Avatar
About गजानन साताप्पा मोहिते
M. Sc in organic chemistry. D. Lib

खूप भेटल्या……

तुझ्या सारख्या खूप भेटल्या , पण आपलंसं कोणी वाटलं नाही का कुणास ठाऊक.. तुझा विचार सोडून दुसर्‍याच्या विचार करणं…. माझ्या मनाला ही पटलं नाही. स्वप्न आहे एक माझं, मला ते पूर्ण करायचंय…. पाल्याचा कुड लावलेल्या घराला, बंगल्याच रुपडं आणायचंय….. जिद्द आहे उरी, त्यात पूरता गुंतलोय जरा….. दमलेल्या आई वडिलांना, आत्ता सुखाचा तरी घास देतो खरा …… […]

बांड मस… (बोलीभाषेतील लघु कथा)

सोमवारी रातीच्यान जरा गडबड होती घरात. मोठ्या म्हशीला डब्बल भरडा घाल, उरल्या सुरल्या शिळ्या भाकरी मोडून घाल अशी धावपळ गंवडीमामा करत होता. शेलका चारा फक्त त्या मोठ्या म्हशीला घातला व उरलेल्या खंडोरभर 8 जनावरांसनी नुसतं पिंजरावर बसविलं.. ह्या सर्व धावपळीच्या मागच गम्य मला त्या रातीला उमगलचं नाही. त्यानंतर असच सहज फेरी मारून येवूया म्हणून दोन दिवसांनंतर […]

माझं काही.. उरलं नाही.

‘माझं काही……… उरलं नाही.’ जीवनांत या जगण्यासारखं, फार काही राहिलं नाही…. निराश झालं आहे मन, आत्ता काही उरलं नाही…. नाही नोकरी – नाही पैसा, फक्त होता आधार तुझा…. पण…. तुझ्या जाण्यानं, तो – ही आत्ता राहिला नाही…. जीवनांत मी इतरांसारख, फार असं काही केलं नाही…. फक्त तू.. अन् तुझा विचार, तुझ्याविनं काही पाहिलं नाही…. माझं माझं […]

जुनं घर…..

अबोलतेच्या आठवणींनी, भरलं होतं जुनं घर….. गाई गुऱ्हांच्या आस्तित्वात, फुललं होतं द्वार….. चतुर बंधूंच्या नात्याला, कष्टाची होती धार….. माणुसकीच्या- जुन्या काळात, इथं सुख होती दूर…… काळ्या मातीतल्या धान्यांन, भरलं होतं जुनं घर…… कष्ट होतं भरपूर, पण- “गरीबी होती फार”….. दोन बंधूच्या वाटणीनं, बदललं पारं द्वार आजोबा व वडिलांच्या माझ्या-कष्टाची, आठवण येतं आहे फार….. नाही राहिलं माझं, […]

नको वाटतं – असं जगणं

नको वाटतं जगात, असं साधेपणाने जगणं….. फक्त – गरिग म्हणून, जुन्या कपड्यात फिरणं….. नको वाटतं समाजात, एकत्र मिळून राहणं….. नोकरी नाही म्हणून, सतत तचं बोलुन घेणं….. आयुष्य भर दुसऱ्याच्याच, इशाऱ्यावर – – नाचणं….. नको वाटतं ‘नको वाटतं’, असं  फटकळ जगणं….. — गजानन साताप्पा मोहिते 

जीवन…..एक हुरहूर.

जीवन झेप कुठे घेईल,  याची मला हुरहूर आहे…… चार पैशाच्या कर्जापायी,  गाव रान्हं सोडलं आहे….. गावात शेत छान माझ्या, पण पैशाची कमी आहे…..  चार पैशाच्या कर्जानं ,  जीवन ओझं झालं आहे…..  स्वार्थाच्या मोही जगात,  सर्वच मला अनोळखी आहे…..  मी फक्त – स्तब्ध,  जग पुढं चाललं आहे…..  पैशाच्या आतुरतेचा,  माणूस गुलाम बनला आहे…..  गरीबाच्या शब्दांना – – […]

आत्ता खरंच….

आत्ता चं दिवस हे दिवसासारखं, खरंच मला वाटत नाही…. आत्ता माझ्या चेहऱ्यावर, खरंच हसू येत नाही…. आत्ता तुझ्या आठवणी विना , मला काही आठवत नाही…. आत्ता वाटतं तुझ्या विना, काहीही जीवनात नाही…. आत्ता प्रिये तुझ्या सारखं, कुणी गोड बोलत नाही…. एकाकी एकटा असतो, कुणीही विचारत नाही…. आत्ता प्रिये पूर्वीसारखं, नवं काय स्वप्नात नाही…. एकटेपणा आहे फक्त, […]