नवीन लेखन...

गावगुंड

आमच्या गावी एक सार्वजनिक कुत्रा होता. आम्ही सगळेजण त्याला गावगुंड म्हणत असू. तपकिरी रंग आणि काळसर तोंड असलेला हा गावगुंड गावातल्या सगळया मोकाट कुत्र्यांचा बादशहा होता. वैयक्तिक पाळलेली कुत्रीही याच्यासमोर अंगापिंडाने किडमिडीत वाटायची. शहाणी कुत्री तर याच्या सावलीलाही यायची नाहीत. […]

एक पाऊल ओल्या वाळूंत – भाग १

“लक्ष्मी“ असं तिचं नांव होतं. लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवी. कौतुकाने त्या नावाचं रूपांतर ‘लक्की’ – इंग्लिशमध्ये “सुदैवी’’ किंवा “नशीबवान” असं झालं. हे नांव सोपं, सुटसुटीत आणि लक्षांत रहाण्यासारखं होतं. तिच्या वडलांना – श्री.रंगनाथ पै यांना ते समर्पक वाटलं होतं. तिच्या आधी जन्मलेली चार मुलं बाल्यावस्थेत मरण पावली होती. सहाजिकच तिच्या आईवडलांना तिच्यावर जास्त माया होती शिवाय तिच्या जन्मानंतर रंगनाथ पै यांच्या हाटेलच्या धंद्यात भरभराट झाली आणि ते अधिक श्रीमंत झाले. […]

पापी !

भारताच्या निकोबार बेटा पासून पूर्वेस दूर हे काळू बेट आहे. हे इतके लहान आणि नगण्य आहे कि जगाच्या भुगोलांच्या पुस्तकांनी आणि नकाशांनी याची दाखल सुद्धा घेतलेली नव्हती ! सॅटेलाईटच्या उजेडात हे जगाच्या नकाशावर आत्ताअवतरले आहे ! भारतीय आणि चीनी लोक मात्र ‘अक्षय तारुण्य ‘ देणाऱ्या वनस्पतीच्या शोधात येथे यायचे ! […]

हा क्रमांक अस्तित्वात नाही !

आता बहुतेक जण निघून गेले होते . थोडे निवांत झाले होते . फक्त एकाच व्यक्ती भयानक बिझी होती . कौल ! ते पोटतिडकीने,’ मी कशी वेळेवर आणि तत्परतेने कार्यवाही केली ? आणि हजारो जीव वाचवले . ‘ हे टीव्ही चॅनल्स ला सांगत होते ! आणि चॅनलवाले ते लाईव्ह टेलेकास्ट करत होते ! […]

पेटलाच कि

मी भग्या , आवंदा चौथी पास झालाय ह्यो गब्रू ! आता तर उन्हांळ्याचा सुट्ट्या हैत . रट्टाऊन जेवायचं अन गावभर हुंदडायचं , हेच आपलं काम . तस बी शाळा आसन तर बी हेच काम असत आपलं ! आत्ता बी मी आमच्या रानात चिंचाची बोटक खाया आल्तो . खाऊन खिसभर संग घेतल्यात . […]

अडुसष्ट वर्षांपू्र्वी – भाग ३

याही गोष्टीला ११ पेक्षा जास्त वर्षे झाली. सध्या आमच्या लग्नाला ५१ हून जास्त वर्षं झाली. ही दागिने गमावल्याचं दु:ख विसरली. मी अजून नलूला विसरूं शकत नाहीं. […]

राम कहाणी !

मोहन्याच्या पावलांचा आवाज दूर गेल्यावर , रामा अंदाजे आपल्या घराकडे वळला . हातातली काठी हलकेच जमिनीवर आपटून पहिली . उघड्या पायाच्या तळव्याने अदमास घेत सराईतपणे घरा समोरची नाली ओलांडली . चार पावलावर अपेक्षे प्रमाणे घराच्या पायऱ्या लागल्या . एक ,दोन ,तीन तो पायऱ्या चढून गेला . हात सावध पणे समोर केल्यावर हाताला लाकडी दराचा स्पर्श झाला . हलका हात फिरवून आपल्याच घराचे दार असल्याचे त्याने खात्री करून घेतली . अन मग कडी वाजवली . […]

अडुसष्ट वर्षांपूर्वी – भाग २

मी घरी आलो तेंव्हा खूप उशीर झाला होता. आईला काळजी वाटत होती. आप्पांना (माझ्या व़़डलांना)ही काळजी वाटत असावी. मी आईला सांगून गेलो होतो असं म्हणट्ल्यावर त्यांचं समाधान झालं. […]

1 94 95 96 97 98 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..