थोडे राहून गेले …

लिहिले आजवर खूप, काही राहून गेले

बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले …

 

रोज सकाळी घाईत चेहरा पाहून जाई

थकून येतो बाळ जेव्हा झोपून जाई

असाच झालो मोठा डोळे सांगून गेले

बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले …

 

कष्ठ उपसले आईची त्या कदर होती

लाड पुरवले बापाने ती उधार होती

हात फिरवला जेव्हा डोई कळून आले

बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले …

 

असा घडवला हात हाता घेऊन त्याने

राखले ना काही टाकले देऊन त्याने

आठव येता डोळा पाणी साचून आले

बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले …

 

बघतो जेव्हा गर्दीत बाबा कुठेच नसतो

कधी अचानक डोळा पाणी होऊन दिसतो

पाठीवरची थाप घेण्याचे राहून गेले

बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले …

 

मी कमी तो कवितेत माझ्या बोलत आहे

सपाट जागी नसला वळणा चालत आहे

कवितेस माझ्या उंच भरारी देऊन गेले

बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले …

 

एकटक तो बघतो काही बोलत नाही

चुकले तरीही आधीसारखे सांगत नाही

छापू आपण पुस्तक तसेच राहून गेले

बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले …

 

लिहिले आजवर खूप काही राहून गेले

बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले …

 

-काव्यप्रसाद

प्रसाद गोठणकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....