नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग १३

दी सांगू लागली …… “आमच्या पूर्वजांनी गढीमध्येच एक तीन मजली गोल असा सुंदर महाल बांधला होता. त्या महालाच्या मध्यभागी २५ फूट व्यासाची आणि तीन मजले खोलीची, म्हणजे अंदाजे चाळीस फूट खोल,गोड्या पाण्याची विहीर होती. गढीच्या शेजारूनच नदी जात असल्यामुळे विहिरीला बारमाही पाणी असे. शिवाय महालाच्या बाहेरील बाजूसही मोठमोठे चर खणून पावसाळ्यातील पाणी त्यात साठवून ते पाणी विहिरीत मुरवले जाईल अशी व्यवस्था केली होती. […]

अजब न्याय नियतीचा – भाग १२

नदीच्या वरच्या बाजूला एक छोटीशी टेकडी होती. टेकडीवर एक आंबामातेचे मंदीर होते. मंदिराकडे जायला डांबरी रास्ता होता आणि नदीच्या कडेने वर जाण्यासाठी पायऱ्या पण बांधलेल्या होत्या. खालून टेकडीकडे पाहताना हिरव्यागार डोंगरातून दिसणारा वर पर्यंत जाणारा नागमोडी रस्ता आणि ठिकठिकाणी बांधलेल्या कमानीतून वर जाणाऱ्या पायऱ्या यांचे खूपच मनोहारी दृष्य दिसत होते. मग सगळ्यांनी गाडी पायथ्याशी लावून पायऱ्या […]

अजब न्याय नियतीचा – भाग ११

१० तारखेला दिवसभराच्या गडबडीत आरू तिचा वाढदिवस आहे हे विसरूनच गेली होती. गम्मत म्हणजे दीने, नीलने किंवा तिच्या मित्र-मैत्रिणींपैकी कुणीही तिला दिवसभरात वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रत्यक्ष किंवा मेसेज करून दिल्या नव्हत्या. संध्याकाळी नील एका Surprise Party साठी दोघींना घेऊन बाहेर पडला. […]

अजब न्याय नियतीचा – भाग १०

नील आणि आरू दीचे निरीक्षण करत होते…. तिचा चेहेरा थोडा ओढल्यासारखा दिसत होता. कालचा विषय कसा काढावा याचा ते विचार करत होते. शेवटी काल रात्री नक्की काय झालं ते दीनं सांगितल्याशिवाय त्यांना कळणारच नव्हते. दी शांतपणे पेपर वाचत चहा पीत होती. जरा वेळाने दीचे दोघांकडे लक्ष गेले…. दी हसून म्हणाली, “अरे, तुम्ही दोघे असे काय बघताय माझ्याकडे? माझ्या तोंडाला काही लागले आहे का?” […]

अजब न्याय नियतीचा – भाग ९

तिघेही गाडीतून नदीच्या जवळ आली. गाडी बाजूला लावून घाटाच्या पायऱ्यांवरून ते गप्पा मारत फिरत होते. आरुला तर गांवी यायला आणि असे नदीवर फिरायला खूपच आवडत असे, पण हल्ली गांवी जास्त येणं होत नव्हतं. नील आणि दीच्या गप्पा चालल्या होत्या. बोलत बोलत ते दोघे थोडे अंतर पुढे निघून गेले. […]

अजब न्याय नियतीचा – भाग ८

ठरल्याप्रमाणे आठ दिवसांनंतर नीलच्या गाडीतून चारू, आरू आणि नील गांवी जायला निघाले. मुंबईपासून गावापर्यंचे अंतर ४५० ते ५०० किलोमीटर तरी होते. पण गाडीत छानशी गाणी ऐकत, गप्पा मारत, अधुन मधून रस्त्यात निसर्गरम्य परिसरांत थांबून तिथले फोटो काढत, रमत गमत संध्याकाळ्च्या सुमारास ते गांवी पोहोचले. […]

अजब न्याय नियतीचा – भाग ७

आरूने तिचे शेड्युल पाहून १२ ते १५ फेब्रुवारी या तारखा गांवी जाण्यासाठी नक्की केल्या. जाण्यापूर्वी तिला तिच्या पूर्ण ऑर्केस्ट्रामधील इतर मित्रमंडळींना प्रॅक्टिस संबंधी महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या. चार-पाच दिवसांसाठी ट्रीपला जात असल्यामुळे घरातील इतर गोष्टींची व्यवस्था लावायला हवी होती. गांवी लागणाऱ्या वस्तूंचे शॉपिंग करायचे होते. […]

अजब न्याय नियतीचा – भाग ६

तिघंही कॉफी पीत बराच वेळ गप्पा मारत बसले होते. नीलशी बोलताना दी खूपच आनंदी दिसत होती…… नील जरी आरूचा मित्र होता तरी तो घरी आल्यापासून दीबरोबरच जास्त गप्पा मारत होता. आरू एकदा दीकडे आणि एकदा नीलकडे समाधानाने पाहात बसली होती. आज तीला तिच्या दीचा आनंद जास्त महत्त्वाचा वाटत होता. […]

अजब न्याय नियतीचा – भाग ५

नील एक एक चित्र निरखून पाहू लागला. प्रत्येक चित्र पाहताना वाह, सुंदर, अप्रतिम, अमेझिंग, सॉलिड, क्या बात हैं असे म्हणत तो पुढे पुढे जात होता. नील चित्रं पाहत असताना चारुदी तिथेच उभी राहून त्याचे निरीक्षण करत होती. तो मनापासून चित्रांचे कौतुक करतोय हे पाहून तिच्या चेहेऱ्यावर समाधानाचे हसू झळकू लागले. […]

अजब न्याय नियतीचा – भाग ४

बोलत बोलत तो चारूदीच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला आणि दीच्या नजरेला नजर मिळवत तो म्हणाला, ” खरं तर सुंदर आणि सुगंधी गुलाबाची फुलं आवडत नाहीत अशी कुणी सुंदर मुलगी, निदान माझ्यातरी पाहण्यात नाही. So, मी मनकवडा वगैरे काही नाही….. असच…. सहजच आणली. पण तुम्हाला मनापासून आवडली ना ही फुलं? मग झालं तर….” […]

1 85 86 87 88 89 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..