नवीन लेखन...

भयानक स्वप्न !

रात्रीचे किती वाजलेत माहित नाही. पण सर्वत्र निजानीज झाली होती. रात्रीची भयाण शांतता आणि गारवा जाणवत होता. मी अंधारातच अंथरुणावर पडल्या पडल्या डोळे किलकिले करून पहिले आणि कोनोसा घेतला. मधेच जाग कशाने आली? लक्षात येत नव्हते. कसलीतरी खाडखूड ऐकू आली. बहुदा अशाच आवाजाने झोपमोड झाली असावी. पुन्हा तोच खड्खुडीचा आवाज. […]

गुरूजींची बदली

एक बातमी धडकली. गरूजींची बदली झाली. आता ते दुसऱ्या गावी जाणार होते. मनाला वेदना होऊ लागल्या. सरकारी आदेश आला होता. नाईलाज झाला होता. गुरुजींनी बदली मागितली नव्हती. तरीही बदली झाली. मुलं पोरकी झाली. मुलं रडत होती. गाव डोळे पुसत होते. पाठमोरी आकृती धुसर होत होती.  […]

व्यथा

“आहो ताई,आमच्या समद्या झोपडपट्टीत हेच हाय, येथे आम्ही घरोघरी रोजच्या वीसतीस रुपयांसाठी भांडी घासतो,कामं करतो ते काही उगीच नाही.सर्वांचे नवरे खूप कमाई करत्यात दिवसभर, आणि रात्री पुरी दारूत घालवत्या. पुन्हा काही बी बोलायचे नाही आम्ही.बोललो तर भांडण, शिव्या आणि मारामारी. जरा जास्त काही बोलायला गेलो तर हे, आज घडले तसे चालू असते चार आठ दिवसांला”. “नवरे […]

सोरड

पिकांनी माना टाकल्या होत्या. उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत होता. नद्या आटलेल्या , कोरडयाठाक पडलेल्या होत्या. अंगाभेवती चिलटं घोंगावेत. पुन्हा हातानं हानावेत. तशी माणसं कावल्यागत झाल्ती . पावसाचा शिपका जूनमधी पडून गेल्ता. त्यानंतर गोमतार शिंपडल्यावाणी तरी यायचं त्यांनी. चार- दोन ढगं आभाळात यायचे . […]

हुशार राजू

राजू नावाचा एक छोटा मुलगा. चुणचुणीत आणि गोड स्वभावाचा. सकाळी लवकर उठायचा. आंघोळ करायचा. आई वडील आणि घरातील मोठ्या माणसांच्या पायी डोके ठेवायचा. नम्रपणा हा त्यांचा विशेष गुण होता. अभ्यासातही हुशार होता. मित्रांशी सहकार्याने वागायचा. घरच्या कामाची त्याला खूप आवड होती. त्यांचे वडील त्याला खूप जीव लावायचे. सकाळी शाळेत सोडायचे.घरी आला की नाही ते पहायचे. घरी […]

हे सार थांबवा ! प्लीज !!

ती, एक नखशिखान्त पांढऱ्या रंगात रंगवलेली, सरकारी दवाखान्याच्या तळघरातील खोली होती. फार तर दहा बाय बाराची. त्यात त्या कॉटने,ज्यावर मला आता त्या नर्सने बांधले तो,निम्या पेक्षा ज्यास्त जागा व्यापली होती.  त्या खोलीला एकही खिडकी किंवा झरोका नव्हता. फक्त भिंतीशी एकरूप झालेला एक  दरवाजा होता.  तो ही पांढरा फटक! […]

यडा.. पणा

सातारा स्टँडवर सरवांची वर्दळ सुरू असल्यानं स्टँड बहरल व्हती,कॉलेज ची गावठी पोरं उगाचच उनाडक्या करीत इकडून तिकडं फिरत व्हतं..त्यासनी असं वाटत व्हतं जणू सगळ्या जगाची अक्कल त्यासनी आलीय…एक एका गावची एस टी येत व्हती तसं पोरा अन पोरींचा घोळका लगबगीनं गाडीकड धाव घेत एकमेकांसनी म्होर ढकलत जात व्हता. […]

मुंबईची का. क योजना

रोजची पहाट या प्रसिद्ध दैनिकाचे संपादक, विशेषांक सम्राट, श्री सूर्याजीराव रवीसांडे आपल्या दाढीचे खुंट खाजवत अत्यंत खिन्न मुद्रेने बसले होते. दर आठवड्याला एक विशेषांक ही रोजची पहाट ची खासियत आणि त्यातूनही गुढीपाडव्याचा विशेषांक हा तर खूप मानाचा. […]

वास्तु विशेषांक

दैनिक रोजची पहाट चे संपादक आणि विशेषांकांचे सम्राट सूर्याजी रवीसांडे, काका सरधोपटांची वाट पाहत होते. काका सरधोपट, रोजची पहाट चे मुख्य वार्ताहर. वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा असा अवलिया. यांच्या मुलाखती घेण्याच्याकौशल्यावर संपादकांनी आपल्या सम्राटपदाचा डोलारा उभा केला होता. तसं तर रवीसांडे आणि  रोजची पहाट दाखवणारा रवी यांच्यात काही साटंलोटं नाही. त्यांचे मूळ नाव ताकसांडे, […]

1 91 92 93 94 95 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..