नवीन लेखन...

बालकुमार -कथा – मोन्या

आपल्याला मित्र असणे कित्ती छान असते नाही का ? मित्राबरोबर खूप गप्पा मारता येतात,खेळता येते आणि खेळता खेळता भांडता सुद्धा येते, मित्रशिवाय आपल्याला करमत नसते हे तितकेच खरे. […]

मॅचिंग मंगळसूत्र

पूर्वीच्या काळी गावागावात, चोपेवर, देवळाच्या पारावर, किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाच्या सावलीत चौथऱ्यावर त्याचप्रमाणे शहरातील मुख्य चौकात, एखाद्या पानठेल्यावर किंवा नाक्यावर लोक समूहाने एकत्र यायचे. उशिरापर्यंत त्यांचे रात्री गप्पांचे फड बसायचे. त्याच पद्धतीने हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून, व्हाट्सअप किंवा फेसबुक यांच्या ओट्यावर बसून म्हणू या हवं तर आपण. तर समूहानेच एकत्र येऊन गप्पांचे फड रात्री उशिरापर्यंत भरलेले दिसून […]

शंभरी काश्या

इतिहासाने ज्यांना दीर्घकाळ उपेक्षीत ठेवलं ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छावा संभाजी महाराजांना ‘तह’ कधीच मान्य नव्हता. ७०च्या दशकात त्या संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत सुंदररित्या वठवून त्या अनभिषिक्त राजाला न्याय देण्याचा काम ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्यातून केले ते म्हणजे मराठी रंगभूमीवरचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर. घाणेकरांना सुद्धा तडजोड, लाचारी मान्य नव्हतीच. म्हणून ज्या नाटकाने त्यांना मराठी […]

शापित बालपण

‘ ए पोऱ्या,चार ग्लास घेऊन ये रे. अद्रक थोडे जास्त घालायला सांग रे.’ ‘अरे, बाबा दोन कट घेऊन ये.’ किंवा, ‘झाडू फरशी साठी, घरकामासाठी तुझी मुलगी आली तरी चालेल’. हा कामवाली बरोबर चाललेला संवाद. अशा प्रकारचे संवाद दरोज कुठेतरी दिवसभरात कानावर पडतातच आपल्या. रसवंतीच्या दुकानावर वरील शब्द कानी पडले, आणि चमकून बघितले तर, एक अकरा बारा […]

प्लीज येवू दे ना !

बाहेरच चमकदार निळसर आकाश,त्या खाली नुकताच पिंजलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग,सुनीलला विमानाच्या खिडकीतून दिसत होते. खिडकीशेजारचा विमानाचा पंखा,त्या मावळतीच्या सोनेरी सूर्य प्रकाशात तळपत्या तलवारीच्या पात्या सारखा भासत होता. ‘विरोध करणाऱ्याला कापून काढीन ‘ असा त्याचा अविर्भाव होता. […]

फरिश्ता !

रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें. […]

भयानक स्वप्न !

रात्रीचे किती वाजलेत माहित नाही. पण सर्वत्र निजानीज झाली होती. रात्रीची भयाण शांतता आणि गारवा जाणवत होता. मी अंधारातच अंथरुणावर पडल्या पडल्या डोळे किलकिले करून पहिले आणि कोनोसा घेतला. मधेच जाग कशाने आली? लक्षात येत नव्हते. कसलीतरी खाडखूड ऐकू आली. बहुदा अशाच आवाजाने झोपमोड झाली असावी. पुन्हा तोच खड्खुडीचा आवाज. […]

1 90 91 92 93 94 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..