नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग २६

राजच्या आणि नीलच्या डोळ्यातून अश्रुंचा पूर वाहू लागला……. राज नीलला… ‘माझा नील…माझा नील’ असे म्हणून परत परत मिठी मारत होता आणि नील त्याला ‘दादा…. दादा…’ म्हणत होता. तोपर्यंत आरूलापण शुद्ध आली होती. दीला उडी मारताना पाहून तीपण कठड्याच्या दिशेने ‘दीsssss… दीsssss… थांब’ असे म्हणत धावत निघाली….. […]

अजब न्याय नियतीचा – भाग २५

पण मी त्याचं काही एक ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. मी ते ग्रीटींग रागाने फाडायला सुरूवात केली. मला ते ग्रीटींग फाडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे होते. राजचा सगळा राग मी त्या ग्रीटींगवर काढत होते. संतापाच्या भरात मी काय करतेय याकडेही माझं लक्ष नव्हतं. तसा राज जोरात माझ्याकडे धावत आला. त्यानं ते ग्रीटींग माझ्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि…….. आणि मी रागाच्या भारात त्याला मागे ढकलून दिलं…..” […]

अजब न्याय नियतीचा – भाग २४

तो माझ्याशिवाय जगू शकणार नाही हे त्याने कबूल केले. तो मला म्हणाला की, “तू मला एक संधी दे. मी तुला सिद्ध करून दाखवतो की काही झालं तरी मी यापुढे तुझ्याशिवाय कोणत्याही मुलीशी फ्री वागणार नाही. तुला न आवडणारी एकही गोष्ट मी करणार नाही.’ […]

अजब न्याय नियतीचा – भाग २३

सुरूवातीला मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण या गोष्टी सतत माझ्या कानावर येवू लागल्या आणि माझ्या लक्षात आलं की, आपली आरूपण आता मोठी झालीय. मी तिला माझ्या आणि राजच्या नात्याबद्दल कधीच बोलले नव्हते. […]

एक उनाड दिवस – भाग २

गाडीच्या अचानक थांबण्याने दोघांना झोराचा धक्का बसला. डोळे मिटून गाणी ऐकण्यात मग्न मानसी किंचाळली जोरात. अमितच्या मानेला झोरात हिसका बसला. गाडी जागच्या जागी थांबली. काय होतंय पाहायला दोघेही गाडीतून खाली उतरले. गाडीच्या बॉनेट मधून धूर येत होता. गाडीचं इंजिन खूप तापलं होतं बहुदा. पाणी संपलं होतं गाडीतलं. अमित दुखरी मान वळवू शकत नव्हता. थोडी तिरकी मान […]

अजब न्याय नियतीचा – भाग २२

खरं तर नील तिच्या बाबतीत जे खरं घडलं तेच बोलत होता. त्यामुळे आता लताला त्याचा राग यायला सुरूवात झाली होती. तिला बघायचं होतं की, नीलला आपल्या बद्दल नक्की किती माहिती आहे? ती राग आवरून धरून त्याला पुढे बोल असे म्हणाली. ’गो अहेड नील.’ […]

एक उनाड दिवस – भाग १

अमित त्यादिवशी दमून आला ऑफीसमधून. सायली लवकर अली होती नेहमीपेक्षा. अमित दार उघडून आत आला तर पर्स, गाडीची किल्ली, स्टोल सगळं सोफ्यावर पसरलेलं सायली मस्त गॅलरी मध्ये उभीराहून मैत्रिणीशी फोन वर बोलत होती. त्या सगळ्या पसाऱ्याकडे एक नजर टाकून अमितने मान हालवली आणि आपल्या सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या. टाय सैल करत, हाताच्या बाह्या दुमडत पाठमोऱ्या […]

नवरात्र …. माळ नववी

माझा जन्माच्या वेळी …आपल्या मुलाला दुसरी पण मुलगीच झाली म्हणून रुसलेल्या यमुना आजीचा राग ,रुसवा .. तिच्या जवळ राहिल्यानंतर हळूहळू विरघळत गेला … आणि नंतर तिचं खूप प्रेम वाटयाला आलं …मी तिच्याबरोबर राहिले अन्‌ तिला माझा लळाच लागला … बुरहानपूरच्या मोठया घरात आजीबरोबर घालवलेला काळ माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ …आम्हा नातवंडांचं बालपण अतिशय सुंदर सांभाळलं […]

नवरात्र …माळ आठवी

आज सक्काळपासून पाऊस कोसळतोय नुसता … सगळीकडे थंडगार झालंय … बाहेर फक्त पावसाचा आवाज … त्यात हा सुट्टीचा आळसावणारा मूड ! सकाळी मस्तपैकी गरम गरम आल्याचा चहा आणि भजी झालीत .. दुपारीचं ही असंच काहीबाही … आता बसलेय .. निवांत .. आपलं आपल्या मधेच गुंगून जाणं अनुभवायला ! हया कोसळणाऱ्या पावसाला ना नुसतं बघत रहावंस वाटतं […]

अजब न्याय नियतीचा – भाग २१

आरूला, आता काय सरप्राईज बघायला मिळणार याची खूप उत्सुकता लागून राहिली होती. नीलनं आपल्याला या सगळ्या प्लॅनबद्दल आधी का नाही सांगितलं याचं तिला आश्चर्य वाटत होतं. नीलला राजूबद्दल काय माहिती असेल? त्यानं हे आपल्याला का नाही सांगितलं? डॉक्टरसाहेबांनी उपचाराचा भाग म्हणून राजूला इथं का आणायला सांगितलं असेल? असे अनेक प्रश्न आरूच्या मनात रुंजी घालत होते. […]

1 … 92 93 94 95 96 … 115
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..