नवीन लेखन...

बांड मस… (बोलीभाषेतील लघु कथा)

सोमवारी रातीच्यान जरा गडबड होती घरात. मोठ्या म्हशीला डब्बल भरडा घाल, उरल्या सुरल्या शिळ्या भाकरी मोडून घाल अशी धावपळ गंवडीमामा करत होता. शेलका चारा फक्त त्या मोठ्या म्हशीला घातला व उरलेल्या खंडोरभर 8 जनावरांसनी नुसतं पिंजरावर बसविलं.. ह्या सर्व धावपळीच्या मागच गम्य मला त्या रातीला उमगलचं नाही. त्यानंतर असच सहज फेरी मारून येवूया म्हणून दोन दिवसांनंतर शशीदाच्या घरी गेलो. जरा घरी निराशमय वातावरण होतं. काय भानगड काय समजत नव्हती.

मग फांगसूनच जरा शशीदाच्या आईला मी विचारलं ‘काय झालं आज घर जरा शांतच दिसतयं’..

त्या म्हणाल्या’ काय नाही बाबा’

मग मीच सोप्यासनं मागं पार रोजच्या सवयीप्रमाणे गोठ्या कडं निरखून बघितलं. आज गोठ्यात पोकळी जाणवत होती.. हत्ती सारखी बलदंड म्हस आज गोठ्यात बघायला मिळाली नाही. सरळ गल्ली च्या सोप्या ला आलो. आत्ता जरा जोर लावून ईचारलं ‘म्हशीची काय भानगड’

शशीदाची आई निराश स्वरात म्हणाली ‘ईकली कालच्या मंगळवारच्या बाजारात’ निसत्या 35000रु घेवून त्या हेड्याच्या मड्यावर घालून आला तुझा गंवडीमामा…….. 60000 ची मस माझी फुकटात गेली….. तेच म्हंटल मनाला… काल शशीदा डेअरीत दूध लिहुन घेताना रडका चेहरा होता त्यातच रोजच्या परमानं हसतखेळत बी नव्हता. कदाचित दोन पाण्याचं ठिपूस पाडून आलं असाव असा निरागस त्वांड करून बसलं होतं खुर्चीत… मग जरा शशीदाच्या आईला म्हटलं झालेले झालं… आत्ता आहित त्या आठ रेड्डया मोठ्या करायच्या. त्या म्हणाल्या व्हय बाबा… मग त्यांनी त्या ईकलेल्या रेडीची स्टोरी सांगायला चालू केली…… करेक्ट 2003 ला एका पहिल्या जुन्या दोन लिटर पिळणाऱ्या मसीन ही रेड्डी दिली. त्यावेळी ह्यो तुझा शशीदा मराठी शाळेत व्हता. तवापासून या रेड्डी वर शशीदाचा लईच जीव म्हण. अगदी वर्षाच होत त्यावेळी कोतोळ येवून मरतोंगडी ला आलं रेडकू पण या शशीदा नं सरकारी दवाखान्यातुन जंताच आवषध देवून याला मोठं धाठ केलं. नंतर तीन वर्षानी ती निसर्ग नियमानं गाबाला आली. पहिला माज राहूदे म्हणून जिरवला तो परत यायला सा महिने गेलं. परत गाबाला घालवली ती फेल गेली. असं करत करत पाच सहा वकोत मसीन दमबीवल. तवर ईकडं शशीदा बारावी पास होवून आखर शेवटी पुण्यात कामावर गेलं.. पण जाताना सांगितलं गंवडीमामा ला ताकीद देवून गेला. ईकायची नाही मस… नंतर सहा महिने कड काढला शशीदाच्या पपा म्हणजेच गंवडीमामानं आणि काढली रेड्डी ईकायला. ही बातमी शशीदाला हा हा म्हणत पुण्यात मिळाली. मग फिरवला लोकल कॉईन बॉक्स आणि सरळ लावला कि पुण्यात नं गावातल्या शेजारी चौगले साहेंबाच्या त…. ‘रेड्डी जर ईकली तर पुणं सोडून घराकड येणार बघा….. गंवडीमामा कंटाळून म्हणालत आजअखेर 9वरीस झालं पोरा रेड्डीला….. गाब जायाचा पत्ता नाही. ईलाक्यातल्या सगळ्या डॉक्टरांनी हात टेकल्यात आत्ता…. शशीदा फोनवरून म्हणाला’अजून जरा पाळून बघा खरं ईकायची नाही…… नाहीतर जिथं दिलं त्या घरातून दाव्याची सोडून आणणार बघा……. अशीच दोन वर्ष गेली शशीदा बी पुण्यासनं आला बेरोजगारी मुळं…… वरीस होतं 2014 शशीदानं आत्ता पूर्ण वेळ ढोराच्याकड लक्ष दिलं.. तीनच महिन्यात 11 वर्ष गाब न गेलेली मस गाब गेली. सयाजी डॉक्टर ला फेटा व 2000 रु स्वखुशीनं शशीदानं पण दिलं….. 11 वरिस बांड मसीला गाब गेलेली बघून घरदार आनंदी झालं…. या मसीची आत्ता 3 येतं झाली 2 रेड्डी व 1 रेड्डा दिला. या पाच वरसात त्या मसीबरोबर 8 रेड्या उभ्या केल्या शशीदानं… एका मोठ्या गोठ्या चं स्वप्न ऊराशी बाळगून….. पण त्या स्वप्नास खीळ बसली ती या मस विक्री नं…………………. पण मस ईक्रीला कारण बी तसच ओ… आत्ता मसीचं वय बी झालेलं.. नुसती 3 येतं जरी दिली तरी वय रनिंग 16 होत. आणि ईकडं तिकड 2 वर्ष नाहीतर गोठ्या तच फूर व्हायची म्हणून दिली इकून गंवडीमामानं…… अशानं लांबलचक शशीदाच्या आईची स्टोरी संपती तोच……. शशीदा कुठून तरी फिरुन आला… तोंड साधारण वाकडं होतं… म्हंटलं “नाराज होवू नकोस. नव्या उमेदीनं उरलेल्या 8 रेड्या तयार कर” ……. तो पण हसत म्हटला

….. “बरं ठीक आहे.”…………… आणि मग मी त्याला गमतीतच म्हंटलं….. “भावा तुझ्या 11 वर्ष बांड मसीची स्टोरी सध्या लई चर्चेत हाय” …. त्यावर तो खदाखदा हसून म्हणत होता “असं काही नाही रे ”

— गजानन साताप्पा मोहिते 

Avatar
About गजानन साताप्पा मोहिते 8 Articles
M. Sc in organic chemistry. D. Lib

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..