कथा
तिमिरातूनी तेजाकडे
सिद्धांत आणि मानव खूप जवळचे मित्र. त्यातला मानव अर्धे शिक्षण गावात पूर्ण करून आलेला आणि सिद्धांत अस्सल शहरी मुलगा. दोघेही विज्ञान शाखेचे पदवीधर. खूप दिवसांनी मानव आणि सिद्धांत ऐकमेकांना भेटतात. ते एका हॉटेल मध्ये भेटतात. त्यावेळी त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. […]
विज्या
विजय बारा वर्षाचा होता . गावात याला सगळे विज्या म्हणूनच हाक मारायचे. समुद्राच्या काठावर वसलेले ते छोटेसे कोकणातले मच्छीमारांचे गाव. बहुतांशी कुटुंबांचा उदरनिर्वाह मासेमारीवरच चालायचा. विज्याच्या वडिलांची पण एक होडी होती. गावातली चार पाच लोकं त्याच्या होडीवर कामाला होती. एकत्र कुटुंब असल्यामुळे विज्याच्या घरी माणसांचा राबता खूप होता. विज्याला दोन भावंड होती, नववीत असलेला एक मोठा […]
ती आणि मी – दीपस्तंभ (कथा)
माझेही बरे चालले होते माझी चित्रे खपत होती.परंतु त्या दाढीवाल्याने मात्र पार मार्केट हलवून ठेवले होते.तो दाढीवाला आणि मी दोस्त होतो , परंतु दाढीवाला जबरदस्तच होता. अर्थात तिचाही तो मित्र होता. […]
आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १४
पण ही कथा फक्त निशा आणि रोहनची नाहीये…. असे आपल्या परिचयातले अनेक निशा आणि रोहन अचानक गेलेले असतात. पण व्यक्तीशः आपण…..आपण….असं कुणाच्याच बाबतीत परत होवू नये म्हणून काय करतो? या कथेच्या निमित्तानं मला तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत…. […]
प्रवास एका वर्तुळाचा….
ती गाडीतून खाली उतरली पाठोपाठ दोन मुले आणि एक म्हातारी बाई पण उतरली,ती तिची सासू असणार असा मी अंदाज केला होता , ती सासूच होती. ते सर्वजण जवळ आले तेव्हा ती सून हसली माझ्याकडे बघून, मी पण हसले. पण तिच्या सासूला जेव्हा बघितले तेव्हा लक्षात आले ह्या बाईना कुठेतरी आधी, पूर्वी पाहिले आहे, ती सासूपण हसली ,
ती पण माझ्याकडे बघत होती. […]
आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १३
निशा रोहनला म्हणाली, “रोहन, हे लोकं असं सहजासहजी माझं ऐकतील, असं मला वाटत नाही. चल, आपण जबरदस्ती त्यांच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये जाऊया.” असं म्हणून निशाने रोहनचा हात पकडला आणि ती जोरात ऍम्ब्युलन्सच्या दाराजवळ गेली. आत बसायला जागा कुठे आहे हे पाहण्यासाठी तिनं आत नजर टाकली आणि तिनं जोरात किंकाळी फोडली….. आणि ती दचकून मागं सरकली….. […]
आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १२
दोन्ही गाड्या थांबलेल्या पाहून निशा आणि रोहन बाकावरून उठून तिकडे जावू लागले. ऍम्ब्युलन्स मधून दोन माणसं उतरली. त्यांनी ऍम्ब्युलन्सचे मागचे दार उघडून त्यातून एक स्ट्रेचर बाहेर ओढून काढला आणि ते रस्त्याच्या कडेला झाडीत शोधू लागले. तोपर्यंत एक डॉक्टरही खाली उतरले. त्या दोन लोकांच्या मागोमाग तेहि झाडीत खाली उतरू लागले. […]
