आणि चालणें  । ‘ढंगदार’  तुझे बोलणे  ।। शरीरामधल्या हालचालींना  । सहजपणाचे वळण पडे मनी ठसविले रूप […]

नटखट

दही-दुध खातो खोड्याही करतो जीव माझा थकतो तरी किती पळवतो।। नटखट कान्हा येतो मुरली ही वाजवतो वेडं मला करितो यमुनाजळी लपतो।। पाठी पाठी धावतो लिला किती दावतो राधेला भुलवितो मिरेला पावतो।। भक्तांना तारतो दुष्टांना मारतो गीता ही वदतो अवतार संपवितो।। घरोघरी राहतो यशोदेसी रिझवतो बिंबात प्रतिबिंबतो जीवा मोक्षही देतो।। भजनात दंगतो भक्तीत रंगतो महिमा तुझा सांगतो […]

काव्य कलश

ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा  । उपसतो जरी सतत,  होत नसे निचरा  ।। गोड पाणी शब्दांचे,  ओठी अमृत वाटे  । पेला भरता काठोकाठ,  काव्य हृदयी उमटे  ।। पेला पेला जमवूनी,  कलश भरून आला  । नाहून जाता त्यात,  देह भान विसरला  ।। सांडता पाणी वाहे,  परसते चोहीकडे  । आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे  […]

सुखात येऊ दे स्मरण

सुखात येऊ दे स्मरण, दुःखी विचरता, काही पळें, संकटातून मज सोडवत, तुझा हात नित्य मिळे,,— पाठबळ असता अविरत, कशासाठी आम्ही घाबरावे, प्रार्थित, पूजित तुला सदैव, त्राता म्हणुनी भाकावे,–!!! तूच बंधू ,तूच सखा, तूच रक्षक आमुचा, विधाता म्हणत म्हणत, दावा करते मी साचा,–!!! हे गुरु, हे माय बापां, लौकिक या सुखदुःखात, दूर करशी अशा व्यापातापा,– आमुचा तसा […]

देणं – घेणं (हायकू)

निसर्ग देणं वापरा हो जपून आहे ते लेणं घेणे हा हक्क दिला आहे सर्वांना घेतो की चक्क किती ही हाव सदा ओरबाडतो नाशास वाव ऊस चाखावा नको चाखूस मुळ वंश जपावा हो रे सावध विनाशकाली स्वत: होशी पारध निसर्ग जप परहितात हित हे असो तप सौ.माणिक शुरजोशी नाशिक ८८७९३3८०१९

1 161 162 163 164 165 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..