नवीन लेखन...

नवरात्र .. माळ चौथी

पहाटे जाग आली की कधी कधी दिवसाची सुंदर सुरवात होते तुमच्या देखण्या , दैवी सुरांच्या सोबतीने ! आणि मग आपण जे प्रत्येक काम करतोय त्यात आनंद वाटू लागतो …. तुमच्या शाश्वत सुरांचे बोट धरून मन लांबवर डोंगरदऱ्यात खळाळणाऱ्या झऱ्याकाठी फिरूनही येतं .. ताजंतवानं होतं .! पंचमहाभूतांवर विजय मिळवू शकणारी ही अद्भूत कला अवगत करण्यासाठी लहानपणापासूनच तुमची […]

नवरात्र …माळ तिसरी

तसं बघायला गेलं तर तिचा माझा काहीच संबंध नाही दूर दूरपर्यंत .. पण तरीही माझ्या मनाचा एक कोपरा तिने व्यापलाच आहे . तिच्या माझ्यात जवळ जवळ एका पिढीचे अंतर .. ती कुणा दुसऱ्या देशातली , दुसऱ्या धर्माची , वेगळ्या संस्कारात …वेगळ्या चालीरीतीत वाढलेली .. .. रितीरिवाज , परंपरांच्या बेडया , पिढयानपिढया चालत आलेले संस्कार .. सगळ्या […]

अजब न्याय नियतीचा – भाग १९

आरू काही क्षण नीलकडे पाहात राहिली, मग हलकेच तिने तिचे डोके त्याचा खांद्यावर ठेवले  म्हणाली,  “नील किती करतोस ना तू माझ्यासाठी.  माझ्या दीचा प्रॉब्लेम तो तुझा प्रॉब्लेम असल्यासारखा तू झपाटून ती चांगली व्हावी म्हणून किती प्रयन्त करतो आहेस. देव करो आणि तुझ्या प्रयत्नांना यश येवो.” […]

अजब न्याय नियतीचा – भाग १८

त्या दिवशी exactly काय घडलं ते आरू सांगत होती. “14 तारखेला आम्ही तिघं खरंतर गढी बघायला जाणार होतो. तोपर्यंत दीने गढीविषयी आम्हाला काहीच माहिती दिली नव्हती. आपण गढी पहायला गेलो की माहिती सांगेन असं ती म्हणाली. परवा आपण देवळात गेलो तेव्हा तू विचारलंस म्हणून दीने आपल्याला गढीची माहिती सांगितली. […]

मैत्रीची परिभाषा

तसे पाहिले तर आपण जन्माला एकटे येतो आणि जाणार पण एकटेच असतो. त्यामुळे मैत्री अमर असते, जीवास जीव देणारी असते ह्या सर्व बोलायच्या गोष्टी असतात. कोणाचेच आयुष्य कोणावाचून थांबत नसते. हेच सर्व प्रकारच्या संबंधांना लागू आहे. त्यात कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक आणि व्यावसायिक संबंधातही असे कप्पे करून जगल्यास आयुष्य सुखकर होते. […]

अजब न्याय नियतीचा – भाग १७

माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या मैत्रिणींना राज माझा होणारा जिजू आहे असंच माहिती होतं. तो कधीकधी कॉलेजवरून जाताना मला भेटायला येत असे. मग आम्ही कॉफीशॉपमध्ये जाऊन गप्पा मारत असू. कधी लेक्चर्स ऑफ असतील तर मुव्ही बघायला पण जात असू. […]

अजब न्याय नियतीचा – भाग १६

आरू आपल्याच नादात वर्णन करत होती, नील तिच्या चेहेऱ्याकडे पहात होता. आरुच्या तोंडून राजची माहिती ऐकताना त्याच्या चेहेऱ्यावर कधी आनंदाचे, कधी कौतुकाचे तर कधी दुःखाचे भाव झरझर बदलत होते. पण दोघेही नदीच्या पात्रात पाय ठेवून शेजारी बसले होते आणि बोलताना आरू नदीपात्राकडे पहात एक एक गोष्ट आठवत सांगत होती. त्यामुळे नीलच्या चेहेऱ्यावर तिचे अजिबातच लक्ष नव्हते. […]

नवरात्र …पहिली माळ !

या जगात माझा प्रवेश झाल्या झाल्या जेव्हा कधी मी डोळे उघडले असतील तेव्हा पहिल्यांदा मी हिलाच पाहिलं असावं बहुधा .. हो माझ्या आईची आई .. प्रमिलाआजी ! कारण दुसऱ्या बाळंतपणासाठी आईची रवानगी बुरहानपूरहून डोंबिवलीला तिच्या माहेरी झाली होती … तिच्या आईकडे ! मी जन्मले आणि त्याच दरम्यान माझ्या डोंबिवलीच्या आजोबांना नोकरीत बढती मिळाली . .पत्र्याच्या चाळीतल्या […]

अजब न्याय नियतीचा – भाग १५

सगळीकडे संध्याकाळची किरणे पसरली होती. घाटावरून लोकांची परतण्याची लगबग चालली होती. जवळच्या देवळांतून सायंआरतीचे आवाज येत होते. एकंदर खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. आरू या वातावरणाशी तद्रूप झाली होती. एक शांत सुंदर भाव तिच्या चेहेर्‍यावर पसरला होता. नील तिच्या या लोभस रूपाकडे एकटक पहात बसला होता. जवळच्या देवळातील घंटानादाने आरूची तंद्री भंग पावली. तिचे नीलकडे लक्ष गेले. तो तिच्याकडेच पहात होता. […]

अजब न्याय नियतीचा – भाग १४

दुसऱ्या दिवशी सकाळी, चहा नाष्टा झाल्यावर सगळ्यांनी गढीवर जायचे ठरले. वाटेत मॅनेजर केळकर आणि गढीतील विहीर बुजवायचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्यासोबत गढीवर येणार होता. ठरल्याप्रमाणे वाड्यावरून निघताना दीने केळकरांना फोन करून मंदिराच्या पायथ्याशी थांबण्यास सांगितले. थोड्याच वेळात ते पायथ्याशी पोहोचले. केळकर दुसरी गाडी घेवून आले होतेच. मग सगळेजण बरोबर गढीच्या दिशेने निघाले. आरूला आणि नीलला कधी […]

1 84 85 86 87 88 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..