नवीन लेखन...

बंधन (बॉण्ड) – (एक कथा)

“अहो पण! लोक काय म्हणतील? पहिल्या बाळंतपणाला लेकीने आईकडे यायचं तर आईच लेकीकडे जाऊन राह्यली. आता सगळयांना हे सांगत फिरायचं का की माझ्या लेकीलाच इकडे यायचं नाही?” काल तिला आर्याने तसं सांगितल्यापासून सुलभाची चिडचिड सुरु झाली होती. आर्या सुलभाची मुलगी पहिल्यांदा प्रेग्नन्ट होती. सातवा लागला म्हणून सुलभाने माहेरी आणायचा विषय काढला तर तिने, तुच इकडे ये म्हणून सुलभाला सकंटात टाकलं होतं. […]

बांड मस… (बोलीभाषेतील लघु कथा)

सोमवारी रातीच्यान जरा गडबड होती घरात. मोठ्या म्हशीला डब्बल भरडा घाल, उरल्या सुरल्या शिळ्या भाकरी मोडून घाल अशी धावपळ गंवडीमामा करत होता. शेलका चारा फक्त त्या मोठ्या म्हशीला घातला व उरलेल्या खंडोरभर 8 जनावरांसनी नुसतं पिंजरावर बसविलं.. ह्या सर्व धावपळीच्या मागच गम्य मला त्या रातीला उमगलचं नाही. त्यानंतर असच सहज फेरी मारून येवूया म्हणून दोन दिवसांनंतर […]

मारेकरी!

“श्लोका! हि स्वीटी! माझी होणारी बायको! महत्वाचं म्हणजे हि ‘वास्को’ लीकरवाले पाखरे यांची कन्या आहे!” सुमितने नाटकी ढंगात स्वीटीची ओळख, श्लोकाला करून दिली. लीकरच्या बॅरल सारख्या ‘स्वीटी’ने दोन्ही हात जोडून नमस्कार केल्या सारखा केला.  […]

सृष्टीकर्त्याचे अप्रतिम चित्र

डोक्यात प्रकाश पडला,जे माहित नाही ते तिमिर कारण अंधारत कुणाला काहीच दिसत नाही. तिमिराच्या आवरणात दडलेला विभु, अर्थात स्वयं प्रकाशित आत्मा अर्थात सृष्टी निर्माता परमेश्वर, कुणाला दिसणे शक्यच नाही.  त्याच सृष्टीकर्त्याचे चित्र सॉफ्टवेअरच्या  मदतीने काढले. […]

कथा काळोखाची !

महाराज कृष्णकुंभांनी राजकुमारी कृष्णाकडे नजर टाकली. आज काहीतरी बिनसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांना काय समस्या आहे हे त्यांनीच विचारावे हि महाराजांची अपेक्षा होती. म्हणून ते वाट पहात होते. कृष्णा उद्याच्या, या महाकाय सामराज्याच्या एकमेव उत्तराधिकारी होत्या. त्याना तीक्ष्ण बुद्धीचे वरदान मिळालेले होते. पण अजून पोर वयाचं. अनुभव नगण्यच होता.  […]

वरची खोली (कथा)

मी एका बांधकाम कंपनीच्या भल्यामोठ्या कार्यक्षेत्रात नोकरी करणारा एक सामान्य  इंजिनियर होतो , आमच्या कंपनीला या गावाच्या जवळून जाणाऱ्या महामार्गाचे काम मिळाले आणि , या कामाची बातमी स्टाफ मध्ये पसरली …मी पण  साहेबांच्या मागे लागून .नव्हे अगदी हट्ट करून  प्रोजेक्ट करणाऱ्या टीम मध्ये मी  माझा समावेश करून घेतला महिन्यापूर्वी या  साईटवर आलो. […]

भव्य देवालय आणि भक्त (रूपक कथा)

भक्तांनी त्यांच्या अवतारी देवतेचे भव्य मंदिर उभारले. मंदिराचा कळस सोन्याचा होता. मंदिरात भव्य सभामंडप होते. सभामंडपाच्या भिंतींवर बारीक कोरीव काम हि होते. गर्भगृहात माणिक-मोती धारण केलेली त्या देवतेची सुवर्ण मूर्ती होती. मंदिराच्या आवारात भक्तांची गर्दी होती. सर्वांचा मनात देव दर्शनाची अभिलाषा. […]

त्या रात्री !

वयाच्या साठीकडे झुकलेले वामनराव तसे मोठे शिस्तीचे भोक्ते. नियमित वागणे, मृदू बोलणे.  मुलगी, स्वाती (जर्मनीत),  मुलगा, शेखर आय.आय.टी. (फायनलला ), पुण्यात कोथरूड सारख्या भागात स्वतंत्र बांगला. एकंदर ते एक ‘आदर्श जेष्ठ नागरिक ‘ होण्याच्या बेतांतले, उच्च माध्यम वर्गीय गृहस्थ.  […]

मुक्ती दूत

मी चोचीने पंखात अडकलेली ती शुष्क काडी काढून टाकली. चोचीनेच पंखाची पिस सारखी केली. तेव्हड्यात माझे लक्ष समोर गेले. तो लिंग देह एका वृद्ध स्त्रीचा होता. मी माझ्या एकुलत्या एक डोळ्याने निरखून पहिले. तीने साधारण साठी ओलांडलेली होती. म्हणजे बऱ्यापैकी जगलेली होती. खात्यापित्या घरची असावी. तरी पण ती दुःखी दिसत होती. […]

आभास (दिर्घ कथा)

अजयची बस रामगड थांब्यावर पोचली तेव्हा संध्याकाळचे सात वाजून गेले होते. रामगड हे एक छोटे तालुक्याचे गाव होते. दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने आता थोडी विश्रांती घेतली होती. मात्र वातावरण कुंद होते व हवेत प्रचंड गारठा आला होता. बसच्या दिवसभराच्या प्रवासाने अजय खूप वैतागला होता. […]

1 88 89 90 91 92 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..